सध्या युट्युबचा ट्रेंड लक्षात घेता, “दोन कटिंग”मध्ये काहीच मसाला नाही. काहीच झाकपाक नाही. हि एक साधी सरळ गोष्ट आहे तुमची माझी, लग्नाच्या वयात आलेल्या, लग्न झालेल्या त्या सगळ्यांची ज्याच्या मनात लग्न म्हटलं कि एक नर्वसनेस येतो किंव्हा कधी काळी आला असेल. हि गोष्ट एका आर्टिस्टची आहे, मुलीला परावलंबी म्हणून टोचणाऱ्या त्या समाजासाठी आहे. एक स्त्री हि खंबीर आहे, आपल्या कुटुंबाला सेफ ठेवण्यासाठी . एका आर्टिस्टला त्याच्या पार्टनर कढून काय अपेक्षित आहे . संसाराच्या राहाट गाड्यात एकमेकांनी एकमेकांकडून काय अपेक्षित करावं हि स्टोरी याबाबद्दल बोलते .
असं असताना लोकांनी “दोन कटिंग” वर मनापासून प्रेम केल. मराठी शॉर्ट फिल्मला ५ दिवसात 100K व्युज 5K पेक्षा जास्त लाईक्स अशी सुसाट पसंती लोकांनी दिली आहे आणि ती अशीच पुढेही चालू राहील . ह्या भरघोस यशाबद्दल आपण “दोन कटिंग”च्या दिग्दर्शक आणि एक्टर्सना विचारले असता ते काय म्हणाले हे जाणून घेऊया.

कृणाल राणे
हे असं सगळं साधं सरळ असताना लोकांना ते कितपत आवडेल आणि लोक ते कस घेतील याबद्दल आम्हाला थोडी शंका होती. जे कोणी बघतील त्यांच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य मात्र नक्की ह्याची खात्री होती. पण शॉर्ट फिल्म रिलीझ झाली आणि हा विषय एका आर्टिस्ट पुरता मर्यादित राहिला नाही. तो प्रत्येकाने रिलेट केला आणि प्रेक्षकांनी आम्हाला भरघोस प्रेम दिल हे आमच्यासाठी खूप मोठं आहे.

अक्षय केळकर
खरंतर शॉर्ट फिल्म ही बहुधा दोनंच कारणांसाठी बनवली जाते. बहुतांशी स्पर्धेसाठी किंवा क्वचित स्वतःच्या आनंदासाठी. दोन कटींग ही त्या क्वचित पैकी! स्वतःच्या आनंदासाठी आणि खुप आवडलेली अशी. आमच्या दोन कटींगला सह्ह्याद्री सारख प्रेम दिलत. आणि महाराष्ट्र दिनी, आमच्या मराठमोळ्या दोन कटींग ला, अवघ्या ५ दिवसात, लाखात एक प्रेम दिलंत.
शॉर्टफिल्म मराठी असुनही, त्याला मराठी भाषिकांसोबतच इतर भाषिकांचाही भरभरुन प्रतिसाद लाभला. निव्वळ ५च दिवसात इतके view, comments आणि कौतुक!
We are overwhelmed!

समृद्धी केळकर
कथा वाचून तर मी तृप्त झाले होते . आत्तापर्यंत असं काही अटेम्प्ट केलं नाहीये तर आता केलं पाहिजे असं वाटलं. खूप कमी वेळात अक्षय, कृणाल, मी रिडींगच्या छोट्याश्या प्रोसेसमधून गेलो, मग आम्ही शूट केलं. फिल्म रिलीझ झाली आणि फोन हँग होईस्तोवर मेसेजस आणि कॉल्स आले . मी आधी एक सिरीयल केलीये , पण युट्युबवर कन्टेन्टला मिळणारा हा रिस्पॉन्स बघून खूप बर वाटलं . हे असच प्रेम तुम्ही आमच्यावर ठेवा .
मग मित्रानो तुम्ही पाहिली का ही शॉर्ट फिल्म? कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि हा पाहिली नसेल तर वाट कसली पाहताय लगेच जाऊन पाहा.