Home हेल्थ गरोदर पणात ह्या गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

गरोदर पणात ह्या गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

by Patiljee
2033 views

गरोदरपणात प्रत्येक महिला आपली काळजी घेते . पण कधी कधी काही महिलांना गरोदरपणात होणारे बदल समजूत येत नाही. म्हणून घडणाऱ्या गोष्टींकडे त्या दुर्लक्ष करतात. पण हे दुर्लक्ष करणे खूप महागात पडू शकते. गरोदरपणात प्रत्येक स्त्रिच्या शरीरात बदल घडून येत असतात. काही महिलांना प्रश्न पडतो की दुखणे आहे की कोणते लक्षण? पण असे काही होत असेल तर ती गोष्ट तुम्ही टाळू नका. तुमच्या डॉक्टर किंवा घरातील जाणकार व्यक्ती सोबत त्या गोष्टी बद्दल चर्चा करा.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणा बद्दल सांगणार आहोत. जर तुम्हाला ही लक्षणे आढळली तर चुकून सुद्धा दुर्लक्ष करू नका.

pregnent

गरोदरपणातील लक्षणे

  • योनी ब्लडिंग आणि स्पोटींग हे एक खूप मोठं गंभीर लक्षण आहे.
  • पोटातील बाळ जर कमी हालचाल करत असेल आणि किक मारत नसेल तर ही चिंतेची बाब आहे. गरोदरपणात १६ व्या आठवड्यापासून बाळाची हालचाल होणे सुरू होते. जर तुम्हाला ही हालचाल खूप कमी प्रमाणात जाणवत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवा.
  • लघवी करताना गरोदर महिलांना त्रास होणे, करून आल्यानंतरही पुन्हा पुन्हा लघवीचा त्रास वाटणे, लघवी कमी येणे किंवा न येणेच, मुत्रातून रक्त बाहेर पडणे, घाण वास येणे, अशी लक्षणे आढळली तर समजून जा मूत्राशयात संक्रमण झालं आहे.
  • बाळ पोटातून खालच्या भागात येतोय की काय? असे वाटणे, कंबरे खाली पहिल्यांदाच दुखणे, अशी लक्षणे आढळली तर पाणी पिऊन एक तासभर तरी आराम करा. आणि तरी सुद्धा नाही बरे वाटले तर डॉक्टरांना भेटा.
  • ताप येऊन थंडी भरली तर ही गोष्ट अंगावर काढून घेऊ नका.
  • अस्पष्ट दिसणे हे फरिक्लेमप्सियाचे संकेत असू शकतात.
    जास्त वजन वाढणे, अपघात होऊन जर पोटाला मार लागला तर न लपवणे, संपूर्ण शरीराला खाज सुटणे अशा गोष्टींना सुद्धा लपवू नका.
  • वारंवार डोकं दुखणे, औषध घेऊन सुद्धा फरक न जाणवणे हे लक्षण आढळले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वर दिलेली लक्षणे आढळली न दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांना भेटा. हे गरोदर महिला आणि होणाऱ्या बाळासाठी महत्त्वाचे आहे. गरोदर ह्या विषयावर आम्ही कथा सुद्धा लिहली आहे ती वाचा.

Please follow and like us:

Related Articles

1 comment

गूळ खाण्याचे फायदे » Readkatha July 26, 2020 - 5:57 pm

[…] हा उष्ण आहे त्यामुळे ज्या स्त्रिया गरोदर आहेत अशा स्त्रियांनी अधिक गूळ खाणे […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल