Home संग्रह ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत रीनिवल नाही केलं तर परवाना रद्द होणार

ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत रीनिवल नाही केलं तर परवाना रद्द होणार

by Patiljee
190 views

भारतीय सरकारने वाहतुकी संदर्भात अनेक महत्त्वाचे नियम मागील काही कालावधी पासून आमलात आणले आहेत. ड्रायव्हिंग करताना गाडीची कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स, वयोमर्यादा, गाडीचा वेग, चालवण्याची पद्धत अशा अनेक गोष्टी गांभीर्याने लक्ष घालून कठोर कारवाई करत मोठे दंड आकारणी चालू केली आहे. कुणीही ह्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला पैशाच्या स्वरूपात मोठी रक्कम सरकारला भरावी लागत आहे. त्यामुळे भारतीय जनता सुद्धा आता वाहतुकीचे बरेच नियम पालन करताना आपल्याला दिसत आहेत.

भारत सरकारने अजुन एका वाहतुकीच्या नियमात वाढ केली आहे. हा नियम ऐकायला कठोर असला तरी त्याचा जनतेला नक्कीच फायदा होणार आहे, असे RTO कडून सांगण्यात आले आहे. जर तुम्ही वाहन चालवत आहात तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स गरजचे आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शिक्षेला पात्र ठरता. पण नवीन नियमानुसार जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली आहे आणि तुम्ही पुढील तीस दिवसाच्या कालावधीत लायसेन्स रिनिवल केलं नाहीत तर तुमचे लायसेन्स रद्द होऊ शकते.

तुमचे लायसेन्स जर एकदा रद्द झाले तर तुम्हाला एल एल आर (कच्च लायसेन्स) काढून पुन्हा एम डी एल टेस्ट (रीटेस्ट अँड रीवेलिड) द्यायला लागणार आहे. नंतर परत तुम्हाला तुमचं लायसेन्स मिळेल. लायसेन्स मुदतवाढ तुम्ही एक वर्ष बाकी असताना कधीही करू शकता. तुमच्याही परवान्याची अंतिम तारीख जवळ आली असेल तर लवकरात लवकर वाढवून घ्या. नाहीतर तुम्हालाही ह्या सम्मस्येला सामोरे जायला लागू शकते. ही माहिती सर्वांसोबत नक्कीच पाठवा.

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल