सध्या खूप गरम होत आहे आणि या गरमी मध्ये सगळेच पदार्थ लवकर खराब होतात. तसेच दूधही लगेच फाटते कधी कधी दुधाचे भांडे खराब असेल तरीही दूध फाटते. अशा वेळी फाटलेले दूध काही जन फेकून देतात. तर काही तसाच ठेऊन देतात. कशासाठी तर बघू नंतर करेन काहीतरी पण नंतर काहीतरी करेन या विचारातच ते दूध आणखी खराब होते आणि फेकून देण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. अशा वेळी काय कराल ते पाहूया.
पहिल्यांदा तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर त्या दुधातील पाणी काढून टाका आणि तुम्हाला जितकं गोड हवं तितकी साखर टाका आणि हे मिश्रण गॅसवर थोडा वेळ शिजवा. मी नेहमी असेच करायचे लहान होते तेव्हा तुम्हीही करून बघा आवडेल.
आता उरलेल्या पाण्याचे काय करावे हा विचार तुम्हाला नेहमीच पडत असेल तर अजिबात विचार न करता हे पाणी गव्हाचे पीठ मळताना त्यात टाका. चपात्या छांन मऊ होतात किंवा भाता मध्ये शिजताना किंवा रस्स्या वाल्या भाजीत ही घालू शकता. किंवा नुसतेच पिऊ शकता त्यासाठी या पाण्यात थोडी पीठ आणि मिरपूड टाका गरम करा आणि प्या.
फाटलेले दूध एका सुती फडक्यात घट बांधून पाणी सगळे गाळून घ्या. त्यानंतर त्याचे पनीर तयार होईल याचे घट्ट तुकडे हवे असल्यास थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवा नाहीतर साधा कांदा, मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून मस्त भुर्जी बनवा.
हेच सारण गव्हाच्या पिठात भरून त्याचे पराठे बनवा त्यात बटाटा आल लसूण मिरची कोथिंबीर जे काही तुम्हाला हवे ते टाका आणि पराठे बनवा.
ताज फाटलेले दूध असेल तर त्याचे रसगुल्ले ही तुम्ही बनवू शकता.
तुमच्याकडे अशा घरगुती रेसिपीज असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुमच्या नावाने आम्ही त्या प्रकाशित करू.