Home Uncategorized अरे बापरे, हे पदार्थ एकत्र खाल्ले तर भोगावे लागतील गंभीर परिणाम….!!

अरे बापरे, हे पदार्थ एकत्र खाल्ले तर भोगावे लागतील गंभीर परिणाम….!!

by Patiljee
767 views

लहानपणी पासून ही गोष्ट तर आपण सगळेच ऐकत आलो आहोत. दही आणि दूध एकत्र खाऊ नये असे म्हणतात मात्र हे असे का हे मात्र फार कमी लोकांना महित असते. चला तर मग आज यामागची खरी कारणे जाणून घेऊया. दूध पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले गेले आहे कारण दुधात पोषक तत्त्व जसे कॅल्शियम, प्रोटीन इतर आढळतात ज्याने शारीरिक विकास होण्यास मदत होते. हाडे बळकट होतात. पचन शक्ती वाढून इमुनिटी वाढायला मदत होते. त्यामुळे दुधजन्य पदार्थ आहारात असणे नेहमीच फायद्याचं असतं.

परंतू दुधाचे सेवन करताना यासोबत कोणते असे पदार्थ आहे जे आहारात सामील करू नये जाणून घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण अशात आरोग्यावर विपरित परिणाम देखील होऊ शकतो. आणि बरेच पदार्थ असेही आहेत ज्यांचं सोबत सेवन करणे आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकत. पदार्थांमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म आणि सूर्य पदार्थांची स्वतःची असलेली नसर्गिक गुणधर्म कधी कधी विरुद्ध असू शकतात त्यामुळे काही पदार्थ हे सोबत खाणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकत. अशाच काही पदार्थांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

खाण्याचे मीठ दूध आणि मीठ एकत्र खाऊ नये असं म्हणतात. आणि ते काही अंशी बरोबर देखील आहे. मात्र ते का खाऊ नये यामागील कारण कधी जाणून घेतले आहे का..?मीठ आणि दूध याचे सोबत सेवन करणे चुकीचे आहे कारण अशात लिव्हरसंबंधी त्रास उद्भवण्याची शक्यता असते. म्हणजे आपल्या छोट्याश्या चुकीमुळे आपण आजाराला आयते आमंत्रण देत असतो. दुधात प्रोटीन आणि मिठात आयोडीनचे प्रमाण अधिक असल्यामुळे याचा विपरित प्रभाव लिव्हरवर पडतो. म्हणजे थोडक्यात दोन्ही गोष्टी एकाच वेळी खाणे जीवघेण्या आजारांना आमंत्रण ठरू शकते हे मात्र नक्की.

केळी केळी आणि दूध हे मात्र मिश्रणाच चूक आहे, दुधात केली कुस्करून त्याच शिकरण बनवलं जात. बऱ्याच भागांमध्ये केळीच शिकरण मोठ्या चवीने खाल्लं जात मात्र तुम्हाला माहीत हे का दुधात केळी मिसळून खाणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे ते…?? अनेक लोक वजन वाढवण्यासाठी दुधासोबत केळी खातात परंतू दूध आणि केळ शेक या रूपात घेतल्यास फायदा होतो. ते बनवण्यासाठीची प्रक्रिया थोडी वेगळी असते. ज्यांना सतत सर्दी आणि कफ चा त्रास असेल किव्वा याच  संबंधी तक्रार असेल त्यांनी याचे सेवन करणे टाळावे. हे मिश्रण खाणे आरोग्याचा दृष्टीने तितकेसे चांगले नाही.

कच्चा कांदा तसं खाण्यासाठी हे मिश्रण तितकेसे स्वादिष्ट देखील नाही. सहसा कोणी एकत्र खात देखील नाही. मात्र

दूध पिण्यानंतर किंवा आधी लगेच कच्चा कांदा खाल्ल्याने त्वचा संबंधी समस्या उद्भवू शकते. स्किन इन्फेक्शन, खाज इतर समस्यांना सामोरा जावं लागू शकतं. ज्या प्राण्याचं आपण दूध खातो त्या प्राण्याने देखील कांदा खाल्ला असला तरी दुधाचा वास येतो. त्यात देखील अभिक्रिया घडते. मात्र जाणून बुजून कांदा खाण्याचा प्रयत्न करू नका उगाचच त्वचेच्या आजाराला तोंड द्यावं लागेल.

मासे हे मात्र प्रत्येक ठिकाणी आपण ऐकलेच असेल की दूध आणि मासे एकत्र खाऊ नये. काही अंशी हे खरे आहे मात्र 100% खरे असे मी अजिबात म्हणणार नाही. मासे खात असल्यास त्यासोबत दूध किंवा दुधाने तयार कोणतेही पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. एकत्र खाल्ल्याने त्वचेवर पांढरे डाग पडतात किंवा कोड फुटते असा काहीसा समज आहे. मात्र याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. आपल्याकडेच नाही जगभरात सगळीकडेच मांस खाल्ले जाते मात्र दुधासोबत सेवन केल्याने पांढरे डाग पडतात या विधानाला कुठलीही पुष्टी मिळली नाही. डाग पडतात म्हणून नाही मात्र ज्यांना पाचनाच्या संबंधित तक्रारी आहेत त्यांनी मात्र हे खाणे नक्की टाळावे. पचनाच्या तक्रारी असतील तर उलट सुलट पदार्थ तोंडी लावणे टाळणे कधीही उत्तमच..

मसालेदार पदार्थ मसालेदार पदार्थ तर केव्हाही आरोग्यासाठी घातकच असतात. शरीरात कोलेस्टेरॉल वाढून ब्लड प्रेशर, हृदयविकार यांसारखे आजार बळावू शकतात. त्यामुळे सतत मांसाहार आणि मसालेदार फोडणी असलेलं तेलाने ओथंबलेले जेवण जेवणे कधीही टाळावे. सोबत दूध आणि मसाले एकत्र खाल्ले तर त्याचा पचन तंत्रावर विपरित परिणाम होतो. तुम्ही देखील निरीक्षण केले असेल तर मसालेदार काहीतरी खाल्ले आणि दूध पिले तर काही वेळातच ऍसिडिटी सुरू होते. पोट बिघडते. जेवण पचण्यास त्रास होत असून पोट दुखी, जळजळ, गॅस सारख्या समस्यांना सामोरा जावं लागतं. मात्र दुसऱ्या काही कारणाने ऍसिडिटी झाली असेल तर थंडगार दूध प्यावं अराम मिळतो.

उडद डाळ उडीद डाळ तर सर्वच लोक आवडीने खातात मात्र ही पचायला काहीशी अवघड आहे. जड अन्न असल्याने आपले शरिर देखील हे पचन करायला जास्त वेळ लावते. अनेक लोक रात्री उडीद डाळीचे सेवन केल्यावर दूध पितात. ही सवय देखील काही अंशी चूक आहे. जड अन्न पचायला आणखी जड होऊन बसल्याने पोटासंबंधी आजार वाढायला लागतात. असे केल्याने अन्न पचायला त्रास होतो. सोबतच पोटाशी निगडित समस्यांना सामोरा जावं लागतं.

आंबट पदार्थ आंबट पदार्थ आणि दूध यांचं नेहमीच वाकडे आहे. आंबट पदार्थांमध्ये आम्ल मोठ्या प्रमाणात असत ज्याचं दूधाशी नेहमीच वाकडं असतं. आंबट आणि दूध हे परस्परविरोधी घटक असणारे पदार्थ आहेत. दूध पिण्यानंतर लगेच दही, लिंबू किंवा इतर आंबट फळं खाल्ल्याने अपचन होतं. दुधात लिंबू पिळल्यावर जसा परिणाम दिसतो अगदी तसंच काहीसं आपल्या पोटात गेल्यावर देखील घडतं. पोटात दूध फाटल्यामुळे अॅसिडिटी, उलटी किंवा मळमळणे अश्या समस्यांना सामोरा जावं लागू शक

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल