आपल्या आजूबाजूला आपण अनेक लहान मुले पाहतो कोणी रस्तावर हातात वाडगा घेऊन भिक मागत असतो तर कोणी आपल्याकडे अन्नाची याचना करत असतो पण आपण कित्तेक वेळा याकडे दुर्लक्ष करतो. यापैकीच ही एक मुलगी आहे तीच नाव आहे दिव्या. शाळेजवलच्याच एका झोपडपट्टीमध्ये राहते तिचे आई वडील हे सफाई कामगार आहेत.
दिव्या रोज भुकेल्या पोटी त्या शाळेत मध्ये जायची तशी ती या शाळेमधील विद्यार्थिनी नव्हती पण तरीही ती रोज त्या शाळेत जायची. कारण एकच होत ते म्हणजे शाळेतील जेवण. तिचा फक्त एवढंच हवं होत की त्या शाळेतील मुलांनी वेस्ट घालवलेले अन्न हे तिला मिळावं. हृदयाला पिळवटून टाकणारा हा फोटो थोड्याच काळात सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोला शीर्षक दिले होते ते म्हणजे अकाली भुकेली नजर अस होत.

तर हा फोटो काढला होता गुडिमलकापुर शाळेतील आणि देवलझाम सिंह याने हा फोटो काढला होता. जेव्हा हा फोटो NGO ‘एमवी फाउंडेशन’ मधील राष्ट्रीय समनवयक वेंकट रेड्डी यांनी पाहिला तेव्हा ते त्या मुलीच्या घरी गेले तिचे घर पाहून ते भाऊक झाले त्यानंतर त्यांनी स्वतः त्या मुलीचं एडमिशन केले. शालेय एडमिशन झाल्यापासून दिव्या खूप खुश आहे कारण की आता तिला शाळेत शिकायला ही मिळेल आणि दुपारचे जेवण ही मिळेल.