Home कथा Extra Marriage Affair

Extra Marriage Affair

by Patiljee
327468 views

हॅलो सौरव जित बोलतोय, तुझा नवीन नंबर सायली कडून घेतला आता. सेकंड शिफ्टला येताना परांजपेची फाईल घेऊन ये, डोकं खालेय बॉस ने सकाळपासून माझे. अहो मिस्टर थांबा थांबा समोर आधी कोण आहे ते पहा तर, किती बोलता. चुकीचा नंबर लावला आहे तुम्ही, इथे कुणीच जित नाहीये मी सिया बोलतेय. अरे यार सॉरी सॉरी घाई गडबडीत चुकीचा नंबर लागला.

दत्ता कडून खरं तर हा चुकून नंबर लागला होता. त्याने फोन सॉरी बोलून ठेऊन दिला आणि परत कामात व्यस्त झाला. संध्याकाळी घरी जाताना त्याच्या ते लक्षात आले. त्याने खिशातून फोन बाहेर काढला, तो नंबर सेव्ह केला. पाहिला तर तो नंबर व्हॉटसअपवर होता. त्याने सॉरी म्हणून मेसेज केला. समोरून रिप्लाय आला कोण आपण? अहो मघाशी चुकून कॉल लावला, शेवटच्या नंबर ने घोळ केला म्हणून तुम्हाला फोन लागला, त्यासाठी सॉरी बोलतोय. समोरून पण रिप्लाय आला अहो चालायचे ठीक आहे काही हरकत नाही.

घरी पोहोचल्यावर दत्ताने बॅग बेडरूम मध्ये फेकून दिली आणि वॉश रूममध्ये शिरला. आज सुद्धा त्याने बॉसचे बोलणे ऐकले होते. म्हणून तो वैतागला होता. सर्व राग बायकोच्या जेवणावर काढला. अर्धवट जेवण सोडून जाऊन बेडरूम मध्ये बसला. थोडा टीव्हीवर सिनेमा पाहिला पण कशात मन लागत नव्हते. बाहेर बायको एकटीच बसली होती. त्याने तिला आवाज दिला पण तिला सुद्धा राग आलाच होता म्हणून तिने पण आत येण्यास नकार दिला.

दत्ता आणि त्याच्या बायकोचे लग्न होऊन पाच वर्ष झाली होती. दोन वर्षाची एक मुलगी सुद्धा त्यांना होती. पण त्याची बायको गावाकडची असल्याने दत्ता आणि तिचे कधी हवं तसे जमलेच नाही. तिला संसार कसा करायचं हे पूर्णतः माहीत होतं पण शारीरिक सुखा बाबत दत्ता तिच्याकडून सुखी नव्हता. त्याला त्याच्या मर्जीनुसार शारीरिक सुख मिळत नव्हतं. म्हणून सुद्धा त्यांच्यात रोज भांडणे होत होती.

शेवटी न राहून त्याने त्या अनोळखी बाईला व्हॉटसअप केला. तिचाही समोरून मेसेज आला. हाय हॅलो नंतर गोष्टी रंगायला लागल्या. तिचे सुद्धा लग्न झाले होते दोन मुली तिलाही होत्या. तिच्याशी बोलण्यात दत्ताला अजुन रस येत होता. बऱ्याच वर्षांनी असे कुणा मुलीसोबत तो चाट मध्ये बोलत होता. समोरून महिला पण खूप चांगल्या पद्धतीने रिप्लाय करत होती. मग काय ह्यांचे बोलणे सुरू झाले. सकाळी गुड मॉर्निंग दुपारी गुड आफ्टर्नून ते रात्री गुड नाईट असा सुखद प्रवास सुरु झाला.

लंच टाईम मध्ये वेळ मिळेल तेव्हा कॉलवर बोलणे, व्हिडिओ कॉल करणे, मध्यरात्री पर्यंत चाट करत बसणे हे चालूच राहिले. दत्ताच्या वागणुकीत आता बायकोला सुद्धा बदल जाणवत होता. एका महिन्याने दाढी करणारा नवरा प्रत्येक आठवड्याला दाढी करत होता. एरवी हाताला लागेल तो शर्ट घालणारा आता कलर कॉम्बिनेशन पाहू लागला होता. त्याचे बदल बायको अनुभवत होती. एकदोन वेळा तिने हे त्याच्याकडे बोलून दाखवले पण त्याने हसुन विषय टाळून नेला.

अखेर सिया आणि दत्ताने वेळात वेळ काढून भेटायचे ठरवले. ठरलेल्या जागेवर दोघेही भेटले. दत्ताला आता सिया खूप जास्त आवडली होती. कारणही अगदी तसेच होतं कारण सिया शहरातील महिला होती. दिसायला खूप छान,अगदी स्वतःला तिने योग्य पद्धतीने बांधून ठेवलं होतं. तिच्याकडे पाहून कुणीच म्हणू शकणार नव्हता की तिला दोन मुले आहेत. चाटमध्ये त्यांचे बरेच विषय झाले होते. शारीरिक सुखा बद्दल चर्चा सुद्धा झाली होती. तिला दत्ताची घरातली परिस्थिती माहीत होती. म्हणून आज त्यांनी रूमवर जाण्याचे सुद्धा ठरवले होते.

दोघेही एका लॉजमध्ये शिरले. दोघांचेही सेम वय असल्याने कुणाला संशय येणार नव्हता. रूममध्ये शिरताच सियाने दत्ताला कडकडून मिठी मारली. तिच्या ह्या वागण्यावरून तिला सुद्धा ह्यात इंटरेस्ट आहे हे दत्ता कळून चुकला होता. तिने स्वतः दत्ताचे कपडे काढायला सुरुवात केली. दत्ता हे सुख अनुभवत होता पण त्याचे मन मात्र भूतकाळात हरवले कारण लग्न झाल्यापासून बायकोने कधीच स्वतःहून त्याचे कपडे काढणे सोडा मिठी सुद्धा मारली नव्हती. आपण किती मोठी चूक केली आहे हे त्याला जाणवत होते. पण सध्या तरी त्याने सिया सोबत वेळ घालवणे सुख समजले. दोघांमध्ये प्रणयाचा खेळ रंगला आणि दोघेही तृप्त झाले.

कितीतरी वर्षांनी असे काही मिळाले म्हणून दत्ता खुश होता. मग काय हे रोजचेच झाले. वेळ मिळेल तेव्हा लॉजवर जाऊन दत्ता आणि सिया आपली भूक भागवत होते. पण म्हणतात ना क्षणिक सुख कितीवेळ पुरणार. हळूहळू दत्ताची तब्बेत खालावत चालली होती. डॉक्टरकडे जाऊन पूर्ण चेकअप केल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला एड्स झाला होता. का झाला? कसा झाला? कधी झाला? ह्याची उत्तरे त्यांच्याकडेही नव्हते.

जेव्हा त्याने ही गोष्ट सियाला सांगितली तेव्हा तिने तर लगेच फोन कट केला आणि त्याला ब्लॉक लिस्ट मध्ये टाकून दिला. त्याला आता कळून चुकले होते की त्याला सिया मुळेच एड्स झाला होता. कारण त्याला स्पष्ट माहीत होते. जसे तिने दत्ता सोबत मजा घेतली होती तशी ह्या अगोदर अनेक पुरुषासोबत मजा घेतलीच असणार. म्हणून हा रोग दत्ताच्या वाट्याला आला होता. ही गोष्ट त्याने बायकोला विश्वासात घेऊन सांगितली तेव्हा तिने खचून न जाता आपण ह्याच्यावर उपचार करू मी आहे सोबत तुमच्या असे स्पष्ट सांगितले.

जिला त्याने फसवून बाहेर रासलीला केली होती आज तीच त्याच्या अशा वेळेत सुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. हे पाहून त्याला रडू थांबत नव्हते.

मित्रानो ह्या कथेतून तुम्ही काय बोध घ्याल ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या कथा तुम्हाला कशा वाटतात हे एक कमेंट करून सांगत जा, तेवढंच मला लिखाण करायला अजुन प्रोत्साहन मिळते. तुमच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला होरर कथा वाचायची आवड असेल तर खास आम्ही त्यासाठी नवीन साईट सुरू केली आहे. एकदा अवश्य भेट द्या.

लेखक : पाटीलजी

Please follow and like us:

Related Articles

2 comments

लॉज » Readkatha June 30, 2020 - 9:19 am

[…] Extra Marriage Affairs […]

Reply
कोलमडलेला संसार » Readkatha July 20, 2020 - 5:44 pm

[…] विवाह बाह्य संबंध […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल