फणस हा तुम्ही आम्ही पिकलेला असताना खातो. त्यातील गरे काढून ते गोड गरे खायला सर्वानाच आवडतात. पण हाच फणस भाजी म्हणून ही खाल्ला जातो. त्यामुळे फणस भाजी आणि फळ या दोन्ही ठिकाणी याची गणना केली जाते. जसा फळ हा सर्वानाच आवडतो तशी भाजी ही सर्वानाच आवडते असे नाही. पण ही भाजी खाल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात फणस खाल्याने आपल्याला अनेक प्रकारचे घटक मिळतात अ, क, हे जीवनसत्त्व असतातच पण त्याचबरोबर कॅल्शियम, रिबोफ्लाविन, थियामीन, पोटॅशियम, नियासिन आणि झिंक यांसारखे पोषक घटक आपल्या शरीराला मिळत असतात. त्यामुळे फणस खाणे किती उत्तम आहे हे बघा.
यात पोटॅशियमचे प्रमाण खूप असल्यामुळे ज्या व्यक्तींना हृदय संबंधी आजार असतील अशा लोकांनी या भाजीचे सेवन करणे गरजेचे आहे. शिवाय या भाजीमध्ये आपल्या शरीरातील मोठ्या प्रमाणात आवश्यक असणारे लोह ही मुबलक प्रमाणत असते. म्हणून ज्या व्यक्तींना अनेमिया किंवा रक्ताची कमतरता आहे? त्या लोकांनी ही भाजी खाणे अत्यंत फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे कॅल्शियम असल्यामुळे हाडे ही मजबूत राहण्यास मदत होते. शिवाय यात मुबलक प्रमात फायबरचे प्रमाण असल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.
फणसाची भाजी कशी करायची
फणसाची वरची साल काढून टाकावी. त्यासाठी अगोदर हाताला गोडतेल लावून घ्यावे. नाहीतर हाताला फणसाचा चिक लागतो, त्यानंतर फणसाचे चौकोनी तुकडे करून घ्या आणि उकडून घ्या. उकडल्यावर बारीक कुस्करून ती लसूण कांदा आणि मसाला, हळद, टॉमेटो सोबत फोडणीला घाला. सुकीच वाफ आणा. तुम्ही ही भाजी उकडून घेऊन तुमच्या मनाप्रमाणे मसाला वापरून करू शकता.