Home हेल्थ फ्रीजमध्ये ठेवलेले गव्हाच्या मळलेल्या शिळ्या पिठाच्या चपात्या करणे म्हणजे चांगले की वाईट?

फ्रीजमध्ये ठेवलेले गव्हाच्या मळलेल्या शिळ्या पिठाच्या चपात्या करणे म्हणजे चांगले की वाईट?

by Patiljee
1159 views

सध्याच्या काळात स्त्री घरात बसलेली तुम्हाला दिसणार नाही ती सुध्दा नोकरी करते आणि आपल्या संसाराला हातभार लावते. पण ज्याप्रमाणे तुम्ही नोकरी करून आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करता ती फक्त दोन वेळ पोटभरून खाण्यासाठी नाही तर त्याचबरोबर तुमचे स्वास्थ ही निरोगी राहायला हवे असे नाही का तुम्हाला वाटतं. सकाळची कामे सोपी होण्यासाठी महिला काही वेळा गव्हाच पीठ रात्रीच मळून फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी ते वापरतात हे करणे म्हणजे वेळेची बचत तर आहे पण तेच पीठ जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवले घातक असते

पहिली गोष्ट म्हणजे फ्रीज मध्ये पीठ भिजवून ठेवणे यात चुकी करू नका, पीठ ठेवताना स्त्रिया काही चुका करतात पहिली म्हणजे हे भिजवलेले पीठ सील बंद डब्यात ठेवावे जेणेकरून ते काळे पडत नाही आणि काळे पडलेले पीठ आपल्या शरीरातील चांगले नसते.

भिजवलेले पीठ लगेच वापरा. जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेऊ नका. कारण तसे जास्त दिवस पीठ फ्रीज मध्ये ठेवल्यास त्यात आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. भिजवलेल्या पीठामध्ये काही बॅक्टेरिया आणि हानिकारक रसायन तयार होतात. त्यामुळे पोळ्या लवकर खराब होतात, शिवाय आपले पोट खराब होते.

फ्रीजमध्ये ठेवलेले हे पीठ जास्तीतजास्त 48 तासांपर्यंत वापरा त्यापुढे जाऊन ते खराब होते. शिवाय शिळ्या पिठाच्या चपात्या तशा चवीला ही चांगल्या नसतात आणि तुमच्या शरीराच्या दृष्टीने हो चांगल्या नसतात.

म्हणून तुम्हाला जास्तच मजबुरी वाटत असेल तरच तुम्ही शिळ्या पिठाच्या चपात्या बनवा नाहीतर ताजे पीठ मळून पोळ्या बनवलेल्या उत्तम.

शिळं अन्न खाऊ नये असं म्हणतात. शिळं अन्न खाल्यामुळे विविध प्रकारचे आजार होऊ त्याचप्रमाणे शिळ्या पिठाच्या चपात्या ही वारंवार खाणे वाईटच.

फ्रीजमध्ये भिजवून ठेवलेल्या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या कडक होतात.

Please follow and like us:

Related Articles

1 comment

Tushar sargar February 28, 2020 - 3:32 pm

माज्या चेहर्या वर पुसट वांग येतोय, म्हणजे एक type चा डाग, मला आधी वाटलं मी कमी पाणि पितो त्यामुळे होत असेल मला पण तो काही केल्या जाइना, कृपया उपाय सांगा ना….plzzz आर्मी मधे असल्याने मी सतत वेग वेगळ्या ठिकाणी स्थानांतर करत असतो, म्हणजे मागच्या काही वर्षात मी कश्मीर मधे होतो आता साउथ मधे आजे, तिथे थंडी इथे गर्मी, त्यामुळे कही लोक बोलतात हेही कारण असु शकतं

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल