Home विचार आताच्या दिवसात गंगा नदी मध्ये झालाय एक नवीन बदल

आताच्या दिवसात गंगा नदी मध्ये झालाय एक नवीन बदल

by Patiljee
112 views

आपल्या देशात सरकारने २१ दिवसाचा लॉक डाऊन घोषित केल्यापासून सर्व जनता ही घरातच आहे. तसेच वाहने आणि कारखाने शिवाय मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा हे सगळे देवस्थान ही बंद कण्यात आले आहेत. जेणेकरून त्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांची वर्दळ थांबावी.

आपल्या देशात सर्वात जास्त महत्व ज्या नदीला आहे अशी नदी म्हणजे गंगा होय. या नदीला लोकांनी देवीचे स्थान दिले आहे. तिची पूजा केली जाते, या ठिकाणी रोजच भक्तगण येत असतात आणि या नदीमध्ये अंघोळ करतात. भक्तांची अशी श्रद्धा आहे की या नदीमध्ये अंघोळ केल्याने आपण जे जे पाप केलेले आहेत ते सर्व या नदीमध्ये अंघोळ केल्याने धुतले जातात.

पण इतकी लोक या गंगा नदीला पवित्र मानतात पण तरीही या नदीमध्ये रोजच आपल्याला घाण दिसून येते. या ठिकाणी असणारे कारखाने त्यांच्यातील केमिकल युक्त पाणी आणि घाण ही या गंगा नदीमध्ये फेकले जाते. त्यामुळे या नदी मधील पाणी हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे नदीतील पाणी लोक तोंडात ही घेऊ शकत नाहीत.

पण सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात सर्वच बंद असल्यामुळे या नदीमध्ये प्रचंड बदल झाला आहे. ते ही फक्त दहा दिवसांमध्ये दिसू आले आहे. या नदिमधील जास्तीत जास्त पाणी हे स्वच्छ झाले आहे. कारखाने बंद असल्यामुळे त्यांच्यातून येणारा कचरा या नदीत सोडला जात नाही. त्यामुळे या नदीचे पाणी पुन्हा पहिल्यासारखे पवित्र व्हायला लागले आहे. या अगोदर ही अनेक प्रकारे या नदीला साफ करण्यासाठी सरकारने कितीतरी योजना आखल्या होत्या. पण काहीच फरक पडत नव्हता मात्र आता या नदीमध्ये कमालीचं बदल घडून आलेला आहे.

Please follow and like us:

Related Articles

1 comment

Anil bawne April 14, 2020 - 5:56 pm

खुप छान अशीच राहायला पाहिजे
आणी वर्षातुन 15 दिवसांचा lockdown असायला पाहिजे सर्व स्वच्छ होऊन नवीन update बघायला मिळतील

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल