सध्या जेनेलिया सिनेसृष्टीपासून लांब असली तरी एक काळ असा होता जेव्हा तिच्यावर दील फेकणारे आशिक खूप सारे होते. अजूनही आहेत म्हणा. अनेक युवकांची क्रश म्हणून सुद्धा जेनेलिया ओळखली जाते. पण तुम्हाला जेनेलिया डिसूझा देशमुख बद्दल सर्वच काही माहीत आहे का? चला तर मग आज जाणून घेऊया जेनेलिया वहिनीचा सिने प्रवास.
जेनेलियाचा जन्म मुंबई मधेच ५ ऑगस्ट १९८७ मध्ये झाला. घरात तिला लाडाने जिनु असे म्हटले जायचे. सेंट अँड्र्यू कॉलेजमधून तिने डिग्री घेतली. तिने राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल सुद्धा खेळला आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत पारकर पेनाच्या जाहिरातीत झळकण्याची संधी मिळाली. २००३ मध्ये फेअर् अँड लवलीच्या जाहिरातीत ती क्रिकेटर श्रीकांत ह्यांच्या सोबत सुद्धा दिसली होती. आधीपासूनच अभिनयातच रूची असल्याने तिने नाटकात कामे करायला सुरुवात केली. आंतरशालेय नाटकात तिने घवघवीत यश संपादन करत अनेकांना स्वतःकडे बघण्यात भाग पाडले.
डिग्रीचे शिक्षण चालू असताना तिने रितेश देशमुख याच्यासोबत तुझे मेरी कसम सिनेमा साईन केला होता. तमिळ दिग्दर्शक एस शंकर ह्यांनी तिला पारकर पेनाच्या जाहिरातीत पाहिले होते. तेव्हाच त्यांना तिच्यात अभिनयाची चुणूक दिसली होती. म्हणून त्यांनी आपल्या २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉईज ह्या सिनेमासाठी मुख्य भूमिकेत घेतले. ह्याच वर्षी जेनेलियाने वेगवेगळ्या भाषेत तीन सिनेमे साईन केले होते. सत्यम (तेलगू), तुझे मेरी कसम (हिंदी), बॉईज (तमिळ).
तुझे मेरी कसम ह्या हिंदी सिनेमातून आपल्या अभिनयाची झलक लोकांना दाखवली. ह्या सिनेमाला सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. त्यानंतर जेनेलीयाने आपला मोर्चा साऊथ सिनेमाकडे वळवला. इकडे सुद्धा तिने आपल्या अभिनयाची झलक उत्कृष्टरित्या पडद्यावर दाखवली. त्यानंतर बॉलीवूड मध्ये तिने २००४ मध्ये दुसरा चित्रपट मस्ती साईन केला तो ही रितेश देशमुख सोबत. हा कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांना खूप जास्त आवडला.
२००६ मध्ये आलेल्या बोम्मारिल्लू ह्या तमिळ सिनेमाने ब्लॉकबस्टर अशी चांगलीच कमाई केली. २५० करोड कमावणारा ह सिनेमा ठरला. ह्याच सिनेमासाठी तिला गोल्डन नंदी अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. तेलगू फिल्म फेअर अवॉर्ड सुद्धा मिळाला. यशाच्या शिखरावर पोहोचताना तिची रितेश देशमुख सोबत चांगली गट्टी जमली होती. दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करत होते. प्रेमाचे रूपांतर ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये त्यांनी लग्नात केलं. लग्न दोन पद्धतीने झाले. आधी मराठी साज शृंगार करत तर नंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्न पार पडलं. सध्या दोघांना दोन गोड मुलं सुद्धा आहेत.

सध्या जेनेलिया अभिनयापासून लांब असली तरी सोशल मीडियावर तरी सक्रिय असते. तिने आपल्या सिने कारकिर्दीत ३६ सिनेमात काम केली आहेत. तिला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी लोकं आतुरली आहेत. पण ही वेळ आणि काळ कधी येईल त्याची आपण वाट पाहूया.
1 comment
Its good actress in hollywood and tollywood. Ritesh deshmukh is very lucky man