Home हेल्थ घरातील कचरा आणि टाकाऊ पदार्थापासून करा भाजीपाल्याची लागवड घरच्या घरी

घरातील कचरा आणि टाकाऊ पदार्थापासून करा भाजीपाल्याची लागवड घरच्या घरी

by Patiljee
278 views

आताच्या काळात विकतचा भाजीपाला खाणे म्हणजे आजाराला आमंत्रण आहे पण तरीही त्याच्यापुढे जाऊन आपण काहीच करू शकत नाही, असे सर्वांना वाटत असेल पण तसे नाही अगदी थोड्याशा जागेत आणि घरातल्या टाकाऊ पदार्थांपासून तुम्ही घरच्या घरी तुमची भाजी पाल्याची बाग फुलवू शकता, तुम्ही स्वतः उगवलेली भाजी तुम्हाला खायला ही चविष्ट आणि यात कोणतेच केमिकल नसल्यामुळे ही भाजी तुमच्या शारीरिक दृष्ट्या ही उत्तम असेल.

आता बघा रोजच्या भाजी मध्ये लागणारी टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर याच बरोबर वांगी, फ्लॉवर, कोबी, कांदा, मुळा यांसारख्या भाज्या तुम्ही तुमच्या गच्चीवर फुलवू शकता. त्याचप्रमाणे थोडी जास्त जागा असेल तर फळझाडे ही लावू शकता त्यासाठी आंबा, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी ही फळं तुम्ही लागवड करू शकता. शिवाय काही घरगुती औषधी म्हणून झाडे लावू शकता.

आता बघा तुम्हाला वाटेल यासाठी मातीची आवश्यकता आहे तर ते अजिबात नाही. ही झाडे लावण्यासाठी मुठभर ही माती न वापरता तुम्ही लागवड करू शकता. त्यासाठी घरातील कचरा हा वापरण्यात येऊ शकतो त्यासाठी, फळांची टरफले, भाज्यांची साले, झाडांचा पालापाचोळा, उरलेले अन्न निवडलेल्या भाज्यांचा कचरा शेंगाची टरफले, फळांच्या साली, चहाचा चोथा यांपासून बनवलेल्या खतांवर ही रोपं वाढवण्यात आली आहेत

आता घरातील कचऱ्यापासून खत तयार कसे करायचे ते पाहूया. यासाठी तुम्ही कोणतीही बिन कामाची भांडी वापरू शकता त्यासाठी माठामध्ये भोक पाडून, छोट्या मोठ्या ड्रमला छेद करून किंवा सिमेंटच्या पिशवी मध्ये तयार करू शकतो.

हे भांडे घेऊन त्यात कचरा जमा करा ओला आणि सुका दोन्ही मिक्स करा. कचरा जास्त ओला असेल तर त्यात कागदे मिसळा आणि जितके दिवस लागतील तितका म्हणजे 1 ते दीड महिना मध्ये हे भांडे भरत रहा. त्यामध्ये अळ्या पण होतात परंतु त्या कचऱ्याचे विघटन करण्यास त्या आवश्यक असतात. त्याला दोन तीन दिवसाआड फिरवत राहायचे.

या कचऱ्या मध्ये थोडा गोमूत्र किंवा मुठभर शेणखत टाकुन किंवा जुन्या तयार झालेल्या कंपोस्ट मधील थोडं टाकू शकतो. या प्रोसेसला जवळपास अडीच ते तीन महिने लागतात. त्यानंतर जेव्हा या मिश्रणाला मातीसारखा वास येतो तेव्हा ते झाले आहे असे समजावे. बाहेर काढून थोडे वाळवून बारीक करून चाळून ठेवावे.

आणि हे तुमच्या झाडांसाठी वापरावे यामुळे तुम्ही पर्यावरणाला कचऱ्याच्या होणाऱ्या हानी पासून वाचवू शकता आणि आपला कचरा हा रोज बाहेर न जाता घरातल्या घरातच त्याचा उपयोग आपण करू शकतो.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल