आपल्या घरातील स्वयंपाक घरात नेहमीच आपल्याला झुरळ दिसत असतात. भिंतीच्या कानाकोपऱ्यात, बेसिन मध्ये, ओट्यावर, भांड्याच्या मांडणीवर अशा बरेच ठिकाणी आढळणारे हे झुरळ आपले जगणं हैराण करून सोडतात. त्याच्यासाठी आपण अनेक उपाय करतो पण व्यर्थ एखाद कीटक नाशक वापरावं तर त्यामुळे आपल्याला त्यातून विषबाधा होण्याची भीती असते. त्यामुळे आपण घरगुती उपाय करू या जेणेकरून आपल्याला ही यापासून धोका नसतो.
पहिली गोष्ट म्हणजे आपण रोज ज्या स्वयंपाक घरात जेवण बनवतो ते नेहमी स्वच्छ ठेवावे. गॅस खालील बाजू रोज पुसून घ्यावी,तसेच घरातील कचरा, भाज्यांची साले वेळच्या वेळी बाहेर टाकायला हवीत आणि घरात बनवले जाणारे पदार्थ नेहमी झाकून ठेवा. स्वयंपाक घरात कुठेही पाणी किंवा अन्न सांडलेले जास्त वेळ ठेवू नये लगेच साफ करावे.
झुरलांसाठी योग्य उपाय म्हणजे आपल्या घरात असणारे रॉकेल, या रॉकेलच्या वासाने आपल्या घरातील झुरळे ही जातात तसेच मच्छर ही बाहेर निघून जातात. तुमच्या घरात ज्या ठिकाणी झुरळ येत असतात त्या ठिकाणी लवंग ठेवा लवंगच्या उग्र वासाने झुरळ त्या ठिकाणी पुन्हा येणार नाहीत. ज्या ठिकाणी झुरळ येत असतात त्या ठिकाणी मसाल्यातील तेज पत्ता हा उपाय करून बघा यामुळे ही झुरळे येणार नाहीत. त्यासाठी ही पाने बारीक चुरा करून त्या ठिकाणी ठेवा याच्या वासाने ही झुरळं येणार नाहीत.
ज्या ठिकाणी झुरळं जास्त येतात त्या ठिकाणी बारीक पावडर टाका त्यामुळे झुरळे अजिबात येणार नाहीत. काळी मिरे, कांदे आणि लसूणची पेस्ट करून घ्या. ती पेस्ट पाण्यात मिसळा आणि झुरळ असतील त्या ठिकाणी स्प्रे करा. कडुनिंबाच्या तेलाचा स्प्रे झुरळ असतील तिथे करावा. कडुनिंबाची पावडर टाकल्यासही परिणाम दिसून येतील. कॉफीच्या वासानं झुरळ बाहेर येतात. पाण्यात कॉफी टाकून ते पाणी आवश्यक त्या जागांवर स्प्रे करावं त्यामुळे झुरळ पळून जातील.