Home संग्रह आनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी

आनंदाची बातमी : कंपनीमध्ये एक वर्ष काम केलं तरी मिळणार ग्रॅच्युइटी

by Patiljee
2923 views
ग्रॅच्युइटी

श्रम विधेयकाला आज संसदेत दोन्ही बाजूच्या सदनांची मंजुरी देण्यात आली. नवीन विधेयकानुसार आता ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी पाच वर्षाची जी अट होती ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व कामगारांच्या मनात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आता हीच ग्रॅच्युइटी वर्षभर तुम्ही काम केलेत आणि कंपनी सोडली तरी सुद्धा तुम्हाला मिळेल. खाजगी क्षेत्रातल्या कामगारांना ह्याचा त्रास जास्त होत होता. कारण ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी एकाच कंपनी मध्ये पाच वर्ष मन नसताना सुद्धा कधी कधी काम करावं लागत होते. त्यांनी जर काम सोडलं किंवा सोडावेसे वाटले तरी सुद्धा ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी त्यांना हे पाऊल उचलता येत नव्हते.

पण नवीन विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर एक वर्ष जरी तुम्ही काम केलेत तरीसुद्धा तुम्हाला कंपनी कडून ग्रॅच्युइटी देण्यात येईल. जे कामगार कॉन्ट्रॅक्ट बेसवर कार्यरत असतात त्यांना सुद्धा ग्रॅच्युइटी देण्यात येईल. मग तो कॉन्ट्रॅक्ट किती दिवस आणि किती वेळेचा असेल ह्याची ठराविक मुभा नाहीये.

कामगारांना जास्तीच जास्त २० लाखापर्यंत ग्रॅच्युइटी मिळू शकते. पण काही लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की नक्की आम्हाला ग्रॅच्युइटी कशी गणून दिली जाते. चला तर मग आपण ते सुद्धा पाहूया.

ग्रॅच्युइटी कशी काढतात?

ग्रॅच्युइटी = मूळ मासिक उत्पन्न (मूलभूत + DA) X (१५ /२६) x कंपनीत किती वर्ष काम केलं

समजा एका व्यक्तीने एखाद्या कंपनी मध्ये पाच वर्ष काम केलं असेल आणि त्याचे उत्पन्न पस्तीस हजार असेल तर मूळ कमाई + महागाई भत्ता मिळून देण्यात येतो. उदानार्थ पहा

३५०० x (१५/२६) x (५) = १,००,९६१

म्हणजेच त्या कामगाराला १ लाख ९६१ रुपये मिळतील. हा एक फक्त अंदाज आहे पण सर्व कंपनी अशाच प्रकारे ग्रॅच्युइटी काढतात.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल