Home करमणूक हा बॉडी बिल्डर दुसरा तिसरा कुणी नसून ह्या प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्याचा मुलगा आहे

हा बॉडी बिल्डर दुसरा तिसरा कुणी नसून ह्या प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्याचा मुलगा आहे

by Patiljee
60 views

आपल्या उत्कृष्ट सहज सुंदर अभिनयाने संपूर्ण देशाला हसवणारा जॉनी लिव्हर हा अभिनेता म्हणजे प्रत्येकाच्या गळ्यातले ताईत आणि आताही तो ज्या सिनेमात काम करतो त्या मध्ये तो आपले शंभर टक्के देतो. तुम्ही जॉनी लिव्हरला तर ओळखता पण त्याच्या मुलाला ओळखता का तर याचे उत्तर नाही असेल तर जेसी हे त्याचे नाव आहे आणि त्याने बालकलाकार म्हणून 2001 मध्ये आलेली ‘कभी ख़ुशी कभी गम’ या सिनेमात काम केले होते.

या सिनेमात जेसी याने जॉनी लिव्हरच्या मुलाची भूमिका केलेली आहे. या सिनेमात त्याचे डायलॉग ही खूप हास्यास्पद आहेत. तर ही घटना 2001 ची आहे पण आता यावेळी म्हणजे 2019 मध्ये आल्यावर वार सिनेमा तुम्ही पहिला असेल यामध्ये हृतिक रोशन याचा लीड रोल आहे. या सिनेमात जॉनी लिव्हर याचा मुलगा जेस्सी हा ही होता ज्याला कदाचित तुम्ही ओळखले नसेल. सिनेमात हृतिक रोशन याचा सबऑर्डिनेट मुथु आठवते का? जेस्सी ने केलेला रोल या सिनेमात खूप कमी होता पण तरीही इतक्या वर्षांनी त्याला मोठ्या पदाद्यावत पाहून चांगलं वाटले.

Source Google

आता जेस्सी याचे वर 29 वर्षे आहे त्याने आपला अक्टिंग डेब्यु बोमन ईरानी सोबत एका टीव्ही विज्ञापन मध्ये केला होता त्याचबरोबर जेस्सी ने ‘ये साली आशिकी’ (2019) या सिनेमात ही सपोर्टिंग रोल केला होता. त्याच प्रमाणे जेस्सी ला फिट राहायला आवडते. आताच तो सिक्स पैक बॉडी साठी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. तो जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हा त्याला कॅन्सर झाला होता त्याच्याशी लढा दिल्यानंतर तो आज इथपर्यंत पोचला आहे.

त्याला आपल्या वडीलांप्रमाने कॉमेडी करण्यात अजिबात यश आले नाही. तसेच कॉलेज मध्ये असताना त्याने कितीतरी अवॉर्ड आपल्या नावे केले आहेत आता त्याने आपला सगळा फोकस ड्रामा आणि म्युझिक यावर लावला आहे. जेस्सी याने 12 वी नंतर आपले शिक्षण सोडून दिले त्यानंतर न्यूयॉर्क मध्ये Lee Strasberg Theatre & Film Institute येथे अभिनय शिकला त्यानंतर आपल्या बहिणीच्या सांगण्यावरून ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये डिग्री घेतली.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल