Home करमणूक हिरकणी एक धनगर कुटुंबाची सून पण तिने आपल्या बाळासाठी रायगडाची कडा अनेक संकटांवर मात करून उतरली

हिरकणी एक धनगर कुटुंबाची सून पण तिने आपल्या बाळासाठी रायगडाची कडा अनेक संकटांवर मात करून उतरली

by Patiljee
563 views

कालच मी ऑनलाईन हिरकणी चित्रपट पाहिला बघून एका आईची तळमळ आणि आपल्या लहांनग्यासाठी वाटणारी एकप्रकारची मायाळू भीती या चित्रपटामध्ये दर्शवली आहे. चित्रपट खूप छान होता आणि म्हणून यातील थोडेफार क्षण मी तुमच्यासाठी या लेखाद्वारे मांडत आहे आवडली तर आवर्जून हा चित्रपट पहा. हिरकणी तिला सर्वजण हिरा बोलायचे ती वालुसरे गावात म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी असते हे गाव येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होती.

कुटुंबात तिचा नवरा आणि सासू ही माणसे होती पण तरीही आनंदाने राहत होती. ती रायगडावर दूध नेऊन टाकण्याचे काम रोज करायची. तिला एक छोटे बाळ होते, रोजच्याप्रमाणे त्या दिवशीही ही ती दूध टाकण्यासाठी गडावर पोचली आणि काही कारणाने तिला खाली उतरायला वेळ झाला आणि गडाचे दरवाजे बंद झाले.

आता हे दरवाजे उद्या सकाळीच उघडणार होते त्यामुळे त्या माउलीला आपल्या बाळाची खूप आठवण येऊ लागली त्याचा भुकेला आणि रडका चेहरा तिच्या डोळ्यासमोर येऊ लागला, काही करून मला माझ्या बाळाकडे जायचेच आहे अशी तिने मनाशी पक्के ठरवले. त्यासाठी तिने पहारेऱ्यांना पुढे हात पसरले रडली ओरडली पण पहारेकरी महाराजांच्या आज्ञेपुढे हतबल होते. आता दरवाजे सकाळीच उघडणार हे पहारेकरी सांगत होते. त्यांचे म्हणणे होते की गडावर जागा आहे तिथे असरा घ्या आणि सकाळी घरी जा. पण हिरकणी मध्ये सध्या तरी तिची आई बोलत होती. तिला आता थांबायचे नव्हते आपल्या लहान बाळासाठी हे गड काही करून उतरायचे होते.

सगळ्यांच्या नजरा चुकवून तिने अनेक संकटांवर मात केली झाडे, झुडपे, अनेक जंगली सरपटणारे प्राणी, किडे, मुंगे या सगळ्यावर तिने आपल्या बाळासाठी मात केली आणि इतक्या संकटांवर मात करून रायगडाचा अत्यंत घातक असतं कडा ती रात्रीत उतरली आणि आपल्या बाळाकडे पोहोचली. ही गोष्ट जेव्हा महाराजानी सकाळी समजली तेव्हा त्यांनी हिरकणीला साडी चोळीचा मन देऊन आदराने घरी पाठवले आणि त्या कड्यावर एक बुरुज उभारून त्याला हिरकणी असे नाव दिले.

सोनाली कुलकर्णी ने हिरकणी ची भूमिका खूप उत्तम रित्या पार पाडली आहे. प्रसाद ओक ह्यांनी खूप छान दिग्दर्शन केलं आहे. आपण पुस्तकात बऱ्याचदा हा धडा वाचला होता पण पडद्यावर पाहताना सिनेमा खूप छान जमून आला आहे. एकदा सर्वांनी आपल्या कुटुंबासह आवर्जून पाहा.

अशा अनेक माता या जगात अस्तित्वात आहेत ज्यांनी आपल्या मुलांसाठी आपल्या प्राणाची ही पर्वा केली नाही आशा मातांना माझा सलाम आहे.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल