Home करमणूक हितेन तेजवानीची लवस्टोरी आहे खूप छान, पहिल्या लग्नानंतरची दुसरी गोष्ट

हितेन तेजवानीची लवस्टोरी आहे खूप छान, पहिल्या लग्नानंतरची दुसरी गोष्ट

by Patiljee
324 views

टेलिव्हिजन क्षेत्रातील एक मोठं आणि दिग्गज नाव म्हणजे हितेन तेजवानी. आपल्या सदाबहार अभिनयाने त्याने अनेक मालिकेत महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. नेहमीच त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या ह्रुदयात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बिग बॉसच्या ११ व्या सिझन मध्ये जेव्हा हीतेन प्रेक्षकांसमोर आला तेव्हा त्याने आपल्या मनमिळावू आणि शांत स्वभावाने अनेक लोकांकडून वाह वाही मिळवली होती. नेहमीच शांत, इतरांना समजून घेणारा प्रत्येकवेळी समजून सांगणार अशी त्याने आपली छाप बिग बॉस शो मध्ये निर्माण केली होती.

५ मार्च रोजी त्याचा वाढदिवस असतो. १९७४ मध्ये महाराष्ट्रातच हितेनचा जन्म झाला आहे. अभिनयाचा रूची तर लहानपणापासून होतीच. अनेक जाहिराती मध्ये सुद्धा त्याने कामे केली आहेत. पण खरी ओळख मात्र एकता कपूरच्या क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेने दिली. ह्या मालिके अगोदर कुटुंब ह्या सीरियलमध्ये सुद्धा त्याने काम केले होते.

एका जाहिरातीच्या शूटिंग साठी हितेन जेव्हा १९९९ मध्ये बंगळूर इथे गेला होता तेव्हा त्याची गौरी प्रधान सोबत विमानतळावर ओळख झाली. हीच त्याच्या जाहिरातीची अभिनेत्री सुद्धा होती. तिचा तो साधेपणा, बोलण्याची पद्धत, चेहऱ्यावरील नेहमीच गोड हसू, ह्या गोष्टी पाहून हितेनला गौरी पहिल्या भेटीतच छान वाटली. जाहिरातीचे शूट संपेपर्यंत दोघांमध्ये छान गट्टी जमली होती. पण जेव्हा शूट संपले तेव्हा पुढच्या सहा महिन्यात ते एकदा सुद्धा आपापसात बोलू शकले नाही. पहिले कोण समोरून बोलणार हा प्रश्न दोघानाही पडला होता.

काही महिन्यांनी हे दोघंही कुटुंब ह्या मालिकेच्या सेटवर पुन्हा भेटले. ह्या मालिकेतील ह्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप जास्त आवडली. म्हणून एकता कपूर ने आपल्या क्योंकी सास भी कभी बहू थी आणि घर एक मंदिर साठी दोघांना कास्ट केलं होतं. दोघांनीही पुढे जाऊन अनेक मालिका आणि जाहिरातीत काम केलं. त्यामुळे बराच काळ सोबत असल्याने दोघात प्रेम होणं स्वाभाविक होतं.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यांनर हितेन ने गौरीला लग्नासाठी विचारलं आणि तिनेही होकार दिला. पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे की हितेन तेजवानी ह्याचे अगोदर सुद्धा लग्न झालं होतं. घरच्यांचा आणि कुटुंबाच्या आवडीसाठी त्याने हे लग्न केले होत. पण फार काळ हे लग्न टिकलं नाही. २००१ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्याची पहिली पत्नी कोण आहे आणि काय करते ह्याची अधिकृत माहिती कुठच नमूद नाहीये.

Source Hitten Tejwani Social Handle

घटस्फोट दिल्यानंतर तीन वर्षाने हितेनने गौरी सोबत २००४ मध्ये लग्न केलं. त्यांना आता कात्या आणि नेवान ही दोन जुळी मुलं सुद्धा आहेत.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल