Home Uncategorized Honda च्या ह्या कारवर मिळत आहे २.५ लाखापर्यंत डिस्काउंट

Honda च्या ह्या कारवर मिळत आहे २.५ लाखापर्यंत डिस्काउंट

by Patiljee
819 views
Honda

कार विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही ऑफर, घेऊनच येत असतात. Honda Cars इंडियाने सुद्धा अशीच एक ऑफर ग्राहकांसाठी आणली आहे. बंपर डिस्काउंट असे ह्या ऑफरचे नाव आहे. सध्या होंडाच्या सर्व गाड्या BS6 इंजिन मध्ये उपलब्ध आहेत.

काही महिने लॉक डाऊन सुरू असल्याचे होंडाच्या गाड्यांची खरेदी विक्री जास्त प्रमाणात झाली नाही. त्यामुळे आता ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी होंडाने होंडा अमेज, होंडा सिटी आणि होंडा सिविक ह्या गाड्यांच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट देत आहेत.

होंडा सिटी (Honda City)

होंडा सिटी हा मॉडेल अनेकाच्या पसंतीचा आहे. सध्या जर तुम्ही नवीन मॉडेल खरेदी केलात तर तुम्हाला दीड लाखापर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. BSVI च्या SV MT/V MT पेट्रोल मॉडलवर २५ हजाराचा कॅश डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही तुमची जुनी कार एक्सचेंज केलीत तर तुम्हाला अधिक २० हजाराचा डिस्काउंट मिळेल.

BSVI V CVT ह्या मॉडेल वर ३१ हजार आणि कार एक्सचेंज केलीत तर २० हजार, BSVI VX MT पेट्रोल मॉडेलवर ५५ हजार कार एक्सचेंज केलीत तर ३५ हजार, BSVI ZX CVT पेट्रोल १.१० लाख कार एक्सचेंज केलीत तर ५० हजार डिस्काउंट मिळत आहे.

होंडा सिविक (Honda Civic)

होंडा सिविक ह्या मॉडेल २.५० लाखापर्यंत भरघोस डिस्काउंट मिळत आहे. ह्यामधील BSVI ह्या पेट्रोल मॉडेल वर १ लाख रुपया पर्यंत कॅश डिस्काउंट मिळत आहे. ह्यामधील डीझल मॉडेलवर सुद्धा अडीच लाखापर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

होंडा अमेज (Honda Amaze)

होंडा कंपनी आपल्या होंडा अमेज ह्या BS6 मॉडेलच्या खरेदीवर २७ हजारावर कॅश डिस्काउंट देत आहेत. ह्या ऑफर अंतर्गत जर तुम्ही होंडा अमेज मॉडेल खरेदी करताना तुमची जुनी कार एक्सचेंज केलीत तर चौथ्या आणि पाचव्या वर्षापर्यंत एक्सटेंडेड वारंटी मिळेल.

जर तुम्हाला Honda Car खरेदी करायची असेल तर नक्कीच शो रूम मध्ये जाऊन ह्या ऑफरचा लाभ घ्या.

हे पण आर्टिकल वाचा

Please follow and like us:

Related Articles

2 comments

भारतातील VIP झाड » Readkatha August 18, 2020 - 5:00 pm

[…] होंडाच्या ह्या कारवर मिळत आहे २.५ लाखा… […]

Reply
वीज बिलात गफलत » Readkatha August 21, 2020 - 10:05 am

[…] होंडाच्या ह्या कारवर मिळत आहे २.५ लाखा… […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल