सतीशला समोर पाहताच प्रियाला ही धक्का बसला तिच्या हातातील चहाचा ट्रे खाली जमिनीवर गळून पडला. तिने ते सर्व न पहातच बेड रूम मध्ये गेली आणि स्वत ला लॉक करून घेतले. सतीशच्या चेहऱ्यावर तर बारा वाजले होते”फुलवा इथ कशी आणि हिने आपल नाव ही बदललं आहे पण ही इथे आलीच कशी? मला तरी वाटे आहे की हिने जितूला फसवले आहे आणि जितू ही फसला हिच्या जाळ्यात भोळाच तो कोणीही लहान बाळ ही पुरेसे आहे त्याला फसवयला.
सतीशच्या मनात विचारांचे काहूर पेटले होते आणि तिकडे प्रिया ही तशीच रूम मध्ये जाऊन बसली हे जितूला थोड पटण्यासारखे नव्हते. त्याने जितूच्या पाठीवर हाताने आधार दिला आणि समजावले सतीश काय झाले तुला अरे असा अचानक प्रियाला बघून धक्का का बसला तुला? अरे तो खूप चांगली मुलगी आहे. “चांगली मुलगी म्हणजे तुला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही वाटे” अरे सतीश कसं सांगू तुला तिने तुला खूप मोठा धोका दिलाय ती कोण आहे माहीत आहे तुला फुलवा नाव आहे तीच आणि ती एक वैश्या आहे. तिने तुला फसवले आहे शिवाय आपले नाव ही बदलले आहे. आणि तू फसलास हो ना!
जितू उभा असलेल्या सतीशला हाताने खाली बसवतो आणि म्हणतो सतीश हे पाणी पी आणि आता मी जे काय सांगेन ते नीट ऐक आणि मग मला तुझं उत्तर दे. ठीक आहे सतीश ने होकारार्थी मान हलवली. माझी आणि प्रिया म्हणजे तुला जसं माहीत आहे तस फुलवा आमची दोघांची भेट दोन वर्षांपूर्वी झाली होती. ती त्या रात्री एका रोडवर उभी होती. तेव्हा ती वैशा व्यवसाय करत होती पण ती हा व्यवसाय का करते हे कोणीच पडताळून पाहिले नाही. तिने ही काम करण्याचा प्रयत्न केला नाही असे तुला वाटे का? जॉब खूप पाहिले पण तिथे अनेक नजरा तिला खायला उठत होत्या. प्रत्येक क्षणी तिच्या देहाचे लचके तोडणारे बॉस पासून कारकून पर्यंत अनेक जण तिला भेटले पण सगळे असेच होते. त्यासाठी कारण होते तिचे सौंदर्य आणि महत्वाचे म्हणजे ती एक स्त्री होती ही गोष्ट पुरेशी होती.
तिला कामाची खूप गरज होती आणि म्हणून ती हे सर्व सहन करत होती. तिथे काम करताना तीच एका मुलासोबत प्रेम झाले तीच त्याचावर खर प्रेम होते. पण त्याने पैशासाठी हिला वैश्या व्यवसायात विकले आणि तिथेच तिने हार मानली. घरात असणाऱ्या अपंग आई वडिलांसाठी तिने आपल्या देहाची ही अपेक्षा ठेवली नाही. जो बाप तिला पोटात असतानाच मारायला निघाला होता आज तीच मुलगी त्यांचा आधार आहे.
तुला वाटत असेल मी हीच्याही लग्न नव्हते करायला पाहिजे पण तुला सांगू मी एका निष्पाप आणि पवित्र मुलीशी लग्न केले आहे. ज्यांना आपल्यासारखे पुरुषच अपवित्र करत असतात. आणि त्या जशा अपवित्र होतात तसेच पुरुष ही अपवित्र होणार ना! पण सर्व दोष स्त्रियांनाच का दिला जातो. पुरुष ही तितकेच जबाबदार आहेत.
तुला खरंच सांगू फुलवा खूप चांगली मुलगी आहे रे तिच्याबद्दल अजुन तरी कोणाला इथे माहीत नाही. मला बदनामीची अजिबात भीती नाही फक्त लोक तिला बोलतील याची भीती वाटे आहे. मी तुझ्यापुढे हात जोडतो तू हे सगळं कोणालाच सांगणार नाही आणि हात जोडून जितू सतीश पुढं अश्रू गाळत उभा होता. सतीश ने जितूला क्षणार्धात जवळ घेतले आणि एक घट्ट मिठी मारली. म्हणाला तू खरंच एक चांगला मित्रच नाहीस तर उत्तम माणूस ही आहेस. तुझ्यापुढे कितीदा हात जोडले तरी ते कमीच त्याने जितू ला पुन्हा वहिनीला आणायला सांगितले. वहिनीची जितू ने नव्याने ओळख करून दिली. जितूने वहिनीसाठी आणलेली गिफ्ट साडी दिली. सगळं कसं आनंदात आणि उत्साहात पार पाडले गेले.
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)
1 comment
[…] कथेचा दुसरा भाग इथे क्लिक करून वाचा […]