Home विचार आयुष्यात ह्या चुका करू नका त्यामुळे तुमच्या नशिबात फक्त दारिद्य येईल

आयुष्यात ह्या चुका करू नका त्यामुळे तुमच्या नशिबात फक्त दारिद्य येईल

by Patiljee
293 views

मित्रांनो सध्या माणूस हा फक्त पैशाच्या मागे लागलेला आहे. त्याला आजूबाजूला घडणाऱ्या इतर गोष्टींपेक्षा पैशाचे महत्व जास्त वाटते, आणि हो ते करणे ही खरतर त्याच्या हितासाठी आहे. कारण बघा सध्या तरी माणूस पैशा शिवाय काहीच करू शकत नाही म्हणजेच अन्न वस्त्र निवारा या गरजा तर आहेतच पण याशिवाय ही अशा काही गरजा आहेत त्यासाठी माणसाजवळ पैसा असणे आवश्यक झाले आहे. साधी पिण्यासाठी पाण्याची बॉटल घ्यायला गेलो तरी २० रुपये मोजावे लागतात.

अशा या व्यवहारी दुनियेत जगण्यासाठी मनुष्याला पैशाची गरज आहेच पण जर हा पैसा तुम्ही उचित वेळी कमावला आणि खर्च केला तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल नाहीतर तुम्हाला यात तोटा होईल हे नक्कीच. आपल्या देशात गरीब लोकांची संख्या श्रीमंत लोकांपेक्षा जास्त आहे आणि ही गरीब लोक काय करतात तर आपले सर्व लक्ष एका ठिकाणी केंद्रित करतात ती म्हणजे पैशाची बचत करणे, आता तुम्ही म्हणाल पैशाची बचत करणे यात वाईट काय आहे तर यात वाईट काहीच नाही पण ज्या बचतीसाठी तुम्ही वेळ वाया घालवता.

त्या वेळात तुम्ही अजुन पैसे कमवण्याचे मार्ग शोधा त्यातून तुमची बचत ही होईल आणि खर्च ही करता येईल. आणि म्हणून बचत करा पण त्याचबरोबर तुमचे उत्पन्न ही वाढवा.
ज्या गोष्टींची तुम्हाला जास्त गरज आहे किंवा यापुढे जाऊन भविष्यात त्या गोष्टींपासून तुम्हाला नफा मिळणार असेल अशा गोष्टी खरेदी करा. ज्यामुळे तुमचे नुकसान तर होणार नाही उलट फायदा होईल, आता तुम्ही जर नवीन कार विकत घेतली तर पुढे जाऊन तिच्यासाठी पेट्रोल किंवा दुरुस्तीचा खर्च येणार हे तुम्हाला माहीत आहे पण त्याच ठिकाणी तुम्ही एखादी जमीन किंवा सोने अशा प्रकारच्या योजना आखून त्यावर पैसा खर्च करा जेणेकरून पुढे भविष्यात तुम्हाला या गोष्टींचा तोटा तर मुळीच नाही होणार उलट फायदा होईल.

आता आपला मेंदू हा असा एक कॉम्प्युटर आहे ज्यामधे आपण कितीही भरले तरी कमीच असते यासाठी आपण आयुष्यभर शिकलो तरी कमी पडेल इतकी शक्ती त्यात असते. आपण त्यासाठी आपण आपल्या मेंदूला चालना द्यायला हवी. पुढे जाऊन आपल्या भविष्यासाठी किंवा वर्तमानसाठी चांगले कोर्स करायला हवेत. जेणेकरून या जगात कोणत्याही ठिकाणी आपण काम करताना कमी पडायला नको. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा शिक्षणासाठी खर्च करायला हवा. नाही तिथे पैसा खर्च न करता चांगले कोर्स करा ज्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सारखी लोक आयुष्यात वेळेला महत्व देत नाही. आपल्याकडे भरपूर वेळ असतो पण त्याचा आपण पुरेपूर वापर करत नाही, वेळ असतो तेव्हा फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम पाहणे, गप्पा मारणे, जोक वाचणे, व्हिडिओ पाहणे यातच तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ घालवत असता, पण हाच वेळ वाया न घालवता तो एखादे काम करण्यास घालवा भरपूर अशी काम आहेत जी आपण ऑनलाईन फावल्या वेळात ही करू शकतो, त्यामुळे तुमचा वेळही चांगला जाईल आणि पैसा ही हातात येईल.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल