भारतीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू येतात आणि जातात. पण काही असे खेळाडू सुद्धा असतात ते जरी कमी वेळ भारतीय संघासाठी खेळले असले तरी क्रिकेट रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करतात. अत्यंत कमी वेळात त्यांनी आपले नाव उंचावलेले असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका क्रिकेटरच्या वयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत जे कदाचित तुम्हाला माहिती नसेल.
हा असा क्रिकेटर आहे ज्याचे क्रिकेट करीयर जरी फ्लॉप ठरले असले. तरी त्याने आपल्या वयक्तिक आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी कमावल्या आहेत. त्याचे लग्न महाराणी सोबत झाले आहे. त्या क्रिकेटरचे नाव आहे श्रीसंत. आयपीएलमध्ये काय झाले ते तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. पण ह्या काळात सुद्धा त्याच्या पत्नीने त्याला खूप मौलाची साथ दिली. ह्या दोघांचे लग्न १३ डिसेंबर २०१३ मध्ये झाले.

त्याच्या पत्नीचे नाव भूनेश्र्वरी आहे. ती जयपूरच्या शेखावत परिवारातील राजकुमारी आहे. राजपूत घराण्याशी तिचा संबंध आहे. ह्या दोघांचे लग्न मोठ्या थाटामाठात शाही पद्धतीने झाले होते. लग्नात अनेक शाही लोक, अभिनेते, खेळाडू आणि राजकारणी लोकांनी हजेरी लावली होती.
क्रिकेटपासून लांब राहिल्यानंतर श्रीसंत ने अनेक सिनेमामध्ये सुद्धा कामे केली आहेत. त्यांनतर कलर्स वरील बिग बॉस शो मध्ये आपल्याला तो दिसला होता. जरी हा शो दीपिका कक्कड जिंकली असली तरी श्रीसंत ने अनेक लोकांचे मन मात्र ह्या शो मध्ये जिंकले होते. खतरों के खिलाडी मध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलेच होते.