आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल नेहमीच आपल्याला उत्सुकता असते. खास करून त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच सहा कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या घरी यावर्षी नवीन पाहुण्यांचे आगमन झाले आहे. त्यांच्या घरात नवीन बाळ आले आहे. कदाचित तुम्हाला हे माहित नसेल. चला तर मग पाहुयात कोण आहेत ते.
१. कपिल शर्मा
कॉमेडी क्षेत्रातील किंग असे ज्याची ओळख असणारा कपिल शर्मा करोडो लोकांच्या हृदयातील ताईत आहे. पण आनंदाची बातमी म्हणजे कालच त्याने आपल्या सोशल मीडिया द्वारें अकाउंट वरून आपल्या घरात नवीन पाहुणा आला आहे म्हणून बातमी दिली आहे. त्यांच्या आयुष्यात एक छान अशी गोंडस मुलीने आगमन केलं आहे. अनेक बॉलीवूड स्टार ह्यांनी त्याला सुभ्छेचा दिल्या आहेत.

२. सुरवीन चावला
टेलिव्हिजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरवीन चावला हिने अनेक भाषेत काम तर केलेच आहे शिवाय अनेक चित्रपटात सुद्धा आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. यावर्षी तिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे आणि तिचे नाव इवा ठेवलं आहे.

३. समीरा रेड्डी
रेस, नो एंट्री आणि मुसाफिर ह्या सारख्या अनेक चित्रपटात काम करणारी अभिनेत्री समीरा रेड्डी हिने २०१४ मध्ये व्यावसायिक अक्षय वर्दे सोबत लग्न केलं. यावर्षी तिने एका मुलीला जन्म दिला आहे आणि तीच नाव नयरा ठेवलं आहे आणि ह्या आधीही त्यांना एक मुलगा आहे ज्याच नाव हंस आहे.

४. जय भानुशाली
टेलिव्हिजन क्षेत्रातील अँकर म्हणून प्रसिद्ध असलेला जय भानुशाली ह्यांनी अनेक रिऍलिटी शो मध्ये काम केलं आहे. यावर्षी ह्याच्या घरी सुद्धा मुलगी जन्माला आली आहे. त्यांनी आपल्या मुलीचे नाव तारा ठेवलं आहे.

५. ईशा देओल
दिग्गज अभिनेता धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी ह्यांची कन्या इशा देओल हिने सुद्धा अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. यावर्षी हिने सुद्धा मुलीला जन्म दिला आहे तिचे नाव मिराया ठेवलं आहे. ह्या आधीही त्यांना दोन वर्षाची एक मुलगी आहे तीच नाव रद्ध्या आहे.

६. सौम्या टंडन
सर्वांचा आवडती मालिका भाबिजी घर पे हैं मधील गौरी मेम म्हणजेच सौम्या टंडन हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी आपल्या बाळाचं नाव मिरान ठेवलं आहे.

तुम्ही ह्या सका कलाकारापेकी कुणाचे चाहते आहात आम्हाला कमेंट द्वारें कळवा.