Home करमणूक बाजीप्रभू ह्यांच्या कर्तुत्वाची गाथा पडद्यावर

बाजीप्रभू ह्यांच्या कर्तुत्वाची गाथा पडद्यावर

by Patiljee
2208 views
Jangjohar movie

लॉक डाऊन मुळे बरेचसे मराठी चित्रपट लटकले आहेत. हे वातावरण शांत झाल्यावर अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक चित्रपटांची मेजवानी आपल्या समोर सादर होणार आहे. आज अशाच एका चित्रपटाचा पोस्टर आज समोर आला आहे. ज्यांच्या पराक्रमाची गाथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत तो प्रत्यक्ष प्रवास आपल्या डोळ्यासमोर दिसणार आहे.

Jangjohar movie

जंगजोहर असे सिनेमाचे नाव असून हा सिनेमा बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या अमर बलिदानाची गाथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा दिगपाल लाजेकर दिग्दर्शित तर अलमोंड क्रिएशन् प्रस्तुत एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण कोरोना मुळे थोडे बाकी असून जास्तीत जास्त चित्रीकरणाच्या भाग हा पूर्ण झाला आहे. सिद्दी जोहरच्या वेढ्याचे जिवंत आठवणी ह्या चित्रपटातून दाखवायचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

बाजीप्रभू आणि फक्त ६०० मावळे आणि बांदल सेना कश्याप्रकारे सिद्धी जोहर आणि मोघलांच्या मुकाबला करून वेढा तोडून लढतात हे अती साहसी पणाने दाखवायचा पराक्रम केला आहे. हा सिनेमा एक भव्य दिव्य असणार ह्यात काही शंका नाही.

फर्जंद आणि फत्तेशिकाश नंतर हा तिसरा चित्रपट आहे ज्यामध्ये अंकित हे पुन्हा एकदा आपल्या थरारक आणि मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. पुण्याजवळील चांडवळ येथे या चित्रपटाचे काही भाग चित्रीकरण करण्यात आले आहेत.

Jangjohar movie

बाजीप्रभूंनी आणि मुठभर मावळे आणि बांधलं सेनेचे पराक्रम जगभर अमर आहेत.त्यांचा प्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर भेटीस येणार जांगजोहर हा चित्रपट प्रेक्षक डोक्यावर उचलून धरतील अशी अपेक्षा आहे.

हे पण वाचा परत येतोय स्वामीमय प्रवास, देऊळ बंद २ सिनेमा ह्या दिवशी होणार प्रदर्शित

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल