मित्रानो तुमच्या अगदी जवळची व्यक्ती जिच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार असता. अशी जवळची व्यक्ती ही कोणत्याही कारणामुळे तुम्हाला जर सोडून गेली असेल तर त्यात तुम्ही दोषी असतात असे नाही. खरं तर ती व्यक्ती आपल्याला का सोडून गेली याचा विचार अगोदर आपण करायला हवा, जर तुमची कोणतीही चूक नसेल आणि एखाद्या स्वार्था पायी ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असेल तर मग ती व्यक्ती आताच तुम्हाला सोडून गेली हे नक्कीच चांगले झाले.
कारण यापुढे जाऊन अधिक काळ तुम्ही तिच्यासोबत घालवल्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असती तर मात्र हे दुःख पचवायला तुम्हाला खूप त्रास झाला असतां.
शिवाय अशा व्यक्तिपासून लांब राहूनच तुम्ही जीवनात पुढे जाऊन यशस्वी होऊ शकता ही गोष्ट लक्षात ठेवा. जर ती व्यक्ती सोडून जाण्यात तुम्ही कारणीभूत असाल तर मन धीट करून त्या व्यक्तीची माफी मागा आणि तुमचं नातं घट्ट करा. यामध्ये कधी जिवलग मित्राकडून तर कधी प्रेमातून धोका मिळत असतो तर कधी रक्ताच्या नात्यातूनही, काहींना अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो.
जगात असे धोके देणारे विविध ठिकाणी मिळतील अनोळखी व्यक्तिपासून ते रक्ताच्या नात्यापासून असे लोक तुम्हाला प्रत्येक वेळी भेटत असतात, आणि म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीसाठी रडायला लागतात तर तुम्ही तुमचं जगणं विसरून जाणार त्यामुळे दुखं लगेच तिथच झिडकारून टाका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा या जगात कोणत्याही व्यक्तिपासून कसली अपेक्षा ठेवू नका. म्हणजेच काय असते तर एखाद्या व्यक्तिपासून आपण जास्त अपेक्षा ठेवतो आणि त्या व्यक्तीकडून ती पूर्ण होत नाही त्यामुळे त्यातून तुम्हाला त्रास होतो.
अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात अचानकपणे नकारात्मक भावना निर्माण होते.
यापुढे जाऊन मग वाद विवाद होतात. आणि म्हणून कधीही या जगात भावनिक विचार करू नका आयुष्यात नेहमी व्यवहारी रहा. कारण हे जगच व्यवहारी झालेले आहे, आणि अस केल्याने तुम्ही सुखी राहू शकता.