Home विचार तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या खोटारड्या लोकांना ओळखा अशा पद्धतीने

तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या खोटारड्या लोकांना ओळखा अशा पद्धतीने

by Patiljee
646 views

मित्रांनो या जगात अशी माणसे आहेत ज्यांचा स्वभाव हा वेगवेगळ्या तऱ्हेचा आहे. कुणी रागीट तर कोणी शांत तर कोणी भोळा तर कोणी कपटी अशी लोक रोजच आपल्या आजूबाजूला असतात. पण कधी कधी आपण अशा लोकांचा स्वभाव ओळखायला चुकतो. अशी लोक आपल्याला नेहमी वरुन प्रेम दाखवत असतात पण मनातून खूप कपटी आणि खोटारडे असतात. पण अशा लोकांना तुम्ही तुमचे मित्र मनात पण खरच का ही लोक तशी आहेत हे ओळखणे तुमच्या हातात आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही ओळखू शकता. जेणेकरून तुम्ही वेळेवर सावध व्हाल.

काही लोक किंवा मित्रपरिवार तुम्हाला बरेच दिवसांनी भेटल्यानंतर त्याचा स्वभाव तुम्हा ओळखता यायला हवा त्याच्या चेहऱ्यावरील हवं भाव, तुम्हाला भेटल्यानंतर होणारा खूप जास्त आनंद किंवा अतिउत्साह पना हे सगळे तुम्हाला लगेच पाहायला मिळते खर तर हा व्यक्ती तुम्हाला भेटून अजिबात आनंदी नसतो पण तो फक्त तुम्हाला दाखवत असतो की त्याला किती आनंद झाला आहे. हा अतिउत्साह तुम्हाला ओळखता यायला हवा.

अशी लोक तुम्हाला भेटल्यानंतर फक्त स्वतः बद्दल सांगायला त्यांना आवडते. स्वतःची स्तुती करणे किंवा त्याने कमावलेला पैसा किवा त्याची नोकरी पगार त्याने केलेले उपकार या गोष्टी बद्दल हा व्यक्ती सलग आपल्याला काही ना काही सांगत असतो. यांना कपटी लोक म्हणतात, तो जर चांगला मित्र असेल तर ती तुमच्याबद्दल विचारेल चौकशी करेल पण असे वागणारे लोक हे कधीच तुमचे चांगले मित्र नसतील हे लक्षात घ्या.

ही लोक तुम्हाला भेटल्यावर त्यांचा एकच उद्देश असतो तो म्हणजे तुमचा अपमान करणे, अपमान म्हणजे प्रत्यक्ष नाही तर आ प्रत्यक्ष पने ते तुमचा अपमान करत असतात. कोणत्या ना कोणत्या गोष्टी वरून तुम्हाला नेहमी खालीपणा आणतात आणि त्यामुळे कधी कधी तुमचे मन ही दुखते पण त्याच्या त्यांना काहीच फरक पडत नाही.

अशी लोक तुमच्याशी बोलताना फक्त त्यांचे बोलणे तुम्हाला ऐकवत असतात पण तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो, जेव्हा तुम्ही तुमचे मत मांडत असतात तेव्हा अशी लोक वेगळ्याच विषयाला धरून बोलत असतात. यावरून समजून जा की ही लोक कपटी आहेत.

ही लोक जेव्हा बोलत असतात तेव्हा नेहमीच दुसऱ्यांच्या दुःखां बद्दल किंवा दुसऱ्यांचे वाईट झाले यांबद्दल तुमच्या सोबत बोलत असतात आणि अशा लोकांनां लगेच ओळख कारण अशी लोक तुमच्याबद्दल ही दुसऱ्या लोकांनां असेच सांगत असतील ही गोष्ट तुमच्या लगेच डोक्यात यायला हवी.

ही लोक गरज असेल तोपर्यंत तुमच्याशी गोडी गुलाबीने बोलणार पण समजा एकदा का तुमच्याकडून ते काम करून घेतले आणि यापुढे तुमची त्यांना गरज नसेल आणि मग त्या लोकांचे तुमच्याही वागणेच बदलून जाते ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला ही वेळ जातो.

मित्रांनो या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तींमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात असतात पण त्याचा अतिरेक झाल्यावर मात्र नाती तुटताना वेळ लागत नाही.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल