Home संग्रह जिराफ हा प्राणी एक महिना पाण्या शिवाय राहू शकतो, अजुन त्याबद्दल बरेच काही वाचा

जिराफ हा प्राणी एक महिना पाण्या शिवाय राहू शकतो, अजुन त्याबद्दल बरेच काही वाचा

by Patiljee
408 views

सर्वात उंच असणारा हा प्राणी आपल्याला याच्याबद्दल खूप कमी माहिती आहे. हे तुम्ही याअगोदर ऐकले नसेल, पिवळा रंग आणि त्यावर काळे ठिपके असा दिसणारा या प्राण्याची झोप खूप कमी असते. म्हणजे दिवसभरातून हा प्राणी फक्त 15 ते 30 मिनिट इतकाच झोपतो. आणि त्याची लांबी ही 18 फूट इतकी च वाढते. त्याची पाणी पिण्याची क्षमता ही सुद्धा खूप जास्त असते. दिवसभरातून जिराफ जवळ जवळ 38 लिटर पाणी पितो. पण त्याला महिनाभर जरी पाणी मिळाले नाही तरी ती राहू शकतो. जंगलात जास्त करून जिराफ हा प्राणी आढळतो. शिवाय तो शाकाहारी प्राणी आहे. तो झाडाचा पाला, फळे झुडपे हे अन्न खातो.

जिराफची मान लांबलचक असते हे आपल्याला सर्वानाच माहित आहे आणि या लांब माने मुळे त्याला पाणी पिण्यास त्रास होतो. त्यामुळे पुढचे दोन्ही पाय हे एकमेकांपासून थोड्या लांब अंतरावर ठेऊन पाणी पीत असतो, जिराफचे पुढचे पाय हे मागच्या पायापेक्षा लांब असतात.

त्याच्या मानेप्रमाने त्याची जीभ सुध्दा लांब असते आणि तिचा रंग ही निळसर आणि काळी पट असतो. तिची लांबी जवळ जवळ २१ इंच असते, तो आपल्या जिभेने काटेरी झाडाची पाने ही सहज रीतीने खाऊ शकतो.

जिराफची मादी फक्त एकच पिल्लाला जन्म देते आणि जन्माला आल्या वर ही पिल्ले 2 तासात लगेच चालायला लागतात.

मादी जिराफ आणि नर जिराफ या दोघांच्या उंचीमधे फरक असतो. मादी ही नरापेक्षा उंचीने आणि वजनाने ही कमी असते याउलट नर जिराफचे असते. त्यांच्या डोक्यावर शिंगाच्या दोन जोड्या असतात.

यापूर्वी जिराफ या प्राण्यांच्या इतर प्राण्यांप्रमाणे खूप जाती होत्या. पण सध्या तरी एकच जात आढळून येते तिचे नाव आहे जिराफा कॅमेलोपार्डेलिस. हा कळपात राहणारा प्राणी आहे. तसेच तो आपल्या शत्रूला आपल्या लांब पायाने जोराचा मारा करतात.

आपल्याला माहिती आहे काय की जिराफच्या हृदयाचे वजन 11 किलोग्रॅम असते. हा प्राणी फक्त दुपारी आराम करतो बाकी दिवसभर तो चरत असतो.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल