दरवर्षी बिग बॉसची महाजत्रा कलर्स वाहिनीवर भरत असते. सर्वात जास्त टीआरपी खेचून आणणारा शो म्हणून बिग बॉसची खास ओळख आहे. पण दरवर्षीपेक्षा ह्या वर्ष सर्व विक्रम मोडीत काढत टीआरपीचा एक वेगळा आणि सर्वात मोठा उच्चांक ह्या रिऍलिटी शो ने पार केला आहे. दरवर्षी तीन महिने चालणारा हा शो जास्त टीआरपी मिळत असल्याने ह्यावर्षी चार महिने वाढवण्यात आला आहे. तुम्हा आम्हाला माहितच असेल.
फिनाले साठी दोन आठवडे बाकी असताना प्रत्येक स्पर्धक जिंकावा म्हणून स्पर्धक आणि त्यांचे चाहते कसोटीचे प्रयत्न करत आहेत. सध्या घरात असिम रियाज, सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गील, आरती सिंग, रश्मी देसाई, पारस छा ब्रा, माहिरा शर्मा आहेत. ह्यात प्रेक्षकांचा विचार केलात तर टॉप थ्री मध्ये सिद्धार्थ, असिम आणि शहनाज येऊ शकते. कारण नेहमीच त्यांना जास्त व्होटिंग मिळत असते आणि इंटरनेटवर त्यांच्याच गोष्टी आणि ट्विट ट्रेण्ड होत असतात.
पण ह्या सर्वाच्या विरुद्ध असिम रियाज साठी खूप चांगली बातमी समोर आली आहे. WWE मधील प्रसिद्ध रेसलर म्हणजेच तुम्हा आमचे जॉन सिना ह्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर असिम रीयाजचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्याला सप्पोर्ट केलं आहे. ही भारतासाठी आणि असिम साठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जॉन सिनाच्या अकाऊंटवर जाऊन पाहू शकता. काहींच्या मते असिमच्या चाहत्यांनी हे मुद्दाम काही करून फोटो पोस्ट केले आहे असे म्हणणे आहे. किती खरं किती खोटं ह्यापेक्षा जॉनच्या वयक्तिक अकाऊंटवर असलेला फोटो सर्व सांगून जातो.
तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं मित्रानो आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही जर बिग बॉस आधी पासून पाहत आलेला आहात तर आतापर्यंतचा प्रवास पाहता कोण विजेता व्हावा अशी तुमची इच्छा आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा.