बऱ्याच दिवसांनी ती अचानक समोर आली. मला काहीच कळत नव्हत मी हे स्वप्न पाहत आहे की ती खरंच माझ्या समोर आली आहे. मी स्वतःला चिमटा काढला तर हे खरंच होत. तिच्या लग्नाला दोन वर्ष झाली असतील पण एवढ्या वर्षात ती दिसली नव्हती आणि आज अचानक समोर आली त्यामुळे मी तिला ओळखू शकलो नाही. ह्याचे कारणही तसेच आहे म्हणा कारण जेव्हा तिचं लग्न झाले होते तेव्हा ती छान सुंदर मजबूत बांधा, लांबसडक केस आणि बिना मेकअप सुद्धा ती खूप सुंदर दिसायची. पण एवढ्या दोन वर्षांनी तिला पाहिले तर तिची तब्बेत खालावली होती. डोळ्याच्या खाली ब्लॅक सर्कल आले होते. सुंदरता जणू नष्ट झाली होती. चेहऱ्यावरील तेज हरवून गेल होतं.
मी खूप विचारात पडलो असे का झाले असेल? काही झाले तर नसेल ना तिला? किंवा तिला कोणता आजार तर नसेल ना? अशा असंख्य प्रश्नांनी माझ्या डोक्यात काहूर माजविला होता. तिच्या आठवणी मला भूतकाळात घेऊन गेल्या. ती म्हणजे माझी वैशू मी तिला लाडाने सोनी म्हणत असे. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा ती मला ज्युनियर होती. पण कधी ती माझ्याशी ज्युनियर सारखी वागळीच नाही. नेहमी आमच्या ग्रुप मध्ये येऊन कल्ला करत असे. सर्व तिला लेडी डॉन म्हणूनच ओळखायचे.
तिचे आणि माझे प्रेम प्रकरण संपूर्ण कॉलेजला माहीत होत म्हणून सर्व तिला वहिनी म्हणूनच हाक मारत होते. पण म्हणतात ना जेवढे तुम्ही चांगले दिवस सोबत काढता त्यालाच कुणाचीतरी नजर लागते आणि आपल्या स्वप्नाचा चक्काचूर होतो. असेच काहीतरी आमच्यासोबत झाले.तिची आणि माझी जात वेगळी असल्या कारणांनी तिच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला विरोध केला. त्यांचेही बरोबर होते म्हणा कारण कुठेच जॉब करत नव्हतो. जॉब साठी प्रयत्न करत होतो. पण कुठेच काम मिळत नव्हत. त्यामुळे तिच्या वडिलांनी जातीच कारण सांगून विषय संपवून टाकला.
मी सोनिसोबत बोललो आपण पळून जाऊन लग्न करू पण तिला आई बाबांच्या शब्दापुढे जायचं नव्हतं म्हणून तिनेही नकार दिला. वाईट तर खूप वाटले खूप रडलो पण नंतर मनाला सावरले कारण आमचे प्रेम तीन वर्ष होते आणि एवढ्या अनेक वर्षापासूनची आई बाबांची साथ ती माझ्यासाठी का सोडेल. आणि पुढे नको व्हायचं तेच झालं तिच्या वडिलांनी तिच्यासाठी गडगंज संपती असलेला मुलगा पहिला आणि अवघ्या दोन महिन्यात तिचं लग्नही लाऊन दिलं. ती सुखी तर नव्हती पण आई बाबांच्या इच्छे खातर तिने हे लग्न केलं आणि आमच्या प्रेमाची आहुती तिने दिली.
तेव्हापासून ते आतापर्यंत ना तिने मला कधी कॉल केला ना कधी मेसेज किंवा कधी भेटली सुधा नाही. पण दोन वर्षानंतर ती माझ्या समोर आली आणि तीही ह्या अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटलं. मी जवळ जाऊन तिला आवाज दिला. तिने मला पाहिले आणि जणू तिच्या चेहऱ्यावर बऱ्याच वर्षांनी हसू आले असावे अशी ती हसली. माझ्याजवळ आली आणि म्हणाली कसा आहेस मनी (प्रेमाने ती मला मनी म्हणायची) मी म्हटलं मी ठीक आहे पण तू ही काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची? स्वतःकडे लक्ष दे जरा अगोदर काय होतीस तू आणि आता काय आहेस? माझ्या ह्या प्रश्नाने तिला मला बरेच काही सांगावेसे वाटतं होत पण गावच्या वेशीवर तिला बोलता नाही आले म्हणून तिने सांगितलं की आपण संध्याकाळी भेटू.
ठरल्या प्रमाणे आम्ही आमच्या नेहमीच्या जागेवर भेटलो. आल्या आल्या तिने मला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. मी खूप रडू आवरण्याचा प्रयत्न केला पण ती थांबतच नव्हती. काय झाले सोनी सांगणार आहेस का मला? तू बोल ली नाहीस तर कसे कळेल मला. तिने रडू आवरत मला सर्व सांगायला सुरुवात केली. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस छान गेले. पण नंतर नवऱ्याने त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली. लेट नाइट मित्रांसोबत पार्टी करून घरी येणे. घरी आल्यावर एखाद्या पिसाटलेल्या कुत्र्यासारखा माझ्या अंगावर येऊन माझ्या शरीराचे लचके तोडणे हेच चालू आहे त्याचे अनेक महिने. व्हिडिओ पाहून त्यासारखे प्रकार माझ्यासोबत करणे, मी विरोध केला की मला मारणे हे चालूच आहे गेली वर्षभर. प्रेम असे काही राहिलेच नाही रे किंवा त्याच्याकडून कधी प्रेम नव्हतच मुळात.
मला वाटतं होत की मूळ बाळ झाले की हा सुधारेल. म्हणून मी त्याला सांगितले की आपण बाळाचा विचार करूया तर त्याला बाळ नको आहे आणि ह्याचे कारण असे की बाळ झाले तर तुला प्रेम करता येणार नाही मी कुणाजवळ झोपणार. म्हणून आपल्याला बाळ नकोच कधी. हे सर्व ऐकुन तर माझी जगण्याची उमेदच हरवून गेली. कुणाशी बोलू देत नाही घरात असलो की डोक्यावरून पदर घ्यायचा. बेडरूम मध्ये बसून दिवस काढायचा बाहेर कुठ जायचं नाही. काही हवे असेल तर नोकरांनी आहे तिला आवाज द्यायचा. ह्या अटी मला त्यांनी लाऊन ठेवल्या आहेत. मी ह्या सर्वाला अगोदर खूप विरोध केला पण त्याने मला खूप मारझोड केली.
हे सर्व मी घरी सांगितले तर आई म्हणते नवरा बायको मध्ये अशी भांडणे होत असतात. होईल सर्व ठीक पुढे जाऊन. पण मला माहित आहे हे कधीच ठीक होणार नाही कारण त्याच्यासाठी मी प्रेम करण्याची एक मशीन आहे बस यापुढे काहीच नाही. तो एक विकृत मनुष्य आहे आणि कधीही सुधारणार नाही. हे सर्व ऐकुन मला खूप राग आला होता मी तडक तिला घेऊन माझ्या ओळखीत असलेले पोलीस काकांकडे गेलो आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. ते आम्हाला ह्या बाबतीत पूर्ण सोबत देणार आहेत असे सांगितले आहे पण महत्त्वाचे म्हणजे तिच्या आई बाबांनी आम्हाला मदत करण्यासाठी पाठ फिरवली. पण मी माझ्या निर्णयावर नात्र मात्र ठाम आहे. जेव्हा तिचा घटस्फोट होईल तेव्हा मी माझ्या सोनी सोबत लग्न करून तिला सुखात ठेवील.
मित्रानो ही एक सत्यकथा आहे. अशा अनेक गोष्टी कधी ना कधी तुमच्यासोबत घडल्या असलतीलच. तेव्हा आता सोनी आणि मनीने काय करावं असे तुम्हाला वाटत? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा.
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)
22 comments
So cut storri
Big salute to you … good work guys…u must marry…
Sodchothi deun lagn karavesanjay
कर खरच लग्न कर मित्रा तिच्यासोबत कारण जर तू तिच्याशी लग्न केले नाहीस तर ती 100% आत्महत्या करून मरेल..
त्यापेक्षा समाजच्या विरोधात जाऊन का होईना पण करच लग्न तू..
Kaydyane pahila ghataspot gya Ani tyanla tya vicharatun baher kadha mag lagn karu sukhane sansar kara
लग्न कर मित्रा..! खरे प्रेम फार कमी लोकांच्या नाशिबात असते..?
मी ही एका मुलीवर 10 वित्त असता पासून प्रेम करायचो खरे प्रेम बरका..! पन कधी व्यक्त होवू शकलो नाही..!?
कारण मि कसल्या जोबवर नवहतो किंवा घरची परिस्थिति अशी नव्हती की संपत्ति पाहून मी तिच्या घराच्याना कन्वेंस करू शकलो असतो.
अमच्या खेड़ेगावंत 12 वी झाली कि मुलींचे लग्न करतात..
तिचे पन लग्न झाले आता ..?
कधी कधी भेटते ती .. मी तालायचा प्रयत्न करतो पन ती स्वतहुँन बोलते..
कदाचित तिहि मला प्रेम करत असावी पन ना मी व्यक्त होवू शकलो ना कधी ती व्यक्त झाली..?
आता कधी जेव्हा तिची आठवण येते तेव्हा नकळत पापन्या ओलावतात ..!
शब्दात सांगता येवू शकत नाहीत त्या भावना ..
म्हणून कुनीही जर कुणावर प्रेम करत असेल तर अपल्या स्वतःच्या काही तड़जोडी करा पन खरे प्रेम असेल तर व्यक्त व्हा आणि दोघेही प्रेम करत असाल तर लग्न करा ..!
Love u #पल्लू
Ya aadhich samajacha virodhat jaun lagn Kel ast tr ashi vel aali nsti, muli aadhi ghabrtat, aai babancha against jat nahi mg lagn zalyavr smjt ki aapn chuklo mhanun..
Aata pn vel geli nahi. Doghani ektra ya
Lagn kar khar pan tila prem pan de. Jenekarun tila magacha 2 varshacha past aathavnar nahi.
N jar kharach ase jhale tar manuski ajun shillak aahe ase vatel.
Barobar
Tu lgn kr mitra… tuch ekta ahes jo tila sambhalu shktos.. ya vednetun baher kadhu shktos…. Move on.
Are yaar.. hi same majhi kahani ahe
,nav sudha same ahe gf ch (vaishu),farak yevdhach ahe ki ti parat nahi aali ,pan ti jithe ahe tithe sukhat rahavi ashich iccha ahe majhi
Dada maz pn same zal re
ही घटना थोडी ओळखीची वाटते पण चला असो मी मात्र एवढे म्हणेन मित्रा लग्न कर तू तिच्यासोबत ती तुझ्या शिवाय व तू तिच्या शिवाय अधुरे आहे आणि ज्याच्याशी तिचे लग्न झाले होते त्याला पण मोकळीकता मिळेल तुमच्या लग्नाने
Ticha shi lagna kar…… Tuj pream Khr hota mhnun 2 varsha ni Tujya jawad parat aali………
Ti mulgi tyachi gf hoti mhanun to lagna Karel.. pan tich mulgi gf nasti tar yane lagna kela asta ka..
Tyla ti havi aahe mhanun ti madat..
Ticha navara vikrut asle.. Anni tyani sudarle pahije, he barobar.
Tya muliche pan manavirudha lagna aahe.
Ti toch durshtikon gheun aali.
Mag tine Kay praytna kele lagna vachavnya sati..
Kaydya peksha samopchar try kela ka tine..
Bottom line tila pan lagna modyache aahe..
Aani navara kharach aasa asel .. he kitpat khara.
मला अस वाटत मनी म्हणजे तिच्या मित्रांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे.फक्त तो त्याच्या म्हणण्यानुसार त्याचा मतावर ठाम राहिला पाहिजे, कारण नाहीतर त्या मुलीची अवस्था कठीण होईल, तो जर पूर्ण पणे तिच्या साठी लढणार असेल, आणि जर जिंकला
तर तो पुढच्या पूर्ण आयुष्यात तिला कधीही या सर्व विषयावर कधीही टोमणा मारणं, त्रास देण करणार नसेल याची ग्वाही तो स्वतःला आणि तिला देत असेल तर जरुर त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य ठरेल
धन्यवाद
…आयुष्यात प्रत्येकाला एक संधी मिळत असते,
पण मित्रा तुला नशिबाने पुन्हा एकदा ही जगातली सर्वात मौल्यवान संधी (प्रेम) मिळालय. तेंव्हा ही वेळ वाया घालऊ नको.
खरच तुम्ही लग्न करा. नाहीतर परिस्थिती आणखी चिघळला. लोकांचा विरोध पत्करून आधीच लग्न केले असते तर बरं झालं असतं.
मी पण एका माणसावर प्रेम करते, अजूनही. पण त्याने फक्त माझा वापर केला आणि फालतू कारण सांगून सोडून दिले.
अजूनही त्याची आठवण येते, पण मी आता वाट बघण सोडून दिले आहे. खर प्रेम केलं होतं मी. अगदी मनापासून.
Barobr
मनी तू तिच्याशी लग्न कर .म्हणजे दोघांनाही आपापले प्रेम मिळेल आणि तिला जगण्याची नवी उमेद.
आमच्या आई बाबांनी आमचे रीतसर लगीन केले
माझं माझ्या बायको वर मनापासून प्रेम आहे खूप जपतो तिला. मला 2 मुली आहेत आणि आजही आमचे प्रेम पहिल्या सारखेच आहे
[…] का केलं मी लग्न? […]