Home करमणूक ७४ वर्षीय कबीर बेदी ह्यांनी २९ वर्ष लहान मुलीसोबत केले आहे चौथे लग्न, वाचा त्यांच्या अजब प्रेमाची गजब कहाणी

७४ वर्षीय कबीर बेदी ह्यांनी २९ वर्ष लहान मुलीसोबत केले आहे चौथे लग्न, वाचा त्यांच्या अजब प्रेमाची गजब कहाणी

by Patiljee
57 views

प्रत्येक सिनेमात जेवढा नायक नायिका महत्त्वाचे असतात तेवढेच खलनायक सुद्धा त्याच ताकदीचा असावा लागतो. तरच त्या सिनेमाला चार चांद लागतात. ८० ते ९० दशकातील सिनेमे तुम्ही पाहिले असतील तर एक नाव नक्कीच खलनायक म्हणून तुमच्या मनात बसले असेल त्याचे नाव आहे कबीर बेदी. आपल्या अभिनयाने अनेक सिनेमे त्यांनी एका हातावर पेलळे आहेत. त्यांचा दमदार आवाज त्यांच्या अभिनयाला जोड होता. म्हणून जुन्या खलनायकापैकी कबीर बेदी हे दिग्गज नाव मानले जाते.

पण आपल्या अभिनयापेक्षा अभिनेत्रींसोबत रिलेशनशिप मुले ते नेहमीच चर्चेत राहिले. आपल्या ७४ वर्षीय जीवनात त्यांनी चार लग्न केली आहेत. परवीन दुसांज हे त्यांची चौथी पत्नी त्यांच्या वयापेक्षा २९ वर्षाने लहान आहे. तरीसुद्धा जगाचा विचार न करता आपले प्रेम त्यांनी सिद्ध करून लगीनगाठ बांधली. ह्या दोघांची मैत्री आणि प्रेम १० वर्षांपासून होतं. २०१६ मध्ये आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कबीर बेदी आणि परवीन दुसांजने लग्न केलं. लग्नाच्या आधी हे दोघं लिव इन मध्ये राहत होते.

Source Parveen Dusanj Social Handle

परवीन दुसांजही टीव्ही निर्माती आहे. यासोबतच ती मॉडेल आहे. पहिल्या पत्नीची कबीर ह्यांची मुलगी पूजा बेदी हीच्यापेक्षाही परवीन चार वर्षांनी लहान आहे. ह्या दोघांची पहिली भेट लंडन मध्ये झाली. आधी मैत्री मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण परवीनच्या कुटुंबातील कुणीच ह्या लग्नासाठी तयार नव्हते. अखेर सर्वांना समजावून सहमती घेऊन लग्न केले. हे लग्न गुरुद्वारेत मोठ्या उत्साहात पार पडले होते. ह्या लग्नासाठी कबीर ह्यांचे सर्व मित्र परिवार जमले होते पण त्यांची मोठी मुलगी पूजा बेदी आली नव्हती. तिचा ह्या लग्नाला विरोध होता.

तिने अनेक इंटरव्ह्यू मध्ये आपली नाराजगी व्यक्त सुद्धा केली होती. लग्नाच्या वेळीस तिने केलेल्या ट्विटमुले अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ह्या ट्विटमध्ये परवीन हिला सर्व जगासमोर डायन असे संबोधले होते. कबीर बेदी ह्यांचे पाहिले लग्न नृत्यांगना प्रोतिमा बेदी सोबत झाले होते. ह्या पत्नीकडून त्यांना सिद्धार्थ बेदी आणि पूजा बेदी अशी दोन मुले आहेत. पण त्यांच्याच नातं खराब झाल्यामुळे ते वेगळे झाले. ह्यानंतर सुसैन हम्फ्रेस ह्या ब्रिटिश फॅशन डिझायनर सोबत त्यांनी लग्न केलं. पण हे नातं ही फारकाळ टिकलं नाही. सुसैन सोबत घटस्फोटा नंतर १९९० रेडिओ प्रेझेंटर निकी सोबत लग्न केलं. पण २००५ मध्ये हे ही नाते संपुष्टात आलं. ह्यानंतर त्यांनी परवीन दुसांज सोबत चौथे लग्न केलं.

Please follow and like us:

Related Articles

1 comment

Mahesh SITARAM Gaikwad January 18, 2020 - 2:41 am

changla job aahe

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल