Home संग्रह कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे यावरील काही घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत

कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे यावरील काही घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत

by Patiljee
568 views

तर आज आपण कपड्यांवर अचानकपणे पडलेले डाग कसे काढायचे यावरील उपाय करणार आहोत. काही लोक ऑफिसला जातात. त्यांच्या शर्टवर नेहमी पेनाच्या शाईचे डाग तसेच मलकटलेली कॉलर यावर नेहमीच डाग पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. कधी तेलाचे डाग तर कधी हळदीचे डाग सहजरीत्या कसे काढले जातील हे आज आपण पाहूया.

पहिल्यांदा आपण मळकटलेली कॉलर कशा प्रकारे साफ करू शकतो हे पाहूया. दिवसभराचा घाम मानेभोवती साचल्याने हे डाग पडतात. त्यासाठी एखादी शाम्पूची पुडी घ्या जी आपण तेलकट केसांसाठी वापरतो. तिचे काही थेंब मळकटलेल्या कॉलर वर टाका आणि घासा 20 मिनिट तसेच ठेवा आणि नंतर पुन्हा धुवा डाग निघून जाईल.

तुमच्या कपड्यांवर पडलेले पेनाच्या शाईचे डाग काढण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. जिथे कपड्यावर शाईचे डाग लागले आहे त्या ठिकाणी टूथपेस्ट लावा आणि तो कपडा सुकवा त्यानंतर साबणाने धुवून टाका. डाग जाण्यास मदत होईल. शाई जेव्हा ओली असते तेव्हाच त्यावर मीठ लावून घासलं आणि पाण्याने धुतल्याने डाग निघून जातात.

कपड्यांवर लागलेले भाजीचे किंवा हळदीचे डाग घालवण्यासाठी डाग पडलेल्या ठिकाणी साबण लाऊन तो कपडा उन्हात वाळवा नंतर नेहमीप्रमाणे धुवून टाका. कपड्यांवर पडलेले तेलाचे डाग घालवण्यासाठी तुम्ही रोजच्या वापरातील चेहऱ्याला लावण्याची पावडर वापरू शकता. जिथे डाग पडलाय त्या वर ही पावडर टाकून थोड वेळ तसेच राहू द्या नंतर कपडा धुवून घ्या.

चहा किंवा कॉफीचा डाग तुमच्या कपड्यांवर लागला असेल तर अशा वेळी तुम्ही मीठ किंवा ग्लिसरीनचा उपयोग करू शकता. कपड्यांवर मीठ किंवा गलुसरिन चोळून घ्या कपडा 24 तास तसाच भिजत ठेवा नंतर धुवा.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल