करण वाही आपल्या हँडसम लुकसाठी खूप जास्त फेमस आहे. खास करून तरुण मुलीत त्याची क्रेझ जास्त आहे. पण मुलींनो तुम्ही जर करणचे फॅन्स असणार तर ही गोष्ट तुमचे हृद्य तुटू शकते. आपल्या स्वप्नातील राजकुमारी त्याला आता रिअल आयुष्यात मिळाली आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या उदिति सिंह ह्या मुलीला करण डेट करत आहे. वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल ना मित्र मैत्रिणींनो पण हे खरं आहे आणि ह्याचीच पुष्टी करणने आपल्या सोशल मीडियावर दिली आहे. हे पाहून खूप मुलींचे हृदय तुटले असेल ह्यात शंका नाही.

करणने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. त्यांच्या ह्या फोटोला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. खूप चांगल्या चांगल्या आणि गोड कमेंट ह्या फोटोवर प्राप्त झाल्या आहेत. पण ज्यांना करण खूप आवडतं होता अशा मुलींच्या सुद्धा अनेक दुखी कमेंट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या दोघेही लंडनमध्ये आहेत आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत. एका मासिकात आलेल्या रिपोर्ट नुसार ते खूप कालावधीपासून एक एकमेकांना डेट करत आहेत.
अचानक आलेल्या ह्या बातमीमुळे टेलिव्हिजन क्षेत्रात नक्कीच हलचल निर्माण झाली आहे. शरद केळकर ने तर ह्याच पोस्ट वर कमेंट केली आहे की मी लवकरच आता तुमच्या लग्नाच्या पत्रिका छापायला सुरुवात करतो. त्यामुळे ह्यांच्या लग्नाच्या गोष्टीला सुद्धा उधाण आलं आहे. ह्या दोघांच्या मुले अजुक एक फ्रेश जोडी मनोरंजन क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळेल.