एक दिवस नेहमी प्रमाणे आम्ही आमच्या कॅफेवर भेटलो. आज मी निर्धार करून आलो होतो की काही झाले तरी मनात माझ्या तिच्याबद्दल जे काही आहे ते सर्व तिला सांगून टाकावं आणि एवढ्या वर्षात मनात जे साठलेले आहे ते बोलून टाकावं. आमच्या गप्पा चालूच असताना मध्येच मी तिला थांबवले. शबाना तुला एक गोष्ट सांगायची आहे. थोड ऐकायला तुला टिपिकल वाटेल पण तुला जेव्हापासून पाहिले आहे तेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलो आहे ग मी. माहीत नव्हत की मनातील गोष्ट सांगायला एवढा वेळ लागेल.
पण तुझी सोबत, तुझे माझ्या आयुष्यात असणे हेच माझ्यासाठी खूप आहे. प्रेमाचा खरा अर्थ काय आहे हे मला अजुन माहीत नाहीये. फक्त एवढं मात्र माहीत आहे की माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त आणि फक्त तूच आहेस. मी एवढं तिला मनापासून सांगत होतो पण शबाना मात्र ना हसत होती ना रडत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचे भाव दिसत नव्हते. माझे बोलणे ऐकल्यावर तिने एकच उत्तर केले. झाले तुझे मग आता ऐक. खर तर एवढ्या वर्ष आपण सोबत आहोत त्यामुळे आपल्याला एकमेकांची सवय झालीय मान्य आहे पण हे प्रेम नाही.
आपण एवढे सोबत होतो की एकमेकांबद्दल भावना निर्माण झाल्या असतील नक्कीच पण हे प्रेम नाहीये फक्त Attraction आहे. उगाच तू त्याला प्रेमाचे नाव देऊन आपल्या मैत्रीमध्ये तणाव निर्माण करू नकोस. तसेही आता वीस दिवसाने परीक्षा आहेत नंतर आपण कधीच भेटणार नाही आहोत. ही आपली शेवटची भेट आहे असे समजून आयुष्यात पुढे जा. कारण तुझ्या आणि माझ्या नात्यात काहीही होणार नाही. एवढं बोलून ती तिथून निघून गेली. जाताना तिने एकदा सुद्धा माझ्याकडे पाहिली नाही त्यामुळे मलाही असेच वाटू लागले मी तिचे कधी माझ्यावर प्रेम नव्हतेच मुळात.
सीमाने ने मला चिमटा काढला. काय शेठ कुठ हरवलात. कधीपासून आवाज देतेय. ती बघ तुझी रानी आली जा जाऊन भेट. एका क्षणार्धात सर्व भूतकाळ डोळ्यासमोरून गेला आणि त्याच वेगाने वर्तमान आणि आता त्याच्यावर भविष्यकाळ सुद्धा घडणार होता. मी आधी शबानाला लांबूनच पाहिले. अजूनही ती तितकीच सुंदर दिसत होती. तिचे सौंदर्य ओसंबून वाहत होतं. जणू स्वर्गातून कुणी अप्सरा जमिनीवर आली असा भास मला होत होता. मी तिच्या जवळ गेलो तीला पाहिले, तिने मला पाहिले हात मिळवला आणि एकही शब्द न बोलता माझ्याकडून लांब निघून गेली.
एवढ्या वर्षांनी भेट होणार म्हणून जेवढा उत्साह माझ्यात होता. त्याच्या तिळमात्र उत्साह तिच्यात अजिबात आढलुन आला नाही. पार्टी रंगात असताना अचानक तिने मला टेरेस्ट येण्याचा इशारा केला. मीही तिच्या मागोमाग टेरेस वर जाऊन पोहोचलो. मी काय बोलणार एवढ्यात तिने चक्क येऊन मला घट्ट मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. तिचे हे वागणे माझ्यासाठी खूप वेगळं होतं कारण आजवर कधीच आमच्यात असं काहीच झाले नव्हते. मी तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला पण तोही निष्फळ ठरला.
महेंद्र मैने बहुत बडी गलती की यार, मुझे माफ कर देना इतने साल तुझसे दुर कैसी रही हुं हे मुझेही पता. प्लीज मला माफ कर. आजवर माझ्या अनेक चुका पदरात घेतल्यास. तुझे खूप प्रेम माझ्यावर असताना देखील मी तुला घालून पाडून बोलले. खरंच रे सॉरी सर्व गोष्टींसाठी सॉरी. तुझे माझ्या आयुष्यात येणे हेच खूप होत माझ्यासाठी. कॉलेजच्या दिवशी सर्व मुले मुलींचे अंग बघत होते मात्र तेव्हा तू माझ्या नजरेला नजर देऊन पाहत होता. खरं तर तेव्हाच तू मला खूप आवडायला लागला होतास.
मलाही नेहमीच असेच वाटायचं की कधीतरी आपण एक व्हावे, छान राजा राणीचा संसार करावा. पण मी मुद्दामहून तुझ्या पासून पळत होते. कारण कॉलेजमध्ये येण्यापूर्वीच माझ्या घरच्यांनी आधीच माझे लग्न ठरवलं होतं. म्हणून मी तुझ्यापासून लांब पळत होते कारण मला माहित होत मी तुझ्या प्रेमात कधी ना कधी बुडून जाणार पण नशिबात होत तेच झाले आपली मैत्री झाली. मग मी विचार केला तू आयुष्यभर माझा कधीही होऊ शकत नाहीस तर तीन वर्ष माझा होशील म्हणून मीही छान मैत्री केली. तुझ्या सोबत मी आयुष्यातील खूप सुखद आणि गोड क्षण व्यतीत केले आहेत महेंद्र त्यामुळे आजही ते काही आठवले की आपोआप चेहऱ्यावर हसू येत.
जेव्हा तू मला कॅफेमध्ये प्रपोज केलेस तेव्हा जणू माझ्या मनातल्या भावना तुझ्या मुखातून बाहेर पडत आहेत असाच भास होत होता.पण तेव्हा मी स्वतः ला कठोर केलं. कारण मला माहीत होत जर मी तुला होकार दिला असता तर माझ्या कुटुंबातील सर्वांना मी फसवले असते. अब्बु ने मुझे काभिभी किसी चीज के लिये फोर्स नहीं किया, त्यामुळे त्यांची पसंद मी असे धुडकावून लाऊ शकत नव्हते. म्हणून मी तुला सोडून निघून गेले.
तिचा प्रत्येक शब्द माझ्या काळजावर घाव करत होता.तिच्या मनात एवढं काही साचले असेल ह्याची जराही कल्पना मला नव्हती. बाबांच्या जाण्यानंतर आज बऱ्याच वर्षांनी माझे अश्रू बाहेर पडले होते. मी तिला घट्ट मिठी मारली आणि पुढील पंधरा मिनिटे आम्ही एकमेकांच्या बाहुपाशात रडत होतो. अखेर दोघांनी एक एकमेकांना सावरलं. तिने मला अतिशय प्रेमाने म्हटलं ये देख महेंद्र आपण आयुष्याचे जोडीदार तर कधी होऊ शकले नाही. पण आता मला तुझ्याशी निखळ मैत्री करायची आहे. अशी मैत्री जी आपण कॉलेजमध्ये अनुभवली आहे.
मी पण तिच्या होकाराला होकार देत तिने दिलेला शब्द पाळला. आज आम्ही छान मित्र आहोत कधी आम्हाला भेटावसं वाटलं तर आम्ही भेटून छान गप्पा मारतो. मनातील गोष्टी एक एकमेकांशी शेअर करतो. बायको तर नाही होऊ शकली ती माझी पण एक गोड मैत्रीण ती आधीही होती आणि आयुष्यभर सुद्धा राहील.
समाप्त.
महेंद्र पाटील (पाटीलजी)
1 comment
[…] भाग तीन इथे क्लिक करून वाचा […]