KGF सिनेमाचा कुणी चाहता नसेल तर ते नवलच. ह्या सिनेमाने यश ह्या अभिनेत्याला रातोरात प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनवले. हा सिनेमा खूप काही सिने चाहत्यांसाठी देऊन गेला. मग ह्याचे कथानक असो किंवा प्रत्येक अभिनेत्याने केलेला अभिनय. अगदी सर्वच वाखडण्या जोगे होत. सिनेमात ज्या प्रकारे शूट केला होतं त्यामुळे खरंच हे श्रेय कॅमेरा मेन भुवन गोवडा ह्यांचं आहे. २०१८ मध्ये आलेला हा कन्नड भाषेतील सिनेमात भारतीय नव्हे तर विदेशी लोकांच्या सुद्धा चांगलाच पसंती पडला. खास करून अभिनेता यश ह्याची स्टाईल लोकांना खूप जास्त भावली. त्याचा तो दाढी मुछ वाला रावडी लुक प्रत्येकाने कॉपी करायला सुरुवात केली. ह्या सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत नील ह्यांनी केलं होत.

KGF सिनेमा संपल्यानंतर अनेक सस्पेन्स लोकांच्या मनात निर्माण झाले. पुढे काय घडणार म्हणून लोक दुसऱ्या भागाची वाट पाहू लागले आणि बऱ्याच कालावधी नंतर आज (रविवार) KGF 2 सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. ह्या सिनेमाबद्दल मोठी गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे हा सिनेमा अगोदर जुलै मध्ये प्रदर्शित होणार होता पण हाच सिनेमा आता एप्रिल मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जर तुम्ही ह्या सिनेमाचे मनापासून चाहते आहात तर ही बातमी तुम्हाला नक्कीच सुखद धक्का देऊन जाईल.
हा सिनेमा कन्नड, हिंदी, तमिळ आणि मल्याळम अशा चार भाषेत प्रदर्शित होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ह्या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत संजय दत्त असणार आहेत आणि ह्या पात्राचे नाव असेल अधिरा. रविना टंडन सुद्धा ह्या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत दिसेल. यश सोबत श्रिनिधी शेट्टी स्क्रीन शेअर करताना तुम्हाला दिसेल. दुसऱ्या पर्वाचे सुद्धा दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नील ह्यांनी आपल्या खांद्यावर पेळली आहे. मित्रानो तुम्ही सुद्धा KGF सिनेमाचे मोठे चाहते आहात तर कमेंट मध्ये अभिनेता यश साठी एक कमेंट सोडा. तुमच्या मनात जे काही आहे ते सांगून टाका.