आपण कोणत्याही अवॉर्ड शो मध्ये किंवा कोणत्याही रिऍलिटी शो मध्ये अनेक कलाकारांना पाहतो. नेहमीच हॉट आणि सुंदर दिसण्यासाठी कलाकार खूप मेहनत अशा शो मध्ये येण्यासाठी घेत असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जी कोणत्याही शो अथवा अवॉर्ड शो मध्ये जाताना नेहमी ड्रेस किंवा साडी परिधान करून जाते. आजवरचा इतिहास पाहिला तर असे करणारी ती एकमात्र अभिनेत्री आहे.

तुम्ही ह्या अभिनेत्रीला नक्कीच ओळखत असणार. तिने अनेक तमिळ, मल्याळम, तेलगू आणि इतर भाषिक चित्रपटात कामे केली आहेत. एव्हाना काही लोकांनी तीच नाव सुद्धा ओळखले असेल. त्या अभिनेत्रीचे नाव आहे कीर्ती सुरेश. तिचा सुंदर गोंडस दिसणारा चेहरा नेहमीच प्रेक्षकांना आवडतो. तिचा अभिनय तेवढाच अप्रतिम आहे. सावित्री ह्या सिनेमासाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे.
तिला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. तिची आई मेनका ह्या सुद्धा अभिनेत्री होत्या. तर वडील निर्माता होते. सन २००० मध्ये तिने बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. पण खऱ्या अर्थाने तिने सिनेमात पदार्पण २०१३ मध्ये मल्याळम सिनेमा गिथांजली मध्ये केले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आजवर तिने २५ सिनेमात काम केले आहेत तर ३ सिनेमे प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहेत.
महत्त्वाचे समजणारे असे फिल्म फेअर, झी सिने, साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुवि, नॉर्वे तमिळ फिल्म फेस्टीवल, एडिसन असे अवॉर्ड सुद्धा तिला मिळाले आहेत. तिची एक झलक आणि स्माईल पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. तुम्हाला पण आवडते का कीर्ती सुरेश? आम्हाला नक्की कळवा.
1 comment
लाख लाख लाख लाख लाख… सलाम नमस्कार त्या अभिनेत्री ला जिला आज पण आपल्या समाजाची देशाची संस्कृतीचा अभिमान आदर आहेत.
God bless you