कोकम म्हणायला गेलो तर गावात म्हणजे कोंकणात यांची झाडं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे केरळ, कर्नाटक या ठिकाणी ही आपल्याला कोकमची झाडे पाहायला मिळतात. या कोकमाचे उपयोग तसे भरपूर आहेत, पण ते आपल्याला माहीत नसतात. आपल्याला कोकणचे फक्त सरबत, सोलकढी भाजीत घालायचे कोकम इतकच माहीत आहे. पण आज आपण पाहूया या कोकमचे आणखी काही उपयोग.
कोकम अनेक आजार बरे करण्यासाठी औषध म्हणूनही त्याचा वापर केला जातो. कोकमला मराठीत आमसूल तर संस्कृतमध्ये साराम्ल, इंग्रजीमध्ये कोकम म्हणतात. कोकमच्या वरच्या आवरणाचे जसे उपयोग आहेत तसेच आतील बिया या ही उपयोगाच्या आहेत. या बियांपासून तेल काढला जातो. हा तेल खाण्यासाठी ही वापरला जातो. कोकम या फळामध्ये आपल्या शरीरातील आवश्यक असणारे लोह मुबलक प्रमाणात असते शिवाय यात कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, हे सुध्दा असतात.

कोकमाचे फायदे
- अतिसार किंवा हगवण लागली असेल तर यावर या कोकणचे कुस्करून पाणी प्यावे.
- अंगावर पित्त उठल्यास कोकणचे पाणी करून हे पाणी पित्त उठलेल्या ठिकाणी लावावे.
- कोकम हे फळ अपचन या आजारावर अत्यंत उपयोगी आहे यासाठी हे फळ किंवा सुकलेले कोकम पाण्यात घालून याचा काढा करून प्या.
- कोकमचा रस प्यायल्याने मिळतात मुबलक फायदे आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार इत्यादी विकार दूर होतात.
- कोकमची सोलकाढ कोकणात आपल्याला ताटात वाढलेली पाहायला मिळते पण ही फक्त दिसण्यासाठी नाही तर खाल्लेले अन्न पचनासाठी ही सोलकढी अत्यंत उपयोगी आहे.
- हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर कोकमचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.
- रोजच्या जेवणामध्ये कोकमचा नियमितपणे वापर करा त्यामुळे आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होतात.
- कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो.
कोकमाचे एवढे सर्व उपयोग तुम्ही पहिल्यांदा वाचले असतील तर यापुढे कोकमाचा योग्य वापर करा. कारण कोकम आपल्या मानवी शरीरासाठी खूप चांगले आहे. हे पण वाचा पावसाळ्यात घरात फिरणाऱ्या माशांचा त्रास होत असेल तर करा हे उपाय.
1 comment
[…] […]