Home करमणूक कुठे हरवला गावठी फेम अभिनेता श्रीकांत पाटील

कुठे हरवला गावठी फेम अभिनेता श्रीकांत पाटील

by Patiljee
398 views

मराठी सिनेसृष्टीत अनेक चित्रपट प्रत्येक शुक्रवारी प्रदर्शित होत असतात. त्यातील काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात तर काही फ्लॉप ठरतात. पण काही सिनेमे असेही असतात जे आपली एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवून जातात. अशाच सिनेमापैकी एक सिनेमा म्हणजे गावठी. ह्या सिनेमात अनेक कलाकारांनी काम केलं होतं. ह्या सिनेमाची कथा, संवाद, गाणी, नृत्य, आणि कलाकारांचा अभिनय वाखाडण्या सारखा होता.

गावठी सिनेमात मराठी सिनेमाला एक फ्रेश जोडी मिळाली होती. ह्या सिनेमात मुख्य भूमिकेत श्रीकांत पाटील आणि योगिता चव्हाण होते. ह्याच बरोबर कुशल बद्रिके, नागेश भोसले, वंदना वकनिस, गौरव मोरे, किशोर कदम, किशोर चौघुले, अंकुर वढणे, पंकज विष्णु आणि सदानंद यादव ह्यांच्या भूमिका होत्या. ह्या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद कुमार ह्यांनी केलं होतं. सिनेमाचे संगीत आजही तुम्ही ऐकू शकता असेच आहे.

गावठी मुलगा शहरात जाऊन कसे यश संपादन करू शकतो ह्याची ही कथा अत्यंत कल्पकतेने सिनेमात मांडली आहे. श्रीकांत पाटील ह्या अभिनेत्याचा हा पहिलाच सिनेमा होता. हा सिनेमा येऊन दोन वर्ष झाले तरीही श्रीकांत पाटील आपल्याला कोणत्याच सिनेमात किंवा मालिकेत दिसला नाही. आमच्या टीमने जेव्हा श्रीकांत सोबत वार्ता केली तेव्हा आम्हाला कळलं की जरी त्याने हे दोन वर्षात एकही सिनेमा केला नसला तरी त्याने आपली पूर्ण वेळ अभिनय कौशल अजुन कसे वाढेल ह्यासाठी दिली होती.

ह्या दोन वर्षात त्याने अनेक नॅशनल, इंटरनॅशनल इव्हेंट केले. येणाऱ्या काही दिवसात त्याचे दोन सिनेमे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ह्यात एका हिंदी वेब सिरिजचा सुद्धा समावेश आहे आणि एक इव्हेंट फिल्म असणार आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी त्याची मोठ्या दिमाखात एन्ट्री होणार आहे. मित्रांनो तुम्ही सुद्धा श्रीकांत पाटीलचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल