Home करमणूक CID सीरियल बंद झाल्यामुळे लता मंगेशकरांनी लावला चैनल ला फोन, वाचा त्यामागचे कारण

CID सीरियल बंद झाल्यामुळे लता मंगेशकरांनी लावला चैनल ला फोन, वाचा त्यामागचे कारण

by Patiljee
54 views

1998 पासून सलग 21 वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी CID सगळ्यात जास्त वेळ चालणारी ही सीरियल म्हणून हीचा रेकॉर्ड आहे. या सीरियल मध्ये असणारे प्रत्येक पात्राला लोकांनी पसंत केले होते. यात भूमिका करणारे असणारे फॉरेंसिक एक्सपर्ट डॉ. सालुंके यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत. लता मंगेशकर यांना ही सीरिअल खूप आवडायची यामुळे कधी कधी त्या या सीरियलचा रिपीट टेलिकास्ट देखील पहायच्या.

Source Google

लता मंगेशकर यांचा संपूर्ण कुटुंब या सीरियलचा चाहता आहे. त्यामुळेच जेव्हा ही सीरियल बंद झाली तेव्हा त्यांना ते आवडले नाही त्यांनी कितीतरी वेळा या सीरियल च्या कलाकार आणि त्याचे डायरेक्टर-प्रोड्सूसर बीपी सिंह यांच्याशी संपर्क साधून त्याचे कारण विचारले पुढे जाऊन त्यांनी चैनेल वाल्यांना सुद्धा फोन करून ही सीरियल पुन्हा सुरू करण्यासाठी सांगितले. या सगळ्या कारणांमुळे लता दीदी आणि या सीरियल मधील कलाकारांमध्ये खूप जवळीक आली आहे. प्रत्येक वर्षी गणपतीला लता दीदी संपूर्ण CID टीमला बोलावतात. दोघांमधील नात इतकं घट्ट झाले आहे की दीदी आणि टीम मधील कलाकार फोन वर नेहमीच एकमेकांशी कनेक्टेड असतात.

Source Google

लता दीदी बाबत सांगताना फॉरेंसिक एक्सपर्ट डॉ. सालुंके सांगतात की, त्या इतक्या मोठ्या गायिका असूनही त्यांचं राहणीमान खूप साधारण आहे. त्यांचा पूर्ण परिवार साधे जीवन जगतात त्यांना भारत रत्न पुरस्कार मिळूनही त्यांना जराही किंचितही घमेंड नाही. प्रत्येक वेळी त्या आम्हाला सगळ्या कलाकारांना आवर्जून गिफ्ट पाठवत असतात. यावेळी दिवाळीला ही त्यांनी मला एक घड्याळ आणि एक शर्ट पाठवले आहे.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल