सध्या देशात काय परिस्तिथी आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच आहे. त्यासाठी सरकारने लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गाड्या, कारखाने, ज्यामुळे आपल्या निसर्गाचीही रोज हानी होत आहे ती आता कमी झाली आहे. त्यामुळे लॉक डाऊनचा थोडा तरी फायदा आपल्यालाच झाला आहे.
सध्या सर्वच देशात लॉक डाऊन असल्यामुळे लोक घरातून बाहेर पडत नाहीत. त्यामुळे रस्ते आणि पार्क अशी ठिकाणे ओसाड पडली आहेत. याचा फायदा जंगलातील प्राण्यांना झाला आहे. त्यामुळे ते मुक्तपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. समुद्रकिनारे ओस पडले आहेत. त्यामुळे कासव आणि अनेक जलचर प्राणी किनाऱ्यावर मनसोक्त फिरत आहेत.
देशात लॉक डाऊन असल्यामुळे लोक बाहेर पडणे सध्या तरी टाळत आहेत. त्यामुळे प्रदूषण वाढणाऱ्या गाड्या रस्त्यावर दिसत नाही. त्यातून निघणारा धूर ही कमी प्रमाणात झाला आहे. वित भट्ट्या, सिमेंट कारखाने, मारबलचे कारखाने ई. कारखाने बंद असल्यामुळे वातावरण अगदी साफ आणि स्वच्छ झाले आहे. त्यामुळे झाडांवर बसणारी धूळ ही कमी झाली आहे. त्यामुळे झाडावर एक चमक आली आहे, पहिल्यांदा असे झाले की प्रदूषणाची पातळी इतकी खाली गेली आहे.
सध्या लोक घरात बसून कंटाळली आहेत. त्यामुळे टेलिव्हिजनने आता टीव्ही वर रामायण दाखवायला सुरुवात केली आहे. पूर्वी जेव्हा रामायण लागायचे तेव्हा रस्ते ओस पडलेले असायचे. सगळे रामायण बघण्यासाठी पळायचे. हीच संधी आता रस्ते ओस पडण्यासाठी रामायण दाखवले जाते आणि याचा चांगला परिणाम ही आपल्या पुढच्या पिढीवर होऊ शकतो.
रोज कामावर सेंट आणि परफ्यूम मारून निघणारे लोक सध्या तरी घरात बसले आहेत. या सेंट आणि परफ्यूम मुले ओझोन वायूचा थर नष्ट होत चालला असताना आता सध्या तरी लॉक डाऊन मुळे ओझोन वायूचा थर व्यवस्थित होत आहे.
लोकांची दान करण्याची वृत्ती ही सध्या या काळात आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ज्या लोकांचे पोट हातावर आहे ते बसून आहेत. त्यांच्यासाठी काही लोक अन्न आणि धान्य अशा गरजवंत वस्तूंचा वाटप करत आहेत.
देशातील चोरी आणि गुंडागर्दी, वाद विवाद अशी प्रकरणे सध्या तरी देशात कमी प्रमाणत आपल्याला पाहायला मिळत आहेत.