Home कथा मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ३

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ३

by Patiljee
563 views

नोटीफिकेशन मध्ये तिचा मेसेज पाहून माझी नजर आधी तिच्यावर गेली. हिला कळलं तर नाही ना की मिस्टर अनोळखी हा मीच आहे? पण ती मात्र आपलं डोकं मोबाईलमध्ये घालून माझ्या म्हणजेच मिस्टर अनोळखीच्या रिप्लायची वाट पाहत होती. मी मेसेज चेक केला तर तो असा होता, “काय मिस्टर अनोळखी? आहात का जागेवर? काल तर एवढे बोलत होता आणि आज एक मेसेज सुद्धा नाही.” तिचा हा मेसेज पाहून मी फक्त त्या मेसेज कडे पाहत राहिलो. हेच तर मला हवं होतं की तिने मला मेसेज करावा आणि नेमकं तेच झालं होतं. माझा आनंद कसा साजरा करू हेच कळतं नव्हतं. माझ्या चेहऱ्यावर हा आनंद ओसंडून वाहत होता.

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट Part 1 & मैत्री प्रेम लग्न घटस्फोट Part 2 इथे क्लिक करून वाचा

हे पाहताच रोहनने माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि जोरजोरात ओरडू लागला, “काय महेंद्र शेठ कुणाचा मेसेज आलाय की एवढा चेहरा फुलला आहे तुमचा? जरा आम्हाला तरी कळू दे?” त्याचे हे वाक्य ऐकताच सर्व माझ्याकडे पाहू लागले. मुली तर आपापसात कुजबूजू लागल्या. याची गर्लफ्रेंड आहे? मैत्रीण असेल? या रोहनला काही कामे नाही आहेत, महेंद्र साधा वाटतो खूप.

पण राणी मात्र तिच्या मिस्टर अनोळखीच्या रिप्लायची वाट पाहत होती. मी कसाबसा मोबाईल रोहन कडून घेऊन राणीला मेसेज केला.

मी: आठवण तर आम्हाला होतीच पण म्हटलं आम्ही तुमच्या लक्षात आहोत का नाही, तुम्ही स्वतःहुन आमची आठवण काढता का नाही? हे जरा पडताळून पाहत होतो.

ती: हो का ठोंब्या, मग झालं का पडताळून?

मी: हो हो… झालं झालं आणि चांगलंच कळलं सुद्धा.

ती: काय कळलं?

मी: तुम्हाला पण आमची आठवण येतेय ते.

ती: असं काही नको, काहीही अंधश्रध्दा पाळू नकोस.

मी: हो का मग जाऊदे नाही बोलत मी.

ती: ये ठोंब्या गपतोस का आता? जेवलास?

मी: हा आताच झालं, तू जेवलीस?

ती: हो माझेही आताच झालं.

मी: कसा आहे मग आजचा दिवस?

ती: काही खास नाही वाटत. चालला आहे नेहमीसारखा.

मी: चांगलं आहे. किती वाजता निघणार मग कॉलेजमधून?

ती: का? तू येतोस का सोडायला?

मी: आलो असतो पण तुझ्या सोबत असलेल्या मित्राला नाही आवडणार?

ती: कुणाला?

मी: असतो ना तुझ्यासोबत एक गोरा मुलगा, ज्याची दाढी आहे.

ती: अच्छा रोहन का? मग त्याच काय?

मी: त्याला नाही आवडणार?

ती: का त्याला का नाही आवडणार? तो फक्त माझा मित्र आहे त्याहून पलीकडे काही नाही. आमच्या मैत्रीत फक्त चारच दिवस झालेत. तो सुद्धा पेण शहरातून येतो आणि मी पण म्हणून आम्ही सोबत येतो. बाकी असे काही नाही. तुला का वाटले असे?

आम्ही लिहिलेल्या कथा तुम्ही इथे क्लिक करूया व्हिडीओ रुपात सुद्धा पाहू शकता.

मी: असे काही वाटले नाही पण तो गोरा आहे आणि मी सावळा तर तू त्याला सोडून माझ्यासोबत का प्रवास करशील?

ती: मंद आहेस का तू जरा? काळा गोरा यापलीकडे जाऊन माणसाचे मन पाहणे मला जास्त आवडतं आणि तू विषय कुठल्या कुठे घेऊन गेलास? bye.. मला नाही बोलायचं तुझ्याशी.

मी : सॉरी मला तसे काही म्हणायचं नव्हतं.

मी: ओये सॉरी ना… काय तू लगेच चिडतेस.

मी: रागेश्वरी जी.

मी: एवढा राग.. बोलणे बंद डायरेक्ट.

मी: खरंच सॉरी तू वेगळा अर्थ काढलास माझ्या बोलण्याचा.

मी तिला खूप मेसेज केले पण तिने काही रिप्लाय दिला नाही. मला वाईट वाटलं, मी बोलण्याच्या नादात खरंच काही वेगळं बोलून गेलो का पण एवढेही काही बोललो नाही की तिने एवढा अबोला धरला. मी तिला समोर बसून पाहत होतो. तिचा मुड ऑफ झालं होतं. चेहऱ्यावरील हसू गायब झालं होतं. ते पाहून मलाही वाईट वाटलं.

कॉलेज सुटल्यानंतर मी पनवेल बस स्टॉपवर उभा राहिलो. माझे आज पक्क ठरलं होतं की जोपर्यंत तिला बस मिळत नाही मी सुद्धा जाणार नाही. पण मला हे नव्हतं माहीत की माझी ही गोष्ट सवय होऊन जाईल. मी राणीकडे पाहिलं ती सारखा मोबाईल पाहत होती. ती माझ्या मेसेजची वाट तर नसेल ना पाहत? करू का मेसेज? देईल का ती रिप्लाय की अजून रागवेल? असे विचार करत असताना मी मेसेज केलाच.

मी: रागात आज कुणी जरा जास्तच गोड दिसतेय?

ती: तुला काय करायचं आहे?

मी: काही करायचं नाहीये पण रागात सुद्धा एवढं गोड कुणी दिसू शकते, हे मी आज पाहिलं.

ती: गप्प आता ठोंब्या. आणि तुला कसे कळले मी रागात आहे ते?

मी: इकडे तिकडे पाहू नकोस नाही कळणार मी कोण आहे?

ती: तू किती दिवस असे लपून बसणार आहेस मिस्टर अनोळखी. समोर कधी येणार?

मी: समोर मलाही यायचं आहे. पण थोड थांबावं लागेल. ते म्हणतात ना सब्र का फल मिठा होता है.

ती: ओके.

मी: बघ बसलीस ना अलिबाग बस मध्ये? पण तू पेण मध्ये राहतेस ना मग अलिबाग बसमध्ये का बसलीस?

ती: 😃 ठोंब्या आहेस तू ठोंब्या. अलिबाग बस पेण बस डेपो मधूनच जाते.

मी: हमम.. ठीक आहे. घरी पोहोचली का मेसेज कर?

ती: ओके.

तिची बस पनवेल स्टँडवरून सुटली आणि मी माझ्या उरण स्टँडवर आलो. तिच्या नादात माझ्या आवरे गावात जाणारी बस सुटली. आता पुढची बस एक तासाने होती. त्यामुळे वाट पाहण्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता.

घरी पोहोचताच रात्री जेवण करून मित्रासोबत टवाळक्या करायला बाहेर पडलो. माझी गँग आमच्या कट्ट्यावर आधीच होती. “काय महेंद्र द टॉपर? कसा वाटतोय नवीन कॉलेज?” अजय म्हणाला. “मस्त रे, आता जरा जम बसतोय. अनोळखी चेहरे ओळखीचे होत आहेत.” मी म्हणालो. “मग काय मिळाली का दातावर दात असणारी मुलगी” असे म्हणत विजय जोरजोरात हसू लागला. “विश्वास नाही बसणार भावांनो पण खरंच मिळाली.”

विजय: काय म्हणतोस काय?

संदीप: काहीही फेकू नकोस.

अजय: दाखव फोटो.

प्रफुल: उगाच आम्हाला बरं वाटेल म्हणून काहीही बाता मारू नकोस.

“अरे बाबांनो खरंच मिळाली आहे अशी मुलगी. माझाही माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही पण अशी मुलगी या धर्तीवर आहे हे पाहूनच माझा विश्वास बसत नाहीये. तिचे दात, डोळे, केस अगदी मला स्वप्नात दिसले तसेच आहेत. हीच आहे माझ्या स्वप्नातली मलिका.. माझी राणी.”

“अरे वाह.. महेंद्र म्हणजे आमची वहिनी मिळाली तर, राणी वहिनी. मस्तच.” संदीप म्हणाला. “चला या आनंदाच्या बातमीमुळे आज मी तुम्हाला पार्टी देतो” असे अजयने म्हटलं. मी म्हणालो “पार्टी तर मी द्यायला पाहिजे मग तू का देतोस?” “भावा तू दिली काय आणि मी दिली काय एकच आहे. आता तू शहरात शिकायला जातोस पैसा तुझ्या खिशात असणे गरजेचे आहे आणि तसेही आता वहिनी मिळाली मग तुझा खर्च वाढणार.” असे म्हणत सर्व हसू लागले.

त्या रात्री आम्ही चायनीज खात मस्त वेगवेगळ्या डिशेस वर ताव मारला. घरी येताना मला १२.३० वाजले. या सर्वात मी एक गोष्ट विसरूनच गेलो होतो की मी राणीला सांगितले होते घरी गेलीस का मेसेज कर. आणि मी या संपूर्ण वेळेत माझा मोबाईल एकदाही चेक नव्हता केला. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी मोबाईल बाहेर काढला तर तिचे पाच मेसेज मला नोटिफिकेशन मध्ये दिसत होते. मी मेसेजवर क्लिक केला तर असे मेसेज होते.

ती: पोहोचले घरी.

ती: जेवलास का?

ती: ठोंब्या.

ती: कुठे गायब आहेस.

ती: बाय.

मी तिला रिप्लाय टाईप केला.

मी: अग आज मित्रासोबत बाहेर गेलो होतो. आताच घरी आलो तेव्हा तुझे मेसेज पाहिले. सॉरी हा खूप सॉरी.

मी मेसेज सेंड करणार एवढ्यात माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. मोबाईल चार्ज करणार तर लाईट गेली होती. मला एकदम मेल्याहून मेल्यासारखे झाले. काय विचार करेल ती माझ्याबद्दल? एवढे मेसेज पाहून साधा एक रिप्लाय सुद्धा देता आला नाही या माणसाला. मला खूप वाईट वाटतं होतं. पण मी लाईट येण्याची वाट पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हतो.

कथेचा चौथा भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा

मी लिहलेल्या ह्या कथा पण वाचा

लेखक : पाटीलजी

Related Articles

2 comments

मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २ - Readkatha June 29, 2022 - 5:16 am

[…] भाग तीन वाचण्यासाठी इथे क्लिक करा […]

Reply
मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ४ - Readkatha July 1, 2022 - 3:26 am

[…] मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग ३ […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल