२०११ ची ही गोष्ट. पनवेलच्या आय टी आय कॉलेजला आमची भेट झाली. माझा बारावीचा रिझल्ट लागला हाईयेस्ट मार्कस होते म्हणून मी डी एडला ही फॉर्म भरला होता तिथे नंबर ही लागला पण तरीही मी डी एडला एडमिशन न घेता आय टी आय कॉलेजला एडमिशन घेतला. असे मी का केले ह्याचे उत्तर अजुन मला अजून सापडले नाहीये. तिथं कॉम्प्युटर ऑपरेटरच्या ट्रेडला माझं सेलेक्शन झालं. मी तर खूप खुश झालो होतो. आता काहीतरी नवीन शिकायला मिळेल याच आनंदात मी होतो.
घरात फक्त आई, बाबा माझ्या लहानपणीच वारले. मोठा भाव लग्न करून अलिप्त राहत होता. माझं गाव आवरे पनवेल पासून ३५ किलोमिटरच्या अंतरावर होते. त्यामुळे सकाळी लवकर उठून ६ ची बस गावातून पकडावी लागायची. जाण्या येण्याचा खर्च खूप जास्त होता. भावाची रिक्षा होती पण तरीही सगळ्याच गोष्टी वेळच्या वेळी मिळत नव्हत्या.
घरातील परिस्तिथी तशी गरिबीची, बाबांनी बांधलेलं छोटंसं वीटा मातीच घर होत. स्वप्न खूप मोठी होती पण परिस्तिथी पुढं काहीच करता येत नव्हत. पहिला दिवस कॉलेजचा छानच असतो कारण नवनवीन चेहरे पाहायला मिळतात आणि हेच चेहरे पुढे जाऊन आयुष्याचा एक अविभाज्य घटक ठरतात. थोडीफार मुल मुली वर्गात आल्या होत्या. मुलांशी मात्र लगेचच मैत्री झाली. मुलीही होत्या पण त्यांच्या पासून घाबरून थोडा लांबच होतो.
पहिल्या नजरेत सर्वच मुलं मुली छान वाटतात. पण आपण त्यांना फक्त त्यांच्या दिसण्यावरून जज करत असतो. हे चुकीचं आहे कारण समोरची व्यक्ती कशी आहे हे त्याच्या दिसण्यावरून नाही तर त्याच्या स्वभावावरून कळतं. रक्ताच्या नात्यापेक्षा दुसरं कोणतं नातं सर्वात सुंदर असेल तर ते मैत्री आहे. कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेटणारी ते मुलं मुली कधी बेस्टी होऊन आईसारखं द्यान द्यायला लागतात हे आपल्याला देखील कळत नाही.
पहिल्याच दिवशी एक ओढ सर्वात जास्त आपल्याला लागून राहिलेली असते ती म्हणजे वर्गात आपल्याला भावणारी, आपल्या मनात अलगद घर करणारी, डोळ्यांची नजर फक्त तिच्यावर अडकणारी मुलगी असतेच. जिचे दर्शन झालं की हे डोळे आणि आणि त्यासोबत आपलं फक्त आणि फक्त तिच्याकडे पाहण्याचा मोह आवरत नाही. हे माझ्यासोबत काय तर तुमच्यासोबत सुद्धा कधी ना कधी घडलेच असेल. थांबा थांबा भूतकाळात जाऊ नका, मी तुम्हाला माझ्या प्रेमकथेत आणले आहे. ते आधी पाहूया.
माझ्यासोबत अगदी असेच झालं. क्लासरूम मध्ये मुलं तर कमी होती पण अजून ती नजरेला भावणारी, नजर एका जागेवर स्थिर राहणारी मुलगी मला दिसली नव्हती. म्हणून थोडा उदास होतो. पण तसे पाहायला गेलात तर अजून एक दोन दिवस होते कारण अजून सर्वांचे सिलेक्शन झालं नव्हतं. कॉलेजचा पहिला दिवस संपला. आज मुलांसोबत तर थोडीफार ओळख झाली पण मुलींसोबत बोलायची हिंमत काही झाली नाही. “काय र पोरा कसा व्हता पयला दिवस शालचा?” आईने विचारले. “अग आई शाळा नाही आता तुझा मुलगा कॉलेज मध्ये आहे, खूप छान दिवस होता.” असे म्हणत मी घरातून बाहेर पडलो.
आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर आलो, तिथे अजय, विजय, संदीप आणि प्रफुल आधीच बसले होते. “आले आले शहरात शिकणारे मोठे लोकं आले” असे म्हणत अजयने विजयला टाळी देत सर्व हसू लागले. “हो हो करा मस्ती साल्यानो.. तुम्हाला चांगली टक्केवारी पडली असती तर तुम्ही सुद्धा आले असता माझ्यासोबत, पण परीक्षेच्या वेळी तुम्ही मात्र उनाडक्या करत होता ना?” मी थोड्या लटक्या रागातच म्हटलं. “चल द्यान देत बसू नकोस, सांग कसा होता कॉलेजचा पहिला दिवस? कसं आहे पनवेल शहर?” विजयने मध्येच प्रश्न केला. मी उत्तर देणार तेव्हा प्रफुलच म्हटला अरे ते जाऊदे वर्गात पोरी कशा आहेत ते आधी सांग बाकी सर्व जाऊदे, शहरातल्या मुली भारी असतात म्हणे?” असे बोलून ते खिदी खिदि हसू लागले.
आम्ही लिहिलेल्या कथा तुम्ही इथे क्लिक करूया व्हिडीओ रुपात सुद्धा पाहू शकता.
मी म्हणालो, “अरे बाबांनो मी शिकायला गेलोय शहराच्या कॉलेज मध्ये मुली पाहायला नाही.” तेव्हा संदीप म्हणाला, “हे बघ आपल्या गावात पण तेच केलेस फक्त आणि फक्त अभ्यास, आता जरा शहरात गेलाच आहेस तर अभ्यासासोबत मुलींकडे पण बघा, कदाचित तुम्हाला तुमच्या आवडीची मलिका मिळेल. त्याच्या या वाक्याने मी थोडा स्तब्ध झालो. आवडीची मलिका म्हणजे माझ्या स्वप्नातली राणी. आजही आठवतो मला ती रात्र. अचानक माझ्या स्वप्नात एका मुलीची कलाकृती दिसली होती. त्या मुलीची स्माईल, हसताना दिसणारा दाताच्या वर असणारा तो एक दात, तिचे ते लांबसडक केस, आणि काळेभोर डोळे तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकत होते. नीटसा चेहरा नाही दिसला पण जे काही दिसले त्यावरून असे ठरवले होते की काहीही असो या तीन गोष्टी पैकी दोन गोष्टी जरी कोणत्याही मुळीत असल्या तरी त्या मुलीला माझ्या आयुष्याची अर्धांगिनी करणार.
माझ्या स्वप्नातल्या चंदेरी दुनियेत मी रंगलेलो असताना अजयने मला टपली मारत पुन्हा एकदा वर्तमानकाळात आणले. “पुन्हा तेच स्वप्न पाहू लागला ना? अरे अशी मुलगी नाही रे बाबा जिच्या दातावर दात असेल, काहीही असते तुझे. आता कॉलेज मध्ये जी चांगली वाटेल तिच्यासोबत बोल जरा सोड तुझी ही स्वपणातील दुनिया नाहीतर या संदीप आणि प्रफुल सारखा सिंगलच राहशील” म्हणून विजय आणि अजय जोरात हसू लागले. मलाही माहित होत की मी बालिश विचार करतोय.
असे थोडी असतं की स्वप्नात पाहिलेली मुलगी कधी खऱ्या आयुष्यात समोर येते. हे असे फक्त सिनेमात होतं. पण सिनेमा सुद्धा खऱ्या आयुष्यातून प्रेरित होऊन लिहिलेला असतो ना? या आशेवर मी माझ्या राणीला शोधत होतो. आज कॉलेजचा दुसरा दिवस होता. वर्गात शिरताच रोहन ने मला आवाज दिला. रोहन काळ झालेला माझा पहिला मित्र त्यासोबत वर्गात किशोर, मंगेश, निलेश, रवींद्र, संतोष, विवेक, मनोज, नवनाथ, नील, प्रशांत, प्रतीक अशी मुले होती. काही चेहरे काळ सुद्धा पाहिले होते तर काही आज नव्याने पाहत होतो. मोजकीच मुलं होती आणि मुली सुद्धा पण मुलींची ओळख नसल्याने तुम्हाला मी आताच नावं सांगत नाहीये. पुढे जाऊन तुम्हाला ती कळतीलच.
या सर्व मुली मध्ये एक मुलगी खूप बडबडी होती. तिचे नॉनस्टॉप बोलणे थांबतच नव्हते. किती बडबड करते ही, कानाला त्रास झाला माझ्या असे मी स्वतः सोबतच पुटपुटलो. मोनिका नाव होतं त्या मुलीचे. पण असतात ना वर्गात काही अशा मुली ज्या बोलल्या नाहीत तर वर्ग एकदम शांत आणि भकास वाटतो. त्याच कॅटेगरी मध्ये मोनिका होती. तिच्यासोबत दर्शना म्हणून एक मुलगी होती. क्लास मध्ये टॉपर म्हणून तिचे सीलेक्शन झालं होतं. “म्हणजे मला हिला मात देऊन पहिला क्रमांक काढायचा आहे तर” असे म्हणत मी स्वतः सोबत हसलो.
आता वर्गात मोनिका, दर्शना, आम्रपाली, सोनम, सुषमा, श्रद्धा, चैत्राली, रजनी, रोशनी, आणि रोशनी कोळी अशा मुली होत्या. पण या सर्वात अशी माझ्या मनाला भिडेल अशी मुलगी काही मला वाटली नाही. असे नव्हते की या मुली सुंदर नव्हत्या पण माझ्या स्वप्नातली मुलगी थोडी वेगळी होती आणि मी तिची वाट पाहतो होतो. पण म्हणतात कधी कधी आपण काही म्हणतो आणि देव तथास्तु म्हणून आपली इच्छा पूर्ण करतो. माझ्याशी बाबतीत तेच झालं. एका मुलीने क्लास मध्ये प्रवेश केला. लांबसडक केस, हाईट कमी, काळेभोर डोळे आणि स्माईल केल्यावर दाताच्या वर असणारा दात.
मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग दोन इथे क्लिक करून वाचा
आपल्या या काही निवडक कथा सुद्धा वाचा.
कथेचा दुसरा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल. सर्वात आधी तो भाग तुम्हाला वाचायच्या असेल तर आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा. आपण आपल्या या पेजवर नेहमी प्रेम गा विषयावर कथानक लिहत असतो. प्रेमकथांची आवड असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहेत.
क्रमशः
लेखक : महेंद्र पाटील (पाटीलजी)
आवरे उरण, रायगड
3 comments
[…] कथेचा पहिला भाग इथे क्लिक करून वाचा […]
[…] मैत्री प्रेम लग्न घटस्फोट Part 1 & मैत्री प्रेम लग्न घटस्फोट Part 2 इथे क्लिक करून वाचा […]
[…] मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग १ […]