मकर संक्रांती या दिवशी सूर्य हा धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करत असतो. खर तर मकर संक्रांती ही प्रत्येक वर्षी 14 जानेवारीला का येते पण यावेळी सूर्याने मकर राशीमध्ये 14 जानेवारीला रात्री 2 वाजून 7 मिनिटांंमध्ये प्रवेश होणार असल्याने यंदाची संक्रांत ही 15 जानेवारीला आली आहे. हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रात ही भारतामधे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते. जरी याला नावे वेगवेगळी असली तरी प्रत्येकाच्या मनात एकच भावना आपल्याला दिसून येते.

या दिवशी जास्त करून स्त्रिया या काळया रंगाच्या साड्या अंगावर परिधान करत असतात. आता आपल्याला पहिल्यापासून माहीतच आहे की ही प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे पण यामागील नक्की कारण काय आहे हे आपल्याला माहीत नसते. काही लोक म्हणतात की काळा रंग हा अशुभ आहे पण तसे मुळीच नाही. कोणताही रंग हा अशुभ नसतो तर आपण आज काळे कपडे का घातले जातात याचे मुख्य कारण पाहूया. जसे पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्यामुळे आपल्या शरीरावर येणारी उष्णता परावर्तित होते म्हणजे पांढरा रंग जसा उष्णता फेकून देतो त्याचप्रमाणे काळा रंग हा उष्णता आपल्या मध्ये शोषून घेत असतो आणि आपल्याला माहीतच आहे या महिन्यात खूप जास्त थंडी असल्यामुळे काळया रंगाच्या साड्या किंवा कपडे घातल्याने आपल्या शरीरात उष्णता शोषून घेतली जाते. आणि त्यामुळे थंडीच्या दिवसात ही आपण उबदार राहू शकतो.
तसेच या दिवसात तीळ आणि गुळाचे लाडू किंवा चिक्की बनवले जातात. काहीजण तिळाच्या पोळ्या करतात. असे विविध प्रकार आपल्याला वेगवेगळ्या प्रांतात पाहायला मिळतात. तीळ आणि गूळ यांच्या सेवनामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा थंडीच्या दिवसात अतिशय उपयोगी असते आणि म्हणून आपण एकमेकांना तिळगूळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतो या दिवशी अनेक प्रकारचे दान ही केले जातात.