Home करमणूक मानसी नाईक उरकला आपला साखरपुडा, पहा कोण आहे तिचा होणारा नवरा आणि काय करतो?

मानसी नाईक उरकला आपला साखरपुडा, पहा कोण आहे तिचा होणारा नवरा आणि काय करतो?

by Patiljee
7566 views
मानसी नाईक

मानसी नाईक ही मराठी चित्रपट सृष्टी मधील अत्यंत हॉट अशी अभिनेत्री आहे. तिची मादक अदा आणि डान्स ह्यामुळे नेहमीच ती चर्चेत असते. तिचे जे चित्रपट आले त्यातील ‘मस्त चाललंय आमचं’, ‘कुटुंब’ हे आहेत. तसेच तिने अनेक व्हिडिओ साँग केले आहेत. त्यातील तिची अदा आणि सॉलिड डान्स यामुळे तिची गाणी ही सुपरडुपर हिट होतात. तिची दिलखेच अदा प्रेक्षकांना आकर्षित करते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ हे तिचे सोंग अगदी सुपरहिट ठरले.

आपल्याकडे या गाण्यावर नाचनाऱ्यांची संख्या कमी नाही कारण ही गाणी आहेतच अशी जी कोणालाही ठेक्यावर ताल धरायला लावतील अशी. इ टीव्ही वरील चार दिवस सासूचे या मालिकेमध्ये ही मानसी हिने काम केले आहे. तसेच अनेक लावण्याही केल्या आहेत. मानसी नाईक ही अभिनेत्री आता प्रेमात पडली आहे. आणि गपचूप आपला साखरपुडा सुद्धा उरकून घेतला आहे. होणारा नवरा एका बॉक्सर आहे. त्याचे नाव आहे प्रदीप खरेरा आणि तो इंटरनॅशनल लेवलचा बॉक्सर आहे आणि वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आशिया गटातलं विजेतेपद त्याने मिळवलेलं आहे.

मानसी हिने स्वतच्या इंस्टाग्राम अकाउंट वर आपले बॉय फ्रेंड सोबतचे फोटो शेअर करून आपल्या साखरपुड्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. शिवाय प्रदीप याने ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर मानसी हिने मानसी हिचे फोटो पोस्ट करून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या या आयुष्यात यावी आणि तिने मला आयुष्यभर सांभाळून घ्यावे माझ्या चांगल्या वाईट सवयी सांभाळून घेणारी आणि प्रत्येक गोष्टीत आपल्या दोघांची आवड एकच आहे असे त्याने त्या फोटो सहित शेअर केले आहे.

मानसी हिने आपल्या प्रेमाची कबुली जरी आपल्या चाहत्यांना करून दिली असली तरी आपल्या लग्नाबद्दल तिने कोणतीच माहिती दिलेली नाही तर बघुया मानसी नाईक कधी अडकणार आहे आपल्या लग्नाच्या बेडीत. पण लवकरच ते दोघं बोहल्यावर चढतील.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल