माझी मैत्रीण निता स्वभाव एकदम साधा, कोणी कितीही बोललं तरी ती कोणाला कधीच उलट बोलत नसे. आम्ही दोघी लहान पणापासूनच्या मैत्रिणी. एकमेकींच्या सगळ्याच गोष्टी आम्ही दोघीही शेअर करत होतो, अगदी काहीही झाले तरी. मी सध्या नववीत होते आणि तिच्या आई वडिलांनी तिला पाचवीत असतानाच शाळेतून काढले होते, अभ्यासात खूप हुशार होती ती तिचा दरवर्षी पहिला क्रमांक यायचा. तिला शाळेतून काढले यावर आमच्या शाळेतील शिक्षक ही तिच्या वडिलांना समजवायला घरी गेले होते पण आमची मुलगी आम्ही शिकवू शकत नाही तिला असे सांगून शिक्षकांना ही परत पाठवले.
खरं तर यासाठी तिच्या घरातील जबाबदार होते. त्यांना अजिबात वाटत नव्हते की निता ने चांगलं शिक्षण घ्यावे म्हणून मुळात तिने शिकुच नये असेच तिच्या घरातल्यांना वाटत होते. तिची आई खूप वाईट होती, खर तर आई वाईट असू शकते या गोष्टीवर माझा विश्वासच नव्हता कारण आईसारखी माया कुठेच नाही असा माझाच विश्वास होता. पण हा विश्वास नीताच्या आईने मोडला होता. ही काही तिची खरी आई नव्हती सावत्र आई होती. त्यामुळे प्रत्येक सावत्र आई जशी वागते तशीच ही सुद्धा वागायची. म्हणायला आई होती पण आईसारखे कोणतेच गुण तिच्यात नव्हते.
कधी नीताला खेळायला बोलवायला गेले तर माझ्या अंगावर खसकन यायची म्हणायची काही खेळायला वैगरे नाही येणार काम पडलीत घरात आणि तिच्याकडून सगळ्या घरातील काम करून घायची. नीता ही ते सगळं निमुटपणे सहन करत होती कारण तिची आई गेल्यापासून बाबा ही खूप वाईट वागत होते तिच्यासोबत, पण तरीही ती पहिल्यासारखी मला काहीच सांगत नव्हती, पहिल्यासारखी हसत नव्हती, चेहऱ्यावरचं तेजच निघून गेलं होत . काही विचारलं तर नुसती रडायची. मी कितीतरी वेळा तिला विचारले पण ती काहीच सांगत नव्हती.
रोज यायची पण खेळायची नाही आता मी कॉलेजला बाहेर शहरात जात होते पण तरीही मी रोज न चुकता निताला भेटायला जायचे. पण का कुणास ठाऊक या वेळी मला नितामधे बदल जाणवत होता. तिच्या शरीरात का कुणास ठाऊक पण मला बदल झालंय असे वाटत होते, मी एक दोनदा तिला विचारले ही पण तिने उडवा उडविची उत्तरे दिली आणि वेळ मारून नेली. पण काही दिवसातच तिचे पोट खूप जात फुगल्या सारखे वाटत होते. मी तिला विचारलं की हे काय झालंय असं तुझी तब्बेत तर अगदीच विक आहे आणि पोट कसे काय ग एकदम फुगले? यावर ती काहीच बोलली नाही आणि तशीच घरी निघून गेली. मी हे सगळं माझ्या आईला सांगितलं माझ्या आईने नीताला भेटायला बोलावले. तेव्हा जी गोष्ट मला कळली तो खरंच धक्कादायक होती.
नीता गरोदर होती पण मला माहित होते की लग्न झाल्यावर बायका गरोदर होतात. पण नीताच्या बाबतीत हे काय वेगळच ऐकायला मिळत होते. माझ्या आईने तिला खोदून खोदून याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली माझे बाबा रोज माझ्या सोबत… ? तुझ्यासोबत काय माझ्या आईने विचारले. माझ्यासोबत नको ते करतात सगळ्या शरीराशी खेळत असतात मला खूप घाण वाटते, रोज रात्री दारू पिऊन येतात आणि माझ्यावर किळसवाणे चाळे करतात. मला सांगायला ही लाज वाटते मला याचा खूप त्रास होतो, पहिल्यांदा तर माझी अवस्था खूप वाईट झाली होती खूप दुखत होते. पण आता सवय झाली आहे.
माझ्या आईला हे सर्व माहीत आहे पण तरीही ती काहीच बोलत नाही याच गोष्टीचा मला जास्त त्रास होतो या जागेवर जर माझी खरी आई असती तर कदाचित ती माझ्या सोबत असती पण आता ते ही नाही. माझं असं कोणीच राहील नाही काय करू मी कधी कधी वाटतं त्या गावातल्या विहिरीत जाऊन जीव द्यावा पण आता पोटात पोर आहे म्हणून तेही पण नाय करू शकत. जाते मी असं म्हणून निता आमच्या घरातून निघून गेली पण आमच्या समोर प्रश्नाचा भंडार सोडून गेली.
मी माझ्या आईला विचारले आई आपण नितासाठी काही करू शकतो का ग? आई पण काहीच न बोलता स्वयंपाक घरात निघून गेली. पण आज संपूर्ण दिवस माझी आई गूढ विचारात आहे असे वाटले जेवली ही नाही नीट. तिने हे सगळं माझ्या बाबांना सांगितले माझ्या बाबांना हे ऐकुन तर आश्चर्याचा धक्का बसला कारण एक बाप आपल्या मुलीवर असे कसे करू शकतो पण ते इथेच थांबले नाही त्यांनी बाबांचे मित्र वकील आहेत त्यांना फोन केला या सगळ्यासाठी जवळ जवळ आठ दिवस गेले म्हणजे वकील नंतर पोलिस यांना आपण म्हणणं पटवून देणे पोलिस स्टेशनला चार ते पाच फेऱ्या मारल्या.
शेवटी त्या दिवशी आमच्या कडे पोलिस हजर झाले. पोलिसांना आमच्या बाबांनी सर्व हकीकत सांगितली लागलीच पोलिस नीताच्या घरी गेले. पण तिथं गेल्यावर आमचीच फजिती झाली निताच पोट जसं च्या तास म्हणजे पाहिल्यासारखं तिच्या पोटातली बाळ गेलं कुठे? जवळ जवळ पाचवा महिना चालू होता पण आता तिच्या पोटात तस काहीच दिसत नव्हतं. नीताचे बाबा जसे काय काहीच न केल्या सारखे पोलिसांना सांगत होते, मला तर असा राग आला होता पण मी काहीच करू शकत नव्हते. आणि आता माझे आई आणि बाबा ही हतबल होते, कारण निता ने ही या गोष्टीबाबत नकार दिला. ही चक्क नकार असे काहीच नाही म्हणाली. माझे बाबा खूप चांगले आहेत ते अस काही करू शकत नाही आणि मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते तुम्ही इथ येण्याची कष्ट घेतले त्याची.
पण माझी आई गप्प बसली नाही ती म्हणाली अग पण तूच तर मला सांगत होतीस ना की, तुझे बाबा तुझ्यावर रोज नको ते अत्याचार करतात म्हणून आणि तू त्यातून गरोदर पण राहिली होतीस. नाही मी कधीच तुम्हाला असं म्हणाले नाही इतकचं बोलून निता आतल्या रूम मध्ये निघून गेली.
आम्हाला काय समजायचे ते समजले, पोलीस ही निघून गेले, पण आमच्या दोघींच्या मैत्रीत फूट पडली. कारण नीताने सगळ्यांसमोर माझ्या आई बाबांना खोट ठरवलं. इतकं होत तर आम्हाला सांगायचंय नव्हतं ना? आम्ही तिच्यावर होणाऱ्या अन्याय बद्दल बदला घेणार होतो , कदाचित तिला धमकी ही दिली असेल ? पण आता काहीच राहिले नव्हतं. मला तरी वाटते तिने गर्भपात केला असेल. आणि आता तिला सतत गर्भपात करावा लागेल कारण एका राक्षसाचीची हवस कधीच संपत नाही.
लेखक : पाटीलजी
मित्र मैत्रीणीना तुम्हाला जर भयकथा वाचायची आवड असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास नवीन साईट तयार केली आहे.
2 comments
[…] भयाण विकृती […]
[…] भयाण विकृती […]