Home कथा ब्रेकअप

ब्रेकअप

by Patiljee
15920 views

आज बऱ्याच महिन्यांनी आम्ही भेटणार आहोत. म्हणजे कमीतकमी ९ महिन्याच्या ही वर अवधी गेलाच असेल. तसे पाहायला गेलो तर कारण खूप शुल्लक होत पण आम्ही दोघांनीही समंजसपणा न दाखवता वाद वाढवत नेला आणि मग होत्याच नव्हतं झालं. आमचं ब्रेकअप झालं, पाहायला गेलो तर चूक दोघांची सुद्धा होती. माझे आणि ओविचे दोन वर्षांपासून एकमेकावर मनापासून प्रेम होतं.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला मी तिला प्रपोज केलं होतं. आजही आठवतोय तो दिवस, तिने मी प्रपोज करताच जोरात माझ्या कानशिलात लगावली होती. अक्षरशः सर्व कॉलेजमध्ये मी हास्याचा विषय बनलो होतो. त्या दिवशी मला तिचा सर्वात जास्त राग आला होता. कारण आमच्या मध्ये वर्गात असताना अनेकदा नजरेला नजर भिडली होती. नेहमीच माझी नजर तिच्याकडे गेल्यावर तिची दिल खुलास स्माईल माझ्या काळजात भिडायची. म्हणूनच मला वाटत होत की तिचा माझ्यासाठी ग्रीन सिग्नल आहे. पण आज कानशिलात खाल्यानंतर माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता.

परत कधी प्रेमाच्या वाट्याला जाणार नाही मी असे ठरवलेच होते. पण दोन दिवसानंतर तिचा कॉल आला. रागावलास? खरंच खूप सॉरी री, मनापासून सॉरी. मलाही तू आवडतोस पण संपूर्ण कॉलेज समोर तू मला प्रपोज केलेस, मुलं मुली पाहून हसत होते. मग काय करावं काहीच कळले नाही आणि तुझ्यावर माझा हाथ उचलला. पण त्यासाठी आता मी तुझी माफी मागतोय. Love you काल्या. तिचे ते शब्द माझ्या मनात एवढे रुतले की डोळ्यातून आश्रू बाहेर पडले.

तेव्हापासून आमच्या प्रेम प्रवासाला सुरुवात झाली. कॉलेज संपल्यानंतर पुढील दोन वर्ष मी जॉब केला. ह्या दोन वर्षात आम्ही इतका वेळ सोबत घालवला की आम्हाला एकमेकांची सवय होऊन गेली. आम्ही जणू नवरा बायको आहोत असेच वागत होतो. घरी सुद्धा सर्व माहित होत त्यामुळे आम्हाला बोलणार ही कुणी नव्हतं. मलाही चांगलां जॉब होता त्यामुळे आम्ही लवकरच लग्नाची बोलणी सुद्धा करणार होतो. पण म्हणतात ना चांगल्या चाललेल्या गोष्टींना कुणाची तरी नजर लागते. तसेच काहीसे आमच्या नात्यात झाले.

मला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावे लागत असे, कधी कधी तर मी आठवडा आठवडा जिल्ह्याबाहेर राहायचो. त्यामुळे तिचे आणि माझे बोलणे कमी होऊ लागले. ह्यात संशयाच्या किड्याने सुद्धा जन्म घेतला होता. मी असा बाहेर राहिल्याने तिला माझ्यावर संशय निर्माण होऊ लागला होता. त्यात भर म्हणून ती जेव्हा पण मला कॉल करायची तेव्हा मी काहीतरी कामासाठी कुणाशी ना कुणाशी फोनवर बोलत असायचो. त्यामुळे तिचा संशय अजून बळावला होता.

पण मला माहित होत की मी तिच्याशिवाय कुणाचाच विचार करू शकत नव्हतो. मी तिला हे नेहमी पटवून देण्याचा प्रयत्न केला पण तिच्या मनात खूप जास्त संशय निर्माण झाला होता आणि अखेर तिने एक दिवस माझ्याशी ब्रेकअप करून टाकलं. त्रास तर तिलाही होत होता पण ती दाखवत नव्हती. मी रडलो, चुकी नसताना माफी सुद्धा मागितली पण तिने माझे काहीच ऐकले नाही.

ब्रेकअप नंतर आयुष्य जणू एक थेंबही पाणी नसलेल्या वाळवंटासारखे झाले होते. मोबाईलची थोडी सुद्धा नोटिफिकेशन वाजली तरी असेच वाटायचे की तिचाच मेसेज आला आहे. ह्या काळात अर्जित सिंग ने खूप साथ दिली. खरंच त्या माणसाच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे. त्याची गाणी ऐकताना असेच वाटतं की ते साँग फक्त आणि फक्त आपल्यासाठी लिहिले गेले आहे.

मला आधी वाटले की हा ब्रेकअप काही वेळेपूरता असेल. पण मी इथे खोटा ठरलो कारण तिने ठरवले होते की कधीच मला संधी देणार नाही. पण माझी तर काहीच चुकी नव्हती. पण तिला हे समजूनच घ्यायचे नव्हते. मी त्या काळात तिला खूप मेसेज, खूप कॉल केले. पण तिने एकही मेसेज किंवा कॉलचा रिप्लाय केला नाही.

तरीसुद्धा मी तिला मेसेज करत राहिलो. अखेर तिने माझ्या मेसेज ना कंटाळून मला ब्लॉक सुद्धा केले. पण मला त्या गोष्टीचा सुद्धा राग आला नाही कारण माझे तिच्यावर खूप प्रेम होतं. मला काही केल्या ती परत माझ्या आयुष्यात हवी होती. काही महिने गेले तरी तिने मला कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाही. काळ तिचा फोन आला. भेटायला बोलावले आहे. सर्व पूर्वरत करू असे म्हणतेय. मी खुश तर खूप आहे पण नक्की मी तिला भेटायला जाऊ की नको ह्या संभ्रमात आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांना मी जावे की नाही? मला कमेंट करून नक्की सांगा.

ह्या पण कथा वाचा

लेखक : पाटीलजी

Please follow and like us:

Related Articles

2 comments

Balaji June 9, 2020 - 3:35 am

प्रेमात सर्व काही माफ असतं फक्त प्रेम असलं पाहिजे.तुम्ही जाऊन भेट घ्या तुम्हाला तीच वर विश्वास असेल तर नाहीं तर नको

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल