आज खुप दिवसांनी स्वरा ऑनलाईन आली होती मोबाईल हातात घेतला आणि फेसबुक बघत होती. त्यात ती छान छान पोस्ट,कविता वाचत होती. एका ग्रुप मध्ये पोस्ट होती जीवा नावाच्या व्यक्तीने केलेली त्यात एक साँग होत तिला ते आवडलं तिने कमेंट केली (माझं आवडीच साँग आहे) ती दिवसभर ते साँग ऐकत बसली. दुसऱ्या दिवशी तिला त्या पोस्ट वर रिप्लाय आला (धन्यवाद)
स्वरा खुप लाडकी लेक आई वडील ची एकुलती एक,सुंदर, हट्टी, स्वभावाने प्रेमळ होती,सगळ्या गोष्टीत हुशार होती. दोघं सारखेच होते.
फारशी कोणाशी न बोलणारी स्वरा आज जीवाशी बोली तिने त्याला मेसेज केला “hi”. दोघांचा संवाद सुरू झाला. दोघांच्या आवडी निवडी सारख्याच होत्या. आता त्या नात्याला मैत्रीचं रूप आल होत. ते दोघे एकमेकांना खुप छान ओळखू लागले, जीवा पण खुप समजुतदार मुलगा होता, आई वडिलच्या आज्ञेत राहणारा,हुशार प्रामाणिक,स्वभावाने प्रेमळ मनावर कोणाच्या पण राज्य करणारा,पण तेवढाच भावुक.
स्वराला आता करमत नव्हते जीवा ला बोल्याशिवाय त्यांना एकमेकांची सवय होऊन गेली होती. रोज मेसेजवर बोलायचं. नाही म्हणत मनात एक विचार आला जीवाच्या आपण स्वराचा अजुन आवाज नाही ऐकला त्याने लगेच तिला मेसेज करून विचारले” आज आपण कॉल वर बोलुयात का?” स्वरा हे ऐकुन खुप आनंद झाला पण..
“अहो आपण नंतर कधी तरी बोलू आज नको!” जीवा नाराज होऊन बोला “का बोलु नाही शकत” स्वरा आजारी पडली होती तिचा आवाज खराब झाला होता…”मी आजारी आहे आवाज खराब झालाय”
जीवाला आता काळजी वाटत होती स्वराची “काळजी घ्या” अस बोलला. दुसऱ्या दिवशी परत जीवा बोलला “असुद्या ओ तुमचा आवाज खराब पण मला आज बोलायचय तुमच्याशी” आज स्वरा नकार देऊ शकत नव्हती कारण तिला पण जीवाचा आवाज ऐकायचा होता बोलायचं होत..”करा तुम्ही कॉल”. जीवाला खुप आनंद झाला त्याने केला लगेच कॉल. तिचा आवाज थोडा खराब आला तीच हसुन बोली”तुम्ही हसू नका माझ्या आवाजावर” जीवा पण हसुन बोला” नाही ओ तुमचा आवाज छान आहे होईल बरा “
त्यांच्या छान गप्पा रंगल्या खुप वेळ दोघं बोले बोलून दोघं खुश झाले होते.
रोज बोलण होत होत त्यांचं एक दिवस नाही बोलले तर करमत नव्हत दोघांना. एक दिवस खुप पाऊस झाला जिवाच्या गावी नेटवर्क येत नव्हत तिकडे सकाळ पासून स्वरा त्याच्या मेसेजची वाट पाहत होती, तिचा जीव लागत नव्हता. जीवाचा कॉल पण नव्हता आला आता रात्र झाली होती तरी स्वरा मोबाईल हातात घेऊन बसली होती. तिला काहीच कळेना काय करु,कोणाला सांगू. एक मेसेज आला तो जिवाचाच होता. त्याने सांगितलं इकडे खुप पाऊस झालाय नेटवर्क प्रॉब्लेम आहे. स्वरा मेसेज बघुन खुश झाली तिच्या जीवात जीव आला होता.
तिच्या डोळ्यातुन पाणी आलं आनंदाश्रु …ती हसली तिने सांगितल ” मी खुप घाबरले होते तुमचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता”………क्रमशः..
ही कथा सुद्धा वाचा : चार वर्षांनी जेव्हा X गर्लफ्रेंडला भेटायला जातो तेव्हा
भाग दोन लवकरच
ही कथा आपल्याच पेजवरील एका मुलींनी पाठवली आहे. कृपया त्या मुलीने मला इनबॉक्स मध्ये मेसेज करावे.