Home विचार मराठी राज्यभाषा दिवस निमित्त निर्भिड लेख

मराठी राज्यभाषा दिवस निमित्त निर्भिड लेख

by Patiljee
446 views

भैया ये कितने का दिया? क्या भैया कम करो कुच्छ? इतने देर से क्यो आये भैया? पनवेल चलोगे भैया? भैया ये ॲड्रेस कहा पडेगा? आठवलं काही? हो.. हो.. ही तुमचीच दैनंदिन आयुष्यातील वाक्य आहेत. बहुदा ह्याच वाक्याने तुमचा दिवस सुरू होतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही मराठीपेक्षा हिंदी मध्ये जास्त बोलता. थोडं लागलं ना मनाला? कटू आहे पण सत्य आहे.

चला याच बाबतीत माझा एक अनुभव सांगतो. मी ब्लॉगर आहे त्यामुळे मला गुगलकडून डॉलरमध्ये पैसे मिळतात. जेव्हा पहिल्यांदा माझ्या अँडसेंस अकाउंटमध्ये ही रक्कम जमा झाली तेव्हा खुश होतो पण रक्कम अकाउंटमध्ये जमा होण्यासाठी बँकेची वाट धरावी लागणार होती. कारण जर इंटरनॅशनल रक्कम आपल्या अकाउंटमध्ये यायची असेल तर प्रत्येक बँकेचा एक स्विफ्ट कोड असतो तो गुगलला द्यावा लागतो तेव्हाच ते आपल्या अकाउंटमध्ये पैसे पाठवतात.

याच गोष्टीसाठी मी माझी बँक गाठली. आता बँक कोणती आहे सांगून त्या बँकेला कमीपणा आणणार नाही पण जवळजवळ सर्वच बँकामध्ये हेच चालू आहे. तिथे गेल्यावर सुरुवातीलाच सिक्युरेटी गार्ड ने आडवले. कहा जाना है? मी म्हटलं बँकेच्या मॅनेजरला भेटायचं आहे. त्याने तिष्ण नजर टाकत मला म्हटलं, क्या बोले? मी त्याला अतिशय नम्रपणे म्हटले, “तुमच्या मॅनेजरला भेटायचं आहे, आहेत का ते? यावर त्याचे उत्तर ऐकून तुम्हालाही राग येईल. आप मराठी बोल रहे है क्या? वो मुझे नहीं आती, हिंदी में बात किजिये.

माझा राग अनावर झाला. मी का हिंदी मध्ये बोलू, तू माझ्या महाराष्ट्रात आहेस, मी तुझ्या राज्यात नाही. तरीपण मी शांतपणे म्हटलं, मला हिंदी येत नाही फक्त मराठी येत. माझे शब्द त्याला फारसे काही कळले नसावे पण माझ्या इशाऱ्यावरून कळलं की मला काय म्हणायचं आहे. त्याने मला समोरच्या डेस्क कडे पाठवत म्हणाले, आप उस डेस्क पे जावो. त्याची हिंदी डोक्यात जात होती पण शांत बसलो.

डेस्क समोर जाऊन उभा राहिलो तर एक तरुणी बसली होती. बोलीये क्या काम है? इथे सुद्धा हिंदी. मी म्हटलं तुमच्याकडे मराठी बोलणारे कुणी नाही का? माझ्या या प्रश्नावर थोडी भांबावली पण तिला बहुदा ते तिला कळले असावे म्हणून तिने तिच्या कर्मचाऱ्याला आवाज दिला, जयेश इनको देख क्या चाहिए? त्यानंतर एक मुलगा समोर आला. बोला काय मदत करू शकतो. बऱ्याच वेळानंतर आठवले हा आपण महाराष्ट्रात राहतोय. आता मराठी कानी पडलीय.

माझे काम तर होईल पण मित्रा एक गोष्ट सांग की तुमच्या बँकेत किती मराठी लोक काम करतात? त्यावर तो हसून म्हणाला सर मी आणि एक पिऊन आहे फक्त दोघेच आहोत. त्याच्या वरवरच्या हसण्याचे दुःख मी समजू शकत होतो. त्याच्याशी बोलून कळलं की या बँकेत १६ कर्मचारी आहेत आणि त्यातले फक्त दोन मराठी आणि बाकी सर्व अमराठी. आणि त्यात जो सिक्युरेटी गार्ड आहे त्याला महाराष्ट्रात येऊन फक्त एक आठवडा झाला आहे आणि तो इथे कामाला रुजू झाला.

मग आपली मराठी मुलं कुठे मागे पडत आहेत का? इथे चूक या माणसाची नाही आहे, चूक आपली आहे. आपणच आपल्या महाराष्ट्राला अमराठी करून सोडलं आहे. कुठल्या दुकानात गेलो, मॉलमध्ये गेलो, चित्रपटगृहात गेलो, किंवा इतर कोणत्याही पर्यटन स्थळी गेलो तरी आपण तिथल्या दुकानदार, रिक्षावाले, हॉटेलवाले यांच्याची हिंदी मध्येच बोलतो. अरे का बोलायची आपण हिंदी? हा महाराष्ट्र माझा आहे, अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मिळवलेलं माझं राज्य, माझ्या राजांनी रक्त सांडवून घडवलेलं स्वराज्य आहे मग मी हिंदी का बोलू? मी मराठीतच बोलेन. असा जर तुम्ही ठाम दृढ संकल्प केलात तर पहा आपली मराठी चौहीकडे ऐकू येईल.

आपण स्वतःला मराठी समजतो मग तसे वागणुकीमध्ये पण दिसुद्या. ट्रेनमध्ये सिटवर बसण्यासाठी अरे सरको आगे, थोडा जगह बनाव, असे म्हणण्यापेक्षा गर्वाने मोठ्या आवाजात म्हणा, पुढे सरका मला आत जाऊदे, किंवा पुढे सरका थोडी जागा बनवा बसायला. बोलणं खूप सोपं असतं फक्त आपण बोलत नाही हो आपली घौडचूक आहे. मराठी असल्याची लाज काय बाळगता? अभिमान बाळगा तुम्ही मराठी आहात. आपली भाषा आपण जपली तरच ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जाईल.

नाहीतर आताची परिस्थिती पाहिली तर आपल्याच मराठी कुटुंबात अनेक मुलांना मराठी बोलताच येत नाही आणि त्यांचे आई वडील मोठ्या तौऱ्यात सांगतात इंग्लिश मिडीयममध्ये शिकतोय, सर्व काही इंग्लिश मध्येच असते मग मराठी येत नाही. अरे ज्या गोष्टीची लाज बाळगायची त्याचा अभिमान कसला बाळगता? मुलगा अडीच तीन वर्षाचा झाला की पालकांची लगबग सुरू होते कोणती अशी शाळा शोधण्याची ज्यात उत्तम इंग्लिश शिकवले जाते. यापलीकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतके पालक असतात जे आपल्या मुलांना मराठी शाळेत टाकतात.

जर तुम्हीच तुमच्या मुलांना आपली मराठी भाषा, आपली मराठी संस्कृती शिकवली नाही तर हा वसा पुढे नेणार तरी कोण? काही वर्षात महाराष्ट्रात फक्त इंग्लिश भाषा कानावर पडेल? मग आपल्या मायबोली मराठी भाषेचे काय? ती कुणी जपायची? ती आपणच जपली पाहिजे. नुसते सोशल मीडियावर व्यक्त होण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवून आणा. तुम्हालाच तुमची भाषा जपायची गरज आहे.

म्हणून यापुढे स्वतःला हजार वेळा बजावून ठेवा. जिथे जिथे जाल तिथे मराठीतच बोला. अगदी समोरच्याला समजली नाही तरीही बोला. एखाद्या दुकानदाराला मराठी समजत नसेल तर त्याकडून वस्तूच घेऊ नका आणि वस्तू का घेत नाही याचे कारण देखील त्याला ठळक अक्षरात समजावून सांगा. मग बघा तो दुकानदार सुद्धा मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्रात काम करणाऱ्या प्रत्येक दुकानदाराला, नोकरदाराला, व्यावसायिकांना मराठी आलीच पाहिजे. तुम्ही या भूमीत काम करता मग इथली भाषा शिकणे हे तुमचं कर्तव्य आहे.

मराठी भाषेचा अभिमान जर आपण मराठी माणसांनीच ठेवला नाही तर मग परप्रांतीय ठेवणार का? एकदा बाहेरील राज्यात जाऊन पाहा, तिथल्या स्थानिकांना आपल्या भाषेचा किती आदर आणि अभिमान आहे. तिथे गेल्यानंतर कळतं की त्यांच्या राज्याची भाषा बोलल्याशिवाय तिथे आपले पानही हळत नाही. प्रत्येक दुकानदार त्यांचीच मायबोली बोलतो. मग मराठी माणसांनी आपली भाषा बोलणे का सोडली? तुम्हाला तुमच्या भाषेचा काही राग आहे का? जर कुणी महाराष्ट्रात असून पण उगाचच हिंदी किंवा इतर भाषेत बोलत असेल तर तुमचं रक्त पेटलं पाहिजे. जर पेटत नसेल तर तुम्ही महाराष्ट्रीयन म्हणण्याच्या कुवतीचे नाही आहात.

सध्या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाची पाटी मराठी मध्येच असली पाहिजे असा आदेश काढला आहे. पण ह्या आदेशाचे किती लोक पालन करतात? की फक्त हा आदेश कागदोपत्रीच आहे. तुम्ही तुमच्या शहरात एकदा फेरफटका मारून पहा तुम्हाला अनेक दुकानाच्या पाट्या ह्या इंग्लिश, हिंदी किंवा इतर भाषेत पाहायला मिळतात. आपण अशा व्यक्तींना अध्रिकृतरित्या जाब विचारू शकतो. तुम्ही स्वतःच्या राज्यात आहात, त्यांच्या राज्यात नाहीत त्यामुळे तुम्हीच यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आधी समजावून सांगा मग कायद्याचे नियम सांगून समजावा.

हे लिखाण फक्त वाचण्यापुरतं मर्यादित ठेऊ नका. हवे तेवढं शेअर करा आणि गोष्टी आमलात आणा. पहा आपला महाराष्ट्र फक्त मराठी भाषेने गुंफून निघेल. आपण खरंच महाराष्ट्रात राहतो का? हा प्रश्न पुन्हा आपल्याला पडला नाही पाहिजे. हे फक्त नी फक्त आपल्या हातात आहे. सर्वांनी माझ्या सोबत म्हणा, “वाहते रक्तात माझ्या मराठी.. गर्वाने सांगतो, आहे मी मराठी. संस्कृती माझी माय ती मराठी, अभिमानाची ती आमची माय मराठी.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)

Please follow and like us:

Related Articles

33 comments

Nndihs March 14, 2022 - 8:03 pm

pregabalin ca – order lyrica 150mg order lyrica 75mg generic

Reply
Cbgazi March 16, 2022 - 1:53 am

cheap clomid 50mg – buy albuterol pill generic cetirizine 10mg

Reply
Mgsdfp March 17, 2022 - 7:34 am

clarinex 5mg drug – order generic triamcinolone 4mg triamcinolone 4mg cost

Reply
Pnunce March 18, 2022 - 7:44 am

misoprostol generic – order synthroid sale levothyroxine pills

Reply
Qwbyhw March 19, 2022 - 11:41 am

viagra next day delivery usa – sildenafil 200mg gabapentin 100mg drug

Reply
Xrjtgb March 20, 2022 - 10:44 am

tadalafil ca – tadalafil without prescription cenforce pills

Reply
Ekzfto March 21, 2022 - 9:43 am

diltiazem online order – cost zyloprim order acyclovir 800mg

Reply
Xctcoc March 22, 2022 - 9:11 am

purchase atarax pill – order hydroxyzine 25mg generic generic rosuvastatin 10mg

Reply
Phymxd March 24, 2022 - 2:26 am

buy ezetimibe 10mg pill – order ezetimibe 10mg generic purchase celexa generic

Reply
Tuizpi March 25, 2022 - 1:19 am

cheap viagra online – usa viagra sales order flexeril 15mg generic

Reply
Gevrfs March 25, 2022 - 10:17 pm

viagra overnight shipping usa – order tadalafil generic cheap tadalafil pills

Reply
Udnzwn March 26, 2022 - 6:00 pm

order toradol 10mg generic – ketorolac cost lioresal for sale online

Reply
Rupnok March 27, 2022 - 2:57 pm

colchicine pill – colchicine 0.5mg sale strattera 25mg usa

Reply
Hvvcmp March 28, 2022 - 12:57 pm

sildenafil 50mg pills – price viagra clopidogrel 75mg canada

Reply
Zlikqv March 30, 2022 - 6:34 am

viagra 100mg drug – sildenafil 100mg cheap sildenafil price

Reply
Hejppg March 31, 2022 - 8:26 am

order esomeprazole 40mg pill – nexium 20mg cost buy promethazine 25mg pills

Reply
Urhbvo April 1, 2022 - 7:26 am

buy cialis canada – cialis 20 mg cialis 20

Reply
Gzbzfr April 2, 2022 - 6:03 am

modafinil 200mg oral – order modafinil pills best erection pills

Reply
Kulcka April 3, 2022 - 5:13 am

brand isotretinoin – buy amoxicillin for sale buy azithromycin

Reply
Dpioun April 4, 2022 - 8:11 am

buy furosemide 100mg – order doxycycline 100mg pill oral sildenafil 50mg

Reply
Jaimhz April 5, 2022 - 12:41 pm

cialis for men – sildenafil 150mg brand buy viagra 100mg pill

Reply
Egupcx April 6, 2022 - 11:39 am

cialis online buy – coumadin 5mg brand warfarin 2mg sale

Reply
Siltxg April 7, 2022 - 9:26 pm

topiramate 100mg cost – levofloxacin 250mg sale order sumatriptan 25mg generic

Reply
Clerqp April 9, 2022 - 6:14 am

purchase dutasteride online cheap – tadalafil cost buy tadalafil 5mg without prescription

Reply
Uakkcq April 10, 2022 - 7:42 am

cost sildenafil – viagra for men brand cialis 40mg

Reply
Hjxhvf April 11, 2022 - 12:49 pm

top rated ed pills – buy generic prednisone 10mg order prednisone 5mg

Reply
Dmtfuu April 12, 2022 - 1:50 pm

order isotretinoin without prescription – generic isotretinoin 40mg amoxicillin drug

Reply
Pcbwzy April 13, 2022 - 6:32 pm

lasix pills – azithromycin uk zithromax price

Reply
Mgrzna April 14, 2022 - 7:12 pm

doxycycline 100mg cheap – order generic doxycycline chloroquine uk

Reply
Rjceey May 8, 2022 - 2:02 am

buy prednisolone 20mg for sale – prednisolone 10mg cheap order cialis 40mg pills

Reply
Iemyry May 10, 2022 - 3:10 pm

augmentin 625mg pills – clavulanate price order tadalafil 10mg generic

Reply
Bqdcou May 13, 2022 - 1:13 am

sulfamethoxazole cheap – generic sildenafil viagra generic

Reply
Vkrobc May 15, 2022 - 7:54 am

order cephalexin 250mg – order cephalexin 500mg pills buy erythromycin 500mg online cheap

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल