Home करमणूक माझा होशील ना ह्या झी मराठीच्या मालिकेतील गौतमी आहे ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण

माझा होशील ना ह्या झी मराठीच्या मालिकेतील गौतमी आहे ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण

by Patiljee
2026 views
माझा होशील ना

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेने शंभू राजांचा जिवंत आयुष्य प्रेक्षकांना डोळ्यासमोर पाहता आलं त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे ह्यांचे कौतुक होत आहे. काहीच दिवसापूर्वी ह्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला पण त्या मालिकेनंतर पुढे कोणती मालिका येणार हा प्रश्न पडलाच असताना झी मराठी कडून नवीन मालिका त्याच स्लोटवर. माझा होशील का ह्या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला अक आहे. ह्या मालिकेतील अभिनेता अभिनेत्री दोघांचेही बोंडिंग खूप छान जमून आलेय. त्यामुळे लोक नक्की हे दोन्ही नवखे कलाकार कोण आहेत म्हणून त्याबद्दल सर्च करत आहेत. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे.

माझा होशील ना ह्या मालिकेत गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी ही नवीन जोडगोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गौतमी बद्दल बोलायचे झाले तर ती अभिनेत्री दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे हीची लहान बहीण आहे. तिचा जन्म ५ जानेवारी १९९२ मध्ये पुण्यात झाला असून २०१४ मध्ये तिने इंजिनीरिंगची डिग्री सुद्धा घेतली आहे. कॉलेज मध्ये असल्यापासून तिला नाटक, एकांकिका मध्ये भाग घेण्याची आवड होती. पूर्शोत्तम आणि फिरोडिया करंडक मध्ये तिने पारितोषिके सुद्धा मिळवली आहेत.

डिग्री नंतर तिने डिविशन ऑफ सिमेन्स ह्या कंपनी मध्ये काही महिने काम सुद्धा केलं आहे. त्यानंतर २०१६ मध्ये मध्ये टाइम आऊट ह्या काँटेस्त मध्ये तिने सुपर सिंगर स्पर्धेत सुद्धा भाग घेतला होता. अनेक सिंगिंग शो मध्ये सुद्धा ती आपल्या गाण्याने लोकांची मने जिंकत असते. सारे तुझ्या साठी ह्या मालिके मध्ये सुद्धा तिने मुख्य भूमिका केली होती.

आता परत एकदा झी मराठीच्या मोठ्या कुटुंबात ती सामील झाली आहे. माझा होशील का ह्या मालिकेतून आपल्याला दिसत आहे. ह्या मालिकेत तिच्या सोबत तगडी स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. विराजस कुलकर्णी, सुनील तावडे, निखिल रत्नपारखी, अतुल काळे, मुग्धा पुराणिक, सुलेखा तळवलकर, विद्याधर जोशी, आच्युत पोतदार आणि विनय येडेकर.

विराजस कुलकर्णी सुद्धा मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हीचा तो मुलगा आहे. ह्या आधीही एक दोन सिनेमात त्यांनीं कामे केले आहेत. ही मालिका सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल ह्यात काही शंका नाही. तुम्ही सुद्धा ह्या मालिकेचे एक दोन एपिसोड पाहिलेच असणार. तुम्हाला ही मालिका कशी वाटतेय आम्हाला नक्की सांगा.

लॉक डाऊन नंतर पुन्हा एकदा ह्या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मालिकेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

Please follow and like us:

Related Articles

1 comment

अर्चना निपाणकर अडकली विवाहबंधनात » Readkatha July 15, 2020 - 6:18 pm

[…] झी मराठी वरील लोकप्रिय मालिका का रे दुरावा सर्वांच्याच मनात एक वेगळं स्थान निर्माण करून गेली. प्रत्येक पात्र प्रेक्षकाच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालं होतं. त्यातलेच एक पात्र तुम्हाला चांगलेच आठवत असेल ते म्हणजे जुई. नेहमी ऑफिस मध्ये शांत असणारी ही अबोल जुई सर्वानाच भावली होती. […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल