आयपीएलच्या तेराव्या मोसमातील लिलाव आज चालू असताना सर्वात जास्त महागडा विदेशी खेळाडू म्हणून Pat Cummins ठरला आहे. कोलकाता नाइट रायडर्स ने त्यांना आपल्या संघात घेण्यासाठी सर्वात जास्त म्हणजेच १५ करोड पन्नास लाख रुपये खर्च केले आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू म्हणून Cummins ची वर्णी लागली आहे. ह्या आधी बेन स्टोक्स ह्याला १४ करोड पन्नास लाखांत खरेदी केला होता पण आता हा रेकॉर्ड मोडीत निघाला आहे.

Pat Cummins आता आपल्याला कोलकाता संघाच्या जर्सी मध्ये खेळताना दिसेल. हे बोली अत्यंत नाटकिय पद्धतीने लागली होती. अगोदर दिल्ली आणि बंगलोर मध्ये बोली लागत असताना अचानकपणे कोलकात्याने पंधरा करोडची बोली लावून आपल्या संघात घेतले.
Pat Cummins हा ऑस्ट्रेलियाचा जलदगती अनुभवी गोलंदाज आहे. आतापर्यंत त्याने २५ टी ट्वेण्टी सामने खेळले असून ३२ विकेट आपल्या नावावर केले आहेत. त्यात त्याचा ३/१५ ही बेस्ट गोलंदाजी आहे.