नारळाला श्रीफळ असे म्हणतात. त्याचा उपयोग आपण विविध कार्य, पूजापाठ करण्यासाठी करतो. आपल्या धर्मात कोणतेही कार्य असो त्यासाठी नारळाची गरज आपल्याला असतेच असते. असे म्हणतात की जेव्हा भगवान विष्णूंनी यांनी धर्तीवर जेव्हा अवतार घेतला तेव्हा त्यांनी आपल्यासोबत तीन गोष्टी ही आणल्या त्यात लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनु यांचा समावेश होता नाराळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष म्हटले गेले आहे. या दिव्य वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते.
देवतांसमोर नारळ फोडणे म्हणजेच आपल्यामध्ये असलेल्या दुष्ट प्रवृत्ती, अहंकार यांचा नाश करणे अशी मान्यता असल्यामुळे देवाला नारळ फोडूनच नारळ अर्पण करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. कोणतेही शुभ कार्य घरात असो गृहप्रवेश असो किंवा आपल्या घरात नवीन गाडी घेण्याचा कार्यक्रम असो त्यासाठी पहिल्यांदा नारळ फोडला जातो. नारळ फोडल्याशिवाय कोणत्याही देवाची पूजा करणे हे अपूर्ण मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यात नारळाची पूजा केल्याने कार्यात येणारे अडथळे दूर होतात आणि कार्य व्यवस्थित पणे पार पडते.
नारळ हे बिजरुपी असल्यामुळे प्रजनन क्षमतेशी त्याची तुलना केली जाते आणि स्त्री ही सुद्धा एक बीज धारी असल्याने स्त्रियांना नारळ फोडायला दिले जात नाही. मित्रानो ह्या लेखात मांडलेल्या गोष्टी ऑनलाईन सर्च करून माहिती काढून तुमच्यासमोर सादर केल्या आहेत. काही चुकीचे लिहिले असेल किंवा तुम्हाला अजुन काही आम्हाला ह्याबद्दल सांगायचे असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा.