Home विचार नवरा बायकोने ह्या गोष्टी केल्या तर कधीच तुमच्यात भांडणे होणार नाहीत

नवरा बायकोने ह्या गोष्टी केल्या तर कधीच तुमच्यात भांडणे होणार नाहीत

by Patiljee
1141 views

आपल्या देशात सर्वात जास्त न टिकणारे नाते म्हणजे नवरा बायकोचे आहे आणि तेच नाते सर्वात जास्त टिकणारेही आहे. म्हणजे महत्वाची गोष्ट कोणती तर ते नात टिकवून घेण्याची तयारी आपल्यात पहिल्यापासून असायला हवी मग त्या जागी कुणीही असो. नवरा असो किंवा बायको दोघांच्याही अंगात नाते टिकवून ठेवण्याची धमक असायला हवी तरच ते नाते शेवट पर्यंत टिकते. आपण फक्त एकच बाजूने विचार नाही करत तर स्त्री आणि पुरुष या दोघांनीही आपल्या संसाराचा डोलारा सांभाळताना काही गोष्टींचे भान ठेवायला हवे तरच तुमचा संसार सुखाचा होईल.

आम्ही असे म्हणत नाही तुम्ही भांडूच नका, भांडणं झाल्यानंतर प्रेम अधिक वाढते असे म्हणतात आणि म्हणून संसारात छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणे होणे साहजिकच आहे. भांडणे ही झालीच पाहिजेच त्यामुळे आपल्या मधील प्रेम ही वाढते. पण भांडताना या गोष्टीचा विचार करा की आपल्यामुळे आपल्या जोडीदाराला घरातल्या समोर कमीपणा यायला नको, लाजिरवाणे वाटायला नको, त्यासाठी दोघांमधील भांडणे ही दोघांमध्येच व्हायला हवीत. त्यासाठी घरातील किंवा बाहेरील लोकांचा समावेश मुळात नकोच.

आपल्या नवरा किंवा बायको दिसायला कसेही असोत पण त्यांचे जर आपल्यावर खूप प्रेम असेल तर कधीही दिसण्यावरून त्यांचा सतत अपमान होईल असे वागू नये. शेवटी सौदर्य हे अधिक काळ टिकत नाही. चांगले मन महत्वाचे असते हे दोघांनीही लक्षात ठेवायला हवे. त्याच प्रमाणे शिक्षणाचे आहे. शिक्षणाने ही माणसाची पारख कधीच होत नाही. चांगले मन आणि समजून घेण्याची पात्रता ज्या व्यक्ती मध्ये असते. तिथं सगळं चांगलच घडत असत. आपल्या जोडीदाराच्या स्वभाव जास्त रागीट असला तरी त्याला समजून घेण्याची जबाबदारी ही तुमच्यावरच असते आणि हे तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे जग पाहत असते की तुम्ही समजूतदार आहात म्हणून तुमचा संसार सुखाचा चालला आहे.

आपल्या जोडीदारावर सतत आपल्या मतांचा भडिमार करणे चुकीचे आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढणे, किंवा तू हेच कपडे घाल, असेच कर तसेच कर, त्याची बायको किंवा नवरा किती छान कपडे घालतो तसेच घाल हे सांगणे ही तितकेच चुकीचे आहे. कारण आपल्या जोडीदाराला ही त्याचे स्वतंत्र मत आहे त्यामुळे त्याने कसे राहावे हा विचार तो घ्यायला समर्थ आहे.

मराठी कन्या

घरातल्या माणसानं वरून दोघांमध्ये भांडणे होत असतील तर यात दोघांनी सुद्धा एकमेकांच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. चुकी कोणाची आहे हे कधीच कोणी स्वीकारणार नाही. त्यापेक्षा चार गोष्टी समजून सांगण्याची गरज असते. जेणेकरून तुमचे घर तुटू नये. आपल्यासाठी आपल्या घरातील प्रत्येक नाते महत्वाचे आहे त्यामुळे कितीही भांडणे झाली तरी ती संपवून एकत्र येणे हे आपल्या हिताचे आहे.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल